Ambernath Fish Tunnel
Ambernath Fish Tunnel: अंबरनाथ जगन्नाथ महोत्सव २०२४ मध्ये पहिल्यांदाच सुरू झाले दुबई सारखे underwater fish tunnel. समुद्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक अनेक रंगाचे मासे इथे पाहायला मिळतील, तसेच तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी व परिवारासोबत, लहान मुलांसोबत ह्या ambernath fish aquarium ला भेट देऊ शकता. इथे कसे यायचं? fees काय ? व इथे अजून काय पाहायला मिळेल हे आज आपण या ब्लॉग मधून पाहणार आहोत.
Ambernath Fish Tunnel Detail’s
Ambernath Fish Tunnel: अंबरनाथ मधील हे underwater fish tunnel फेब्रुवारी २०२४ ह्या महिन्यात सुरू झाले असून अस बोल जातंय पुढच्या ४० दिवसापर्यंत चालू राहील. जर तुम्ही अंबरनाथ शहराजवळ राहत असाल व या अगोदर अंडर वॉटर फिश टनेल पाहिलं नसेल तर इथे जरूर भेट द्या. ह्या प्रकारचे underwater fish tunnel मुंबई मध्ये किंवा अन्य शहरात जसे की कल्याण, नवी मुंबई खारघर, विरार, पुणे, दिल्ली, इंदोर या ठिकाणी होते.
अंबरनाथ मध्ये पहिल्यांदाच dubai fish aquarium सारखं underwater fish tunnel अंबरनाथ करांना पाहायला मिळत आहे, हे fish tunnel १८०° डिग्री आहे, या फिश टनेल मध्ये अनेक प्रकारचे मासे पाहायला मिळतील, जर मासे पाहताना त्या बरोबर कोणते मासे आहेत याची पाठी लावली असती तर अजून बर झालं असत ज्याने करून लहान मुलांना हे मासे कोणते हे समजलं असते.
हे देखील वाचू शकता:
Kharghar Underwater Fish Tunnel: Exploring the Underwater World 2024
Fishing Spot BARVI DAM Badlapur || बारवी धरण बदलापूर
Ambernath Fish Tunnel Address
जगन्नाथ महोत्सव २०२४ अंबरनाथ फिश टनेल चा पत्ता
Address– Bhoir Compound, Loknagari (loknagari ground), MIDC Road, Ambernath East. जर तुम्हाला या ठिकाणी गुगल मॅप द्वारे पोहोचायचे असल्यास खाली गुगल मॅप देखील दिला आहे. त्या द्वारे स्वतःच्या गाडी ने पोहोचू शकता.
Ambernath Fish Tunnel Expo Map-
Ambernath Fish Tunnel Expo Timing-
4 PM to 10 PM
How To Reach Ambernath Underwater Fish Tunnel
जर तुम्हाला Ambernath Fish Aquarium या ठिकाणी पोहोचण्याकरिता तुम्हाला अंबरनाथ रेल्वे स्टेशन वरून ऑटोरिक्षा ने १०-१५ मिनिटात पोहोचू या करिता प्रत्येकी २० रुपये आकारले जात असतील. जर तुम्हला (दर) या बद्धल माहीत असेल तर खाली कंमेंट द्वारे सांगू शकता.
Ambernath Railway Station वरून १० मिनिटाच्या अंतरावर हे ठिकाण आहे तसेच जर तुम्ही Ulhasnagar Railway Station वरून येण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला १५ ते २० मिनिटे लागू शकतात, तसेच तुम्ही ऑटोरिक्षा ने इथे कुठूनही भेट देऊ शकता.
Ambernath Fish Tunnel Entry Fees
जगन्नाथ महोत्सव २०२४ हा ambernath east मध्ये होत असून ह्या Ambernath Fish Tunnel Exhibition करीत प्रवेश फी प्रत्येकी १००/- रुपये आहे तसेच ४ वर्षे खालील लहान मुलांना मोफत प्रवेश आहे. तसेच या महोत्सवात रंगीबेरिंगी माश्यासोबत तुम्ही घरासाठी काही वस्तू खरेदी करू शकता, तसेच लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत आकाशपाळणे, लहान मुलांसाठी games व खाण्याची स्टॉल्स आहेत.
Near Place To Visit Ambernath Fish Tunnel
अंबरनाथ शिव मंदिर (Ambernath Shiv Temple)
लोकनागरी ते अंबरनाथचे शिव मंदिर अगदी ५-१० मिनिटे अंतरावर आहे, जर तुम्ही स्वतःच्या गाडी ने येत असाल तर तिथून गूगल मॅप द्वारे २-३ किलोमीटर अंतरावर हे हजार वर्षे जुनं शिव मंदिर पाहायला मिळेल.
ह्या फिश टनेल व महोत्सव पाहून झाल्यावर सूर्यास्त (sunset) पाहण्यासाठी १० मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या चिखलोली डॅम ला भेट देऊ शकता, सूर्यास्त पाहण्यासाठी हे एक अंबरनाथ मधलं बेस्ट प्लेस आहे.
बदलापूर कोंडेश्वर मंदिर ( Badlapur Kondeshwar Temple)
जर तुम्ही दुपारी ४ वाजता येऊन फिश टनेल व महोत्सव एन्जॉय करून एक छान संध्याकाळ पहायची असेल तर गुगल मॅप द्वारे लोकनागरी ते कोंडेश्वर मंदिर बदलापूर मार्ग पहा थोडं लांब आहे पण निसर्ग पाहण्यासारखा आहे.
मलंगगड रोड (Malanggad Road)
जर तुम्ही कल्याणच्या दिशेने येत असाल तर मलंगगड रोड ला भेट देऊ शकता, रोज रविवारी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे पाहायला मिळतात, हे ठिकाण फिश टनेल पासून २०-२५ मिनिटं च्या अंतरावर आहे, तिथे मलंगगड चा विहंगम नजरा पाहायला मिळतो.
निष्कर्ष:
तर मित्रांनो ही होती Ambernath Fish Tunnel या बद्दल थोडक्यात माहिती, इथे येण्यासाठी तुम्ही अंबरनाथ रेल्वे स्टेशन व उल्हासनगर रेल्वे स्टेशन वरून ऑटोरिक्षा किंवा स्वतःच्या गाडीने १०-२० मिनिटांत येऊ शकता. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला इथे भेट दयची असेल तर लवकरात लवकर ही माहिती आपल्या परिवारामध्ये व जवळच्या मित्र-मैत्रिणीना शेअर करा व काही कंमेंट असतील तर खाली कंमेंट करा.
धन्यवाद….
2 thoughts on “Ambernath Fish Tunnel || अंबरनाथ मध्ये पहिल्यांदाच अंडर वॉटर फिश टनेल || जगन्नाथ महोत्सव 2024”
Comments are closed.