Matheran Hill Station | Matheran Trip | माथेरान हिल स्टेशन

Matheran-hill-station
Matheran in monsoon
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

नमस्कार मित्रांनो आज मी या आपल्या मराठी ब्लॉग वर best places near mumbai in monsoon माथेरान Matheran Hill Station विषयी छोटीशी माहिती सांगणार आहे, गेल्या काही दिवसापूर्वी तिचे भेट दिल्या मुले काही अनुभव घेता आले तिथे कस जायचं, काय कार्यच, कोणते कोणते ठिकाण एक दिवसात पाहता येतील या बद्धल माहिती मी आज या माथेरानच्या ब्लॉग मध्ये देणार आहे ब्लॉग शेवट पर्यंत वाचा आवडल्यास शेअर करा. 


भारतातील सर्वात सुंदर लहान हिल स्टेशन” Matheran Tourist Places म्हणून ओळखले जाणारे, आपल्या महाराष्ट्रातील मुंबई जवळ असणारे माथेरान हिल स्टेशन आहे इथे पावसाळ्यात एक वेगळीच मज्जा असते सर्वत्र धुक्याने वेढलेले असते, माथेरान संध्याकाळी आणि सूर्योदयाच्या दृश्यांचा आनंद घेण्यासाठी एक मस्त ठिकाण आहे, माथेरान मधील ठिकाण पाहण्यासाठी तुम्ही घोडे सवारी करू शकता. 


Matheran Trip माथेरान स्टेशन ला पोहोचण्यासाठी दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ५:३० पर्यंत टॉय ट्रेन असतात, जी अमन लॉज हुन माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत आहे. तुम्ही चालत सुद्धा प्रवास करू शकता व घोड्याने सुद्धा. माथेरान हे एक हिल स्टेशन असून येथील विहंगमय नजरे विलक्षण आहेत, माथेरान हे मुंबई पुणे जवळच पर्यटन स्थळ आणि हिल स्टेशन असल्यामुळे खूप पर्यटक शहरातली धकाधकीचं जीवनामुळे इथे २-३ दिवस फिरण्यासाठी येत असतात, इथे खूप पॉईंट्स आहेत जे एक ते दोन दिवसात पाहू शकता.


हे ठिकाण पश्चिम घाटावर स्थित आहे जे समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर उंचीवर आहे. वर्षातील कोणत्याही वेळी या ठिकाणी नेहमीच आनंददायी थंड हवामान असते, आणि सांगितल्या प्रमाणे पाऊस आणि हिवाळ्याच्या ऋतूत तिची सुंदरता आणखी वाढते, व सर्वत्र हिरवी चादर त्यात पांढरे धुके पाहायला मिळतात.


माथेरान हिल स्टेशनची आणखी एक गोष्ट म्हणजे हे इको फ्रेंडली आहे आणि रस्त्यावर गाड्या आणि बसेसची गर्दी नसते हे एवढ्या मोठ्या डोंगरावर आहे तिथे कोणत्याही प्रकारच्या गाड्या दिसत नाही व त्यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होत नाही, अमन लॉज ते माथेरान असा प्रवास करताना खाली लाल माती सर्वत्र धुके आजूबाजूला गर्द झाडे पाहायला मिळते.


माथेरान मध्ये सुट्टीच्या दिवशी येऊन एकदम शांतता आणि निवांत असा वेळ घालू शकता, आराम आणि तणावमुक्त असं ठिकाण आणि त्यासोबत काही मंत्रमुग्ध करणारी ठिकाणे आणि विलक्षण निसर्गाची दृश्ये आहेत जी तुम्हाला त्याच्या सौंदर्याने मोहित करून सोडतील आणि तुम्हाला अनुभवायला लावतील.


माथेरान केवळ ट्रेकिंग लाच नाही तर, माथेरान हिल स्टेशन हे महाराष्ट्रतील  छायाचित्रकारां (photographer) साठी पश्चिम घाटाचे सौंदर्य एक्सप्लोर करून आणि कॅप्चर करण्यासाठी आहे, माथेरान हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे इथे कोणी हि येऊ शकते.


माथेरान मध्ये पर्यटक पायी प्रवास करणे पसंद करतात कारण चांगले रस्ते आहे रोमॅंटिक असा वातावरण असते सर्वत्र गर्द झाडे सर्वत्र दुःखे आणि ते आनंदमय आणि सुखकारक वातावरण असते. माथेरान पाहाण्यासारखी ठिकाणे आणि  निसर्गरम्य ठिकाणे भरपूर आहेत, त्याच्या सौंदर्यात हरवून जाण्याची काही वेगळीच मज्जा आहे.


माथेरान संपूर्ण माथा तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत.


थंडीत किंवा पावसाळ्यात माथेरान मध्ये एक अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथे कोणत्याही हॉटेल मध्ये गरम पदार्थ मिळतात जसे कि भज्या, वडापाव  व अन्य महाराष्ट्रीयन जीवन, त्याच प्रकारे मला माथेरान मध्ये चांगला नास्ता हा Ketkar’s Restaurant मध्ये मिळाला एकदम budget मध्ये, आणि जेवण त्याच्या समोरील हॉटेल मध्ये. 


खरेदी करण्यासाठी पर्यटकांची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ये जा होत असल्यामुळे इथल्या मार्केटमध्ये बऱ्याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स् आहेत.रस्त्यावर काही मुले छोट्या मोठ्या चपला, विविध प्रकारच्या टोप्या, शोभेच्या वस्तू, इत्यादी विकताना दिसतात. इथला मध, चिक्की, फज देखिल बर्‍यपैकी प्रसिद्ध आहे.


निसर्गाच्या सानिध्यात हरवायला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी आणि शहराच्या व्यस्त जीवनातून विश्रांती घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी माथेरान शहर हा उत्तम पर्याय आहे. माथेरानमधली पर्यटन स्थळे अगदी मन मोहून टाकणारी आहेत.


कसे जावे :
Distance between Mumbai to Matheran by Road :- 83 Kms
Travel Time from Mumbai to Matheran by Road :- 1 hr 57 min 
Distance between Pune to Matheran by Road :- 122.9 Kms
Travel Time from Pune to Matheran by Road :- 2 hr 55 min


रेल्वे :-
मुंबई-नेरळ तेथून omni गाड्या असतात ज्या माथेरान पार्किंग पर्यंत पोहोचवतात, पुणे – नेरळ, मुंबई-पुणे मार्गावर नेरळ स्टेशनवर उतरून तेथून  omni गाड्याने माथेरानला पार्किंग पर्यंत जाता येत. 


बस  किंवा स्वतःच्याच गाडीने रोड ने:-
मुंबई-कर्जत-नेरळ, पुणे-कर्जत, कर्जत-नेरळ, नेरळ ते माथेरान, नेरळ – माथेरान टॅक्सीही आहेत. वरपर्यंत मोटार मार्गही आहे. फक्त माथेरान अमन लॉज पर्यंत.


जवळचे विमानतळ :-
मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे.


माथेरान जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :
पनवेल खोपोली मार्गावर दोन सुंदर ट्रेक आहेत, धरण आहेत,  कड्यावरचा गणपती, पिसरनाथ महादेवाचं मंदिर, प्रबळगड (माथ्यावरून माथेरानचे सुंदर दर्शन) विशालगड, पॅनोराना पॉईंट खाली पेब माथा.

 

Matheran-map-2022

 

कशी वाटली हि माहिती जरूर खाली कंमेंट करून सांगा व जास्तीत जास्त शेअर करा. 

धन्यवाद … 

Matheran Hill Station | Matheran Tourist Places | Matheran Trip | Maharashtra

#Matheran #MatheranHillStation #MatheranToyTrain #MatheranPoints #MatheranTouristPlaces #CharlotteLake #LordPointMatheran #LouisaPointMatheran #EchoPointMatheran #HoneymoonPointMatheran #KingGeorgePointMatheran #MalangPointMatheran

Leave a Comment