Top 5 Websites in the world 2022 | जगातील सर्वात प्रसिद्ध टॉप ५ वेबसाईट

जगातील सर्वात प्रसिद्ध टॉप ५ वेबसाईट 

जगातील सर्वात प्रसिद्ध लोकप्रिय (top 5 websites) वेबसाइट कोणती आहे तुम्हाला माहित आहे का ? तुम्हाला माहित नसेल तर या  लेखा मध्ये तुम्हाला माहिती मिळेलंच, आपण जर या बद्धल माहिती घेत असाल तर अनेक वेगवेगळे उत्तर आपल्याला मिळतील, तर मित्रांनो खूप माहिती मिळवल्यानंतर मी तुमच्यासाठी जगातील सर्वात प्रसिद्ध टॉप ५ वेबसाईट माहिती घेऊन आलोय, आपल्या ज्ञानासाठी आणि तुमच्या साठी हि माहिती वाचा, आवडल्यास नक्की आपल्या मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका, आणि काही suggestion असतील नक्की खाली कंमेंट मध्ये द्या. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

मित्रांनो खालील वेबसाईट ह्या आपल्या दैनंदिनतील आहेत, काही शोध इंजिन आणि काही सोशल मीडिया ते स्ट्रीमिंग साइट्स आणि ऑनलाइन मार्केटप्लेसपर्यंत जगातील सर्वोत्तम वेबसाइट (top website) खाली दिल्या आहेत. 

या ५ प्रसिद्ध आणि लोकप्रिय वेबसाइट्स सोबतच, त्या प्रसिद्ध वेबसाईट कशाबद्दल आहेत, आणि ते एवढे लोकप्रिय का आहेत, ते पाहुयात तसेच त्या वेबसाईट वर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट जाऊ शकता (top website). 

तर मित्रांनो २०२२ च्या टॉप ५ वेबसाइट्सचे नावे खाली दिली आहेत, त्याच बरोबर त्या बद्धल माहिती दिली आहे. मित्रानो अजून काही माहिती तुमच्या कडे असल्यास खाली कंमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता, मी हि माहिती खूप कमी शब्दमध्ये दिली आहे, संपूर्ण माहिती वाचा कदाचित हि माहिती काही कामात तुम्हाला येऊ शकते. 

Top 5 Website in the world 2022 | जगातील सर्वात प्रसिद्ध टॉप ५ वेबसाईट सादर करत आहे. 

1. Google

अगदी लहान मुलापासून ते प्रौढ लोक पर्यंत गुगल बद्धल माहित आहे, म्हणून हि वेबसाईट जगात सर्वात अव्वल नंबर ला आहे, गुगल हे सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय वेबसाईट आहे सर्च इंजिन आहे यात शंका नाही, या वर्षी इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय वेबसाइट म्हणून अव्वल स्थानावर आहे. Google वर प्रत्येक सेकंदाला ४० हजार पेक्षा जास्त शोध नोंदवले जातात, जे प्रति वर्ष १.२ ट्रिलियन शोधांमध्ये भाषांतरित होते, कोणाला काय जाणून घ्यायचे आहे हे महत्त्वाचे नाही, Google हे जाण्यासाठी आहे. इतकेच नाही तर Google आता Google Docs, Google Calendar, Google Drive आणि इतर अनेक वेब सेवांसाठी केंद्र म्हणून काम करते.

2. YouTube 

युट्युब वेबसाइटने या वर्षी यादीत दुसऱ्या स्थानांवर झेप घेतली आहे कारण ती प्रभावकारक आकडेवारी चढत आहे, YouTube वर दररोज जवळपास ५ अब्ज व्हिडिओ पाहिले जातात, YouTube ला इंटनेटवर दररोज ३० दशलक्षाहून अधिक शोधणारे मिळतात. मित्रांनो प्रत्येक १ मिनिटाला, YouTube वर ३०० मिनिटांपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केला जातो, येत्या काही काळात YouTube गूगल सारखे काम करू शकतो आणि अव्वल नंबर वर जाऊ शकतो पण गुगल हा गुगल आहे, गुगल वर सर्व  प्रकारच्या माहिती वाचण्यासाठी मिळते आणि YouTube वर तीच माहिती भेटेल कि नाही याची शंका वाटू शकते.  

3. Amazon

Amazon गेल्या वर्षीच्या तुलनेत एका वर चढून तिसऱ्या स्थानकावर अली आहे, मित्रांनो आता इंटरनेटवरील तीन सर्वात लोकप्रिय वेबसाइट पैकी एक वेबसाईट आहे, आणि ऑनलाइन शॉपिंग जगामध्ये वर्चस्व गाजवते.  Amazon.com वरून लोक त्यांची आवडती पुस्तके, कपडे, घरगुती वस्तू, किराणा सामान आणि बरेच काही खरेदी करू शकतात आणि जर त्यांनी प्राइम मेंबरशिपसाठी साइन अप केले आणि प्राइम मेंबरशिप मिळाली असेल तर, तर त्यांनी खरेदी केलेले सामान, वस्तू किंवा काही हि सेवा ते फक्त एक-दोन दिवसांत त्यांच्या जवळ दारावर मिळू शकतात, आणि ते हि विनामूल्य म्हणजे फ्री होम डिलिव्हरी, अशा विविध प्रकारच्या वस्तू आणि अशा अप्रतिम सेवेसह, या वर्षी Amazon टॉप ३ मध्ये वर आहे यात आश्चर्य नाही. 

4. Facebook

फेसबुक हे जगभरातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, त्याच्या नवीन features ने लोकांची संवाद साधण्याची आणि त्यांचे जीवन जगण्याची पद्धत बदलली आहे.  दर महिन्याला, वेबसाइट प्रभावी २.३७ अब्ज वापरकर्ते (Facebook users) मिळवते. सरासरी १.६६ अब्ज लोक दररोज Facebook वर लॉग इन करतात आणि जानेवारी २०२० पर्यंत दैनंदिन सक्रिय वापरकर्ते (Facebook DAU) मानले जातात, जे वर्षानुवर्षे 9% वाढ दर्शवते.

5. Yahoo


Yahoo.com अजूनही प्रसिद्ध आहे लोकप्रिय आहे. Yahoo हे बर्याच काळापासून उत्कृष्ट शोध इंजिन आणि बातम्यांचे स्त्रोत होते आणि त्यातही ऑनलाइन जगात अजून त्याच जागी लोकप्रिय वेबसाइट्सपैकी एक लोकप्रिय आहे. थोडासा बदल दिसू शकतो कारण त्यात अजून हि चालू घडामोडी, बातम्या, लेख या व्यतिरिक्त शोध इंजिनाची जास्त search होत, लोक अगोदर yahoo.com एकमेकांशी समोरासमोर विडिओ कॉल म्हणून वापर करत असत  होत असे परंतु आता खूप सारे अँप्लिकेशन इंटरनेट वर मिळतात, आणि ते हि  विडिओ कॉल करू शकतो. Yahoo या अगोदर विडिओ कॉल साठी खूप आकर्षित होता. 

मित्रांनो या पैकी Twitter, reddit, Wikipedia, eBay, Bing, Netflix, Office, Instructure, Shopify, Twitch, CNN, LinkedIn, Instagram, Intuit, NY Times, Chase या सुद्धा वेबसाईट आहेत ज्या टॉप २० मध्ये मोडतात. 

तर मित्रांनो तुम्ही वाचलं असेल जगातील सर्वात प्रसिद्ध टॉप ५ वेबसाईट, गेल्या काही वर्ष्यापासून (top website) या नंबर मध्ये बदल होत आहेत, सर्वांचे वेग वेगळे मत असते त्या पैकी इंटरनेटवरील माहिती नुसार जगात, नाही भारतात, जगात या ५ वेबसाईट अव्वल आहेत, या लिस्ट मध्ये अजून काय बदल होईल सांगता येत नाही, 

तर मित्रांनो मी आशा करतो हि छोटीशी जगातील प्रसिद्ध वेबसाईट्स (top website) माहिती तुम्हाला आवडली असेल, जर आवडली असेल तर मित्रांनो हि माहिती फेसबुक, ट्विटर किंवा इतर सोशल मीडियावर शेअर करू शकता, नाव नवीन माहिती मराठी मध्ये आपल्या या वेबसाईट वर वाचायला मिळेलच. बेल आयकॉन वर क्लिक करून subscribe करू शकता 

धन्यवाद आभारी आहे ।।

अनिल शिंदे 

Leave a Comment