Shivkalin khedegaon Mahabaleshwar || शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदार शिवकालीन खेडेगाव

महाबळेश्वरमध्ये आलात आणि Shivkalin khedegaon Mahabaleshwar नाही पाहिलात तर काय महाबळेश्वर पाहिले, शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदार शिवकालीन खेडेगाव जरूर एकदा भेट द्या नाही पैसे वसूल झाले तर बोला, बोलक्या गावा प्रमाणे साखरलेलं हे शिवकालीन गाव जरूर पहा, तर चला महाबळेश्वर मधील शिवकालीन खेडेगाव नक्की आहे तरी कुठे, आणि कसं आहे हे गाव.

Shivkalin khedegaon Mahabaleshwar
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Shivkalin Khedegaon Mahabaleshwar

मुंबई हुन किंवा पुणेतून किंवा अन महाराष्ट्राच्या भागातून प्रतापगड बघायला येत असाल तर नक्की रस्त्या लागतच शिवकालीन खेडेगाव Shivkalin Traditional Village हे ठिकाण मिळेल जरूर भेट द्या पैसे वसूल ठिकाण त्याच बरोबर खूप चांगल्या प्रकारचे खेडेगाव पाहायला मिळेल फोटो काढायला मिळतील छान ठिकाण आहे जरूर भेट द्या आज या ब्लॉग मध्ये shivkalin khedegaon in marathi बद्धल माहिती दिली आहे.

Shivkalin-khedegaav

Shivkalin khedegaon मध्यभागी असणार झाड व विश्रांती घेणारा गडी माणूस, अगदी खरेखुरे वाटणारे हे क्षण आज तुमच्या बरोबर शेअर केले आहेत. आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदार शिवकालीन खेडेगाव दाखवणार ठिकाण असं काही असेल कल्पना नव्हती, Shivkalin khedegaon Mahabaleshwar बघण्याचा आनंद काही वेगळाच होता व छान अनुभव होता.

Shivkalin-Traditional-village-mahabaleshwar

khedegaon मधोमधी निवांत पिंपळाच्या झाडाखाली आपल्याच विचारात शांत आराम करणारा गडी त्याच गडी बरोबर एक तरी फोटो काढावा वाटला, बाकी छान वाटलं कस बनवलं असेल हे सर्व किती वेळ गेला असेल हे उभं करण्यासाठी…

Shivkalin-khedegaav

गावातील गावकरी व महाराजांचा मावळा शेकोटी घेताना दाखवले आहे, शेकोटी पावसात सुद्धा पेटली होती सर्वत्र धुरा झाला होता हुबेहूब Shivkalin khedegaon गावातील दर्शन झाले.

हे देखील वाचू शकता :

10 Best places to visit in monsoon in Maharashtra

Shivkalin-dekhava

Shivkalin khedegaon Mahabaleshwar शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदार शिवकालीन खेडेगाव वरील फोटोत मी आहे व सकाळी सकाळी गावात वसुदेवाच दर्शन होत, समोर विठ्ठल रुखमाई चे छोटस मंदिर आहे, समोर तुळस आहे.

Shivkalin-gaav

ह्या खऱ्या खिडक्या आहेत ज्या शिवकालीन खेडेगावतील पाटीलवाडाच्या आहेत, खिडकीतून समोर सावकार आहेत, फोटो ब्लॅक आणि व्हाईट मध्ये छान वाटला. Shivkalin khedegaon Mahabaleshwar मध्ये हा वाडा पाहण्यासारखा आहे.

Famous-shivkalin-khedegaav

Shivkalin khedegaon Mahabaleshwar info in Marathi

Shivkalin Khedegav हे महाबळेश्वर मधील प्रतापगड च्या पायथ्याशी असणार शिवकालीन खेडेगाव चंद्रकांत उतेकर (Chandrkant Utekar) यांनी उभारलं आहे, जश्याच तस शिवाजी महाराजनच्या काळातील शिवकालीन खेडेगाव म्हणता येईल असे हे ठिकाण आहे.

लहान मुलांसाठी प्रत्येकी ५० रुपये तर मोठ्या व्यक्तीला प्रत्येकी १०० रुपये प्रवेश शुल्क आहेत, बाकी आतमध्ये छोटे स्टोर आहे त्यात शिवाजी महाराजनच्या मूर्ती, हातकलने बनवलेले बॅग आहेत, कप आहेत, कोल्हापुरी चप्पल आहेत, घरात शोकेसच्या विविध वस्तू आहे, शिवाजी महाराजांची फ्रेम आहेत.

शहरातील मुलांना ‘खेडेगाव म्हणजे काय असतं हे कळावं’ यासाठी चंद्रकात उतेकर यांनी हे संपूर्णपणं तत्कालीन खे़डं वसवलंय (shivkalin khedegaav) या खेड्यामध्ये उतेकरांनी अगदी हुबेहूब वाटणारं तत्कालीन समाजजीवन चितारलंय आणि तेसुध्दा बारा बलुतेदार पध्दतीनं.

Traditional_village_mahabaleshwar

या ठिकाणी पावसाळ्यात भेट द्यावी, खूपच सुंदर वाटते त्याच बरोबर हे ठिकाण खूप स्वच्छ असते म्हणून एकदम गावचा अनुभव येतो, पावसाळ्यात शिवकालीन खेडेगावातल्या मुर्त्या व गाव एकदम खरंखुरं वाटते, तसेच त्या आजूबाजूच ठिकाण हिरवीगार वाटू लागतात.

Mahabaleshwar-tourist-point

ह्या मुर्त्या कश्या बनल्या असतील माहीत नाही पण कस काय बनल्या आणि ते ही एकदम सजीव असल्या सारख्या वाटतात, गावातील स्वच्छता मुळे खूप छान वाटते, लहान मुलं खेळताना कोण आपली आपली का करताना, कोण आराम करताना तर कोण शेकोटी घेताना.

Shivkalin-khedegoan

शिवकालीन खेडेगावातील मुर्त्या हुबेहूब दिसतात, गावातील पाटलांचा वाडा तर खूप पाहण्यासारखा आहे, त्याच बरोबर बारा बलुतेदारची घर संपूर्ण गाव एकदम छान वाटते.

हे देखील वाचू शकता :

Shivkalin-khedegaav

जुन्या काळातील बारा बलुतेदार शिवकालीन खेडेगाव, कौलारू घर, घरात काम करणारे, लोकांची वेशभूषा, आजूबाजूची स्वछता, हे सर्व राखणे खूप अवघड असते, तेच या शिवकालीन खेडेगावात करतात खूप छान वाटेल जेव्हा इथे तुम्ही भेट द्याल.

Shivkalin-khedegaav-info

एवढं सर्व पाहताना मनात विचार आला कस एवढं उभं केलं असेल किती वेळ लागला असेल या शिवकालीन खेडेगावला बनवायला, पण एवढं आहे ज्यांनी पण हे शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदार शिवकालीन खेडेगाव बनवलं त्यांना सलाम द्यावा .

Shivkalin-village

या शिवकालीन खेड्यात प्रवेश करतानाच प्रवेशव्दाराजवळ उभ्या असलेल्या द्वारपालाची मूर्ती आपल्या स्वागतासाठीच उभी आहे, असं भासतं. प्रवेशव्दारातून आत प्रवेश करताच कुडाची घरं आपलं लक्ष वेधून घेतात! गावात आलेला विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिर असलेला वासुदेव.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधारभूत असलेली बारा बलुतेदारीची पद्धत आता हद्दपार झालीय. आपापल्या वाढत्या गरजा आणि अपेक्षा भागवण्याकरता सर्वांनाच शहराकडं धाव घ्यावी लागते. याच कारणांमुळं खेड्यातील पूर्वीचं परस्परावलंबन कमी होत चाललं आहे.
पैशाच्या विनिमय-माध्यमामुळंही या पध्दतीवर बराच परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. इथं येणाऱ्या पर्यटकांना या खेड्याच्या माध्यमातून जुनी जीवनपध्दती कशी होती, हे समजावं, याच उद्देशानं हे शिवकालीन खेड वसवलंय, असं उतेकर यांनी सांगितलं.
Shivkalin khedegaon Mahabaleshwar information in marathi छोटीशी माहिती व विडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो ह्या विडिओ ला कृपया लाईक करा, काही suggestion असतील तर कंमेंट करा व चॅनेल ला subscribe करा.
Maharaahtrian-village

वरील फोटोत पाटील वाडा दाखवला आहे जो गावाच्या समोरच आहे, काही लहान मूल खेळताना दाखवली आहे, पाटीलवाड्याच्या आतमधील देखावा तर अप्रतिम आहे वरील विडिओ मध्ये पाहू शकता.

Traditional-village

गावाच्या मधोमध गावातील लहान मूल खेल खेळताना, ६-७ घर समोरच, काही प्राणी पाहायला मिळतील, झाडे गावातील लोक आपापली काम करताना दाखवली आहेत अगदी हुबेहूब गाव वाटतं, छान वाटलं पहिल्यांदा अस काही पाहिलेलं.

Shivkalin-khedegav

असली भन्नाट जागा Shivkalin khedegaon Mahabaleshwar तुम्हाला कुठंच बघायला भेटणार ती फक्त आपल्या महाराष्ट्रात आणि महाबळेश्वर मधेच, याला सांभाळणे, स्वच्छता ठेवणे, पर्यटकांना माहिती देने, ह्या साठी दिखावा साठी प्रत्येकी १०० रुपये तर लहान मुलांना ५० रुपये शुल्क आकारले जाते, शिवकालीन खेडेगाव वेळ खालील प्रमाणे-

Shivkalin khedegaon Mahabaleshwar timings

  • Sunday 9am–7:30pm
  • Monday 9am–7:30pm
  • Tuesday 9am–7:30pm
  • Wednesday 9am–7:30pm
  • Thursday 9am–7:30pm
  • Friday 9am–7:30pm
  • Saturday 9am–7:30pm

निष्कर्ष :-

तर मित्रांनो आपण या ब्लॉग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदार शिवकालीन खेडेगाव या बद्धल माहिती वाचली, अशा करतो हि माहिती तुम्हाला आवडली असेल या बद्धल काही प्रश्न व काही सुजावं असतील खाली कॉमेंट करून विचारू शकता सांगू शकता, तसेच मित्रांनो कसे वाटले महाबळेश्वर मधील प्रतापगडच्या पायथ्याशी असणारे शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदार शिवकालीन खेडेगाव आणि पाटील वाडा नक्की कंमेंट करून सांगा व ही माहिती जेवढी शेअर करता येईल तेवढी करा.

हे देखील वाचू शकता:

Mapro Garden Tour Mahabaleshwar | महाबळेश्वर मधील प्रसिद्ध मॅप्रो गार्डन

धन्यवाद ।।

#shivkalinkhedegaon #traditionalvillage #mahabaleshwar #mianilshinde

Leave a Comment