Top 5 Places To Visit In India
Top 5 Places To Visit In India In November: भारतात नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ठिकाण आहेत त्यात includes Goa, Wayanad, Chikmagalur, Varanasi, Bharatpur, Ujjain, Meghalaya , Andaman, Jaisalmer, Coorg, Manali, Shimla अजून भरपूर काही ठिकाणं आहेत पण आज आपण या ब्लॉग मध्ये आपल्या जोडीदार बरोबर असे वेगळी ठिकाण बघणार आहोत ते या पूर्वी कोणी सुचवली नसतील ते हि बजेट मध्ये.
आपण या ब्लॉग मध्ये आपल्या भारतातील असे पाच ठिकाण सांगणार आहोत जे नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ठिकाण आहेत. हे पाच ठिकाण कव्हर करतात आपल्या भारताला उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण जे फिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तसेच तुमच्या जोडीदारच्या मनाप्रमाणे जर त्यांना बीच, रोमॅंटिक सैर, सांस्कृतिक ठिकाण, तर कोणाला ट्रेकिंग आवडत असतील तर खाली सांगितल्या प्रमाणे ठिकाण निवडू शकता.
Top 5 Places To Visit In India In November
1. तारकर्ली
तारकरली हे ठिकाण बीच रिसॉर्ट, तारकर्ली पर्यटन स्थळे, तारकर्ली मध्ये स्कूबा डायव्हिंग या साठी प्रसिद्ध आहे, हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रातील सर्वांत कमी लोकांना माहीत असणारे स्कुबा डायविंग साठी आहे ते आपण तारकर्ली मध्ये करू शकतो, नोव्हेंबर मध्ये तुमचा बाहेर जाण्याचा बेत असेल तर तारकर्ली हे ठिकाण निवडू शकता, या बद्धल सांगण्यासाठी शब्द कमी आहेत, तुम्ही बीच रिसॉर्ट व स्वमिंग चे वेडे असाल व समुद्रातील मासे जीव पहायचं असेल तर स्कूबा डायव्हिंगआयुष्यात एकदा तरी करायला तारकर्ली या ठिकाण यायला हवं. मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय? तारकर्ली किनार्यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, सुर्यास्त् आणि सूर्योदय बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते.
2. गोकर्ण (कर्नाटक)
बीच प्रमिकांना कर्नाटकातील गोकर्ण बीच किनारी बोनफायर नाइट जोडीदारा सोबत वेळ घालवू शकता, हंपी सोबत गोकर्ण कर्नाटकात फिरू शकता. गोकर्ण हे एक धार्मिक स्थळ आहे. येथे आपण ओम बीच, अर्ध-चंद्र आणि पॅरासाईट बीचवर प्रवासाचा आनंद घेऊ शकता. गोकर्णमध्येच महाबळेश्वर मंदिर आहे. आपण गोकर्ण येथे सायकल चालविणे, ट्रेकिंग आणि माउंटन क्लाइंबिंगचा आनंद घेऊ शकता. पर्यटक गोकर्ण बीचवर सर्फिंगचा देखील आनंग घेतात. उन्हाळ्याच्या दिवसात समुद्रकाठ वातावरण खूप आनंददायक असते. यासाठी उन्हाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक गोकर्ण येथे येतात.
3. सनासर झील
तुमच्या जोडीदारला ट्रेकिंग आवडत असेल तर जम्मू आणि काश्मीर मधील सनासर झील म्हणजेच छोटासा सुंदर तलाव किनार्यवर जोडीदारा सोबत कम्पिंग करू शकता. सनासर हे भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील साना आणि सार या दोन लहान गावांना दिलेले नाव आहे. लहान स्थानिक तलावांच्या नावावरून, साना आणि सर हे राष्ट्रीय महामार्ग 1A वरील रामबन जिल्ह्याच्या पटनीटॉपपासून 20 किमी पश्चिमेस स्थित आहेत. 2,050 मीटर उंचीवर. ब्रामाह मासिफसह पर्वत रांगांच्या निसर्गरम्य दृश्यांसाठी हे प्रसिद्ध आहे.
4. कालिंपोंग
कालिंपोंग हे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात आहे, नोव्हेंबर मध्ये सर्दी चालू होत असते म्हणूनच कालिंपोंग ठिकाण तुमच्या आणि तुमच्या जोडीदारासाठी रोमॅंटिक असेल. कलिंगपोंग हे ठिकाण अतिशय वर्दळीचे शहर आहे. कारण या शहरातून दार्जिलिंग आणि गंगटोकला जाता येते. येथे तुम्ही तुमच्या जोडरसोबत व्यस्त जीवनातून किंवा जीवनाची सुरवात तसेच विश्रांती घेऊन काही क्षण निवांत घालवू शकता. या ठिकाणला एका दिवसात कारने भेट देता येते. हे ठिकाण पायी फिरण्यासाठी दोन-तीन दिवस लागतात त्यामुळे कोणतीही गाडी ने फिरू शकता. कलिंगपोंग हिमालयाच्या मागे वसलेले आहे. येथून कांचनजंगा पर्वतरांगा आणि तीस्ता नदीच्या खोऱ्याचे सुंदर दृश्य दिसते.
5. राजस्थान पुष्कर मेळा
सांस्कृतिक प्रेमिकांना राजस्थान च्या पुष्कर मधील मेळाचा जशन बघायला हवा व तो अनुभव घेण्यासाठी तिथे जरूर भेट द्यावी हि जत्रा नोव्हेंबर या महिन्यात सुरवातीच्या आठवड्यात असते. तसेच हे ठिकाण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुष्कर अजमेरपासून ११ किमी अंतरावर आहे. कार्तिक पौर्णिमेला येथे जत्रा भरते, त्यात देशी-विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. या जत्रेला हजारो हिंदू लोक येतात. आणि स्वतःला शुद्ध करण्यासाठी पुष्कर तलावात स्नान करतात. तसेच इथे व्यापारा व्यतिरिक्त, उंट आणि घोड्यांच्या शर्यती, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन, जादूचे कार्यक्रम, सर्वात लांब व्हिस्कर्स स्पर्धा, वधू स्पर्धा आणि बरेच काही या उत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय ही जत्रा जगातील सर्वात मोठ्या पशु मेळ्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे म्हणूनच इथे तुम्ही नोव्हेंबर महिन्यात भेट देऊ शकता.
मुंबई जवळील व मुंबई मधील काही ठिकाणे :-
kolad river rafting कोलाड रिव्हर राफ्टिंग :
kolad river rafting from mumbai १२३ किलोमीटरचं हे अंतर वेळ २ तास ५० मिनट प्रवास. कोलाड मध्ये रिव्हर राफ्टिंग तसेच kolad bungee jumping असे अनुभव तुम्ही कोलाड मध्ये घेऊ शकता, कोलाड ला महाराष्ट्रातील ऋषिकेश म्हंटले जाते हे ठिकाण निसर्गरम्य असून दर्या खोऱ्यांचं सर्वत्र धुके हिरवागार निसर्ग बघायला मिळतो.
kundalika valley कुंडलिका वेली :
लोणावळा कुंडलिका वेली सर्व हिरवीगार डोंगराळ सर्वत्र धुके आपल्या महाराष्ट्रातले निसर्गरम्य ठिकाण आहेत, हा सुद्धा एक पर्यायी ठिकाण तुमच्यासाठी चांगले असू शकते, १५१ किलोमीटर अंतर वेळ ३ तास ५५ मिन अश्या वेळात तुम्ही मुंबई ते कुंडलिक वेली पर्यंत पोहोचू शकता, मुंबईजवळील सर्वात निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक, कोलाड तुम्हाला कुंडलिका नदीतील व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंगच्या करू शकता. हे ठिकाण मुंबईजवळील सुट्टीच्या ठिकाणांपैकी एक आहे.
Kamshet कामशेत :
मुंबई पासून १०२ किलोमीटर अंतरावर कामशेत हे ठिकाण भारतामध्ये पॅराग्लायडिंग राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण महाराष्ट्र राज्यात आहे. पर्वतरांगांच्या सौंदर्याने सजलेले, कामशेत हे ठिकाण आहे सुंदर मंदिरे आणि भव्य टेकड्या हे शांततेचे प्रतीक आहेत, कामशेत हे भारतातील सर्वोत्तम पॅराग्लायडिंग स्थळांपैकी एक आहे कारण ते परिपूर्ण हवामान आणि अत्यंत योग्य स्थल आहे.
Igatpuri इगतपुरी :
इगतपुरी हे ठिकाण मुंबई पासून १२१ किलोमीटर अंतरावर आहे. Igatpuri हे ठिकाण ट्रेककर आणि निसर्ग प्रेमी साठी प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण लहान शहर आणि सुंदर हिरवीगार शहरांपैकी एक आहे, हे पुणे आणि महाराष्ट्रासारख्या प्रमुख शहरां पैकी एक लोकप्रिय वीकेंड डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते.
Goa, गोवा :
जर ट्रॅव्हल करायचा विचार करत असाल तर गोवा या ठिकाण कसाकाय विसरू शकता, मुंबई पासून गोवा ५८५ किलोमीटर अंतरावर आहे, मुंबई ते गोवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने जात असाल तर तो अनुभव खूप तुमच्यासाठी वेगळा असू शकतो त्याच प्रमाणे तुम्ही तो ट्रेन व अन्य ट्रॅव्हलर्स ने घेऊ शकता, गोवा मध्ये काय प्रसिद्ध आहे हे सांगायला वेगळं नाही तेच ते आपलं बीच निळशार समुद्र, स्वत्रंतपणे राहणे, बाईक्स वर गोवाच्या रस्त्यावर फिरणे, गोवतला अनुभव खूप वेगळा आहे एकदम चिल लाईफ आहे तो अनुभव एकदा तरी आयुष्यात घायला हवा तुम्ही सोलो जाऊ शकता तुमच्या मित्रांसोबत जाऊ शकता बाकी गूगल मॅप तुम्हला गोवा फिरू शकतो, तेथील खाद्य संस्कृती तुम्ही अनुभवू शकता.
तर मित्रांनो हे होते नोव्हेंबरमध्ये फिरणाऱ्या साठी टॉप 5 ठिकाणं कशी वाटली जरूर कॉमेंट करून सांगा व आपल्या ट्रॅव्हल पार्टनर सोबत शेअर करा. तसेच अनेक ट्रॅव्हल प्लॅन्स तुम्ही आपल्या ब्लॉग वर पाहू शकता.
धन्यवाद