Param Pujya Gagangiri Maharaj | गगनगिरी महाराज कोण होते ?

Param Pujya Gagangiri Maharaj 

स्वामी गगनगिरी महाराज हे आपल्या भारतीय हिंदू संत आणि नाथ संप्रदायाचे गुरु होते. गगनगिरी महाराज विशेषत: त्यांच्या जल तपश्चर्येसाठी आणि ध्यान धारणा पद्धतींसाठी चर्चेत होते. परम पूज्य गगनगिरी महाराज स्वतः आदि दत्तात्रेयांचा अवतार आहे असं बोल जातं, भारतीय साधू आणि संतांमध्ये स्वामीजी हे एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now


गगनगिरी महाराजबद्धल जेव्हा चर्चा होती, तेव्हा त्यांच्या बद्धल हमखास सांगितलं जातं, ते पाण्यात उभा राहून ध्यान धारण करत असत, ते तप करण्यात एवढे एकाग्र होयचे कि त्याचे पाय माश्याने कुर्तडले होते.

 
Gagangiri maharaj
Gagangiri Maharaj 

गगनगिरी महाराज आठवतच खोपोलीचा आश्रम आठवतो तिथलं ठिकाण, महाराजची मूर्ती, हे आठवतं, आणि त्याच बरोबर महाराजची पाय कुरदडल्याची गोष्ट आठवते, या पक्की दोन्ही मुले महाराज कोणीनंतरी मोठे असावेत अस वाटत तर ध्यान धरणाच्या गोष्टी मुले महाराज सिद्ध कोच असल्याचं वाटायचं, या पैकी नक्की काय?

गगनगिरी महाराज कोण होते ते आपण पाहुयात! 

Gagangiri-maharaj
Gagangiri Maharaj 

पाठण तालुक्यातील मनदुरे गावचे पाटणकर सरकार म्हणून ओळखलं जाणार कुटूंब, पटांकरचे मूळ आडनाव साळुंखे, महाराजांचा जन्म देखील इथलाच, 1906 साली वडील गणपतराव आणि आई विठाबाई याच्या पोटी गगनगिरी महाराजांचा जन्म झाला, गगनगिरी महाराजांचं नाव श्रीपत गणपतराव पाटणकर साळुंके, त्यांच कुटुंब मनदुरे या गावात राहायला होत.

Gagangiri maharaj
Gagangiri Maharaj

महाराज 3 वर्षाचे असताना त्यांच्या आईच आणि 5 वर्षाचे असताना वडिलांचं निधन झालं, त्यामुळे एकटे पडलेल्या महाराजांनी सहाव्या वर्षी घर सोडले, त्या नंतर वैराग्य ही एकमेव गोष्ट महाराज सोबत राहिली, घर सोडल्यानंतर ते नाथ संप्रदाय च्या संपर्कात आले, नाथ संप्रदाय च्या प्रभावतूनच ते सांगली जिल्यातील बत्तीसशिराळा इथे आले, वयाच्या सातच वर्ष्यात नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली.


गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदाय हातयोडी, ते चालुक्य सम्राट पहिला पुकेशच्या घरणातील होते, त्या नंतर त्यांनी चित्रकूटच्या दिशेने प्रस्थान केलं, तितच त्याची चित्रानंद स्वामी यांच्याशी भेट झाली, पुढे ते उत्तर भारतात ते भटकत राहिले, बद्रीनाथ जवळील व्यास गुफेत महाराज असताना,  तिथं त्याना एक स्वामी मुळे त्यांना सिद्धवस्था प्राप्त झाल्याचं दंतकथा प्रसिद्ध आहे. 


दक्षिणेकडे चालत राहण्याची आज्ञा साधूने दिल्यानं महाराजांनी दक्षिणेकडे प्रयाण केलं, महाराज हरिद्वार पासून दिल्ली कडे पायी प्रवास करत आले, तसेच ते भोपाळ पर्यंत गेले, तलावाकाठी ध्यान धारण करत असताना काही सरदार मराठीत बोलतांना दिसलं, महाराज देखील सरदारबरोबर मराठीत बोलू लागले, मराठी व्यक्ती असल्याकारणाने सरदाराने त्यांना कोल्हापुरात आणले, तितुन पुढं महाराज दाजीपुरच्या जंगलात ते तप करू लागले, अशी कथा सांगितली जाते.


दाजीपुर मध्ये असणाऱ्या धनगरवाडी शेजारी ते झोपडे बांधून ते राहू लागले, खाण्यासाठी कंदमुळे आणि तप करण्यासाठी तप, भूत विद्या, जारान मारण, उचटन विद्या ह्या गोष्टीच्या दंतकथा महाराजांच्या नावासोबत जोडू लागल्या, तिथूनच ब्रह्मण करत महाराज गगनगडावर पोहोचले, व इथंच ते वास्तवयात गगनगिरी महाराज झाले, इथंच ते जल तपश्चर्या करू लागले, ते इतकावेळ तपश्चर्या करायचे की मासे त्याचा पायाची चावा घेत असत.


महाराजांचे भक्त सांगतात की त्यांना योग शास्त्रतील विमलज्ञान, शिवयोग, उन्मातीविद्या, गोरक्षणाथी विद्या अश्या विद्या आत्मसाठ होत्या, निसर्गाच्या सानिध्यात त्यानी तप केलं होतं, 1932 ते 1940 या साली दाजीपुरच्या पटाचा डंख भागात राहून त्यानी अरण्यनिवासीत पूर्ण केलं होतं, हळूहळू महाराजांची कीर्ती पसरू लागली होती.


 1948 ते 1950 साली महाराज मुंबईतील वाळकेश्वरतील शिडीच्या मारुतीजवळ दादी हिरजी पारशीस्मशानात राहू लागले व तप करू लागले, नंतर ते ब्रीच कॅण्डी खडक, महालक्ष्मी खडक, बनगंगेचा खडक टापूत तप करू लागले, दादी हिरजी शेठच्या बंगल्याच्या समोर अय्यरीच्या समोर, कधी कधी समशान बावडी जवळ खाट टाकून तप करू लागले. 


महाराजची कीर्ती वाडू लागल्याने बरेच संस्थानिक महाराजांना भेटण्यासाठी येऊ लागले, य काळात खोपोली आज जिथे आश्रम आहे ना तिथं निसर्गरम्य ठिकाणी महाराजांचं वास्तव होऊ लागलं, मात्र महाराजांची कीर्ती पसरली ती 1965 च्या कालखंडानंतर, दरम्यानच्या काळात यशवंतराव चव्हाण,बाळासाहेब देसाई, राजारामबाबू पाटील, कपसे आदी सर्व मंत्री प्रतिपष्ठित अधिकारी त्याना मानसन्मान देऊ लागले.

Gagangiri maharaj
गगनगड किल्ला

मुंबईच्या बिर्ला क्रीडा केंद्रात गुरुपूर्णिमा साजरी होऊ लागली, 1960 च्या काळात तत्कालिन मंत्री बाळासाहेब देसाई यांनी  गगनगिरी महाराज मूळ पाटणकर असल्याची माहिती दिली, 1995 साली मनुश्री बेटावर आश्रम उभारण्यात आल, त्या नंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम उभारण्यात आले.

Gagangiri maharaj
श्री क्षेत्र गगनबावडा गगनगिरी महाराज जिल्हा कोल्हापूर

दिनांक 4 फेब्रुवारी 2008 रोजी महाराजांचं खोपोलीत निधन झालं, गगनगिरी महाराजांची कीर्ती आजही महाराष्ट्रात पाहायला मिळते, कधी खोपोली मध्ये जात असाल तर नक्की एकदा त्या ठिकाणास भेट द्या, तुमचा गगनगिरी महाराजांन विषय काही अनुभव असेल तर नक्की खाली कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

gagangiri-maharaj-math
param pujya gagangiri maharaj

gagangiri maharaj math khopoli timings

मित्रांनो आठवड्याचे ८ दिवस हा मठ चाली असतो वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत. 

gagangiri maharaj math khopoli address

जर तुम्ही जुन्या पुणे मुंबई रोड ने खोपोली मार्गाने जात असाल तर इथे सोप्या मार्गाने पोहोचू शकता खोपोली मध्ये कोणाला हि विचार कोणीही तुम्हाला रास्ता सांगेल . – NH 48, Laxminagar, Khopoli, Maharashtra 410204

Where is Gagangiri?

प्रसिद्ध संत श्री गगनगिरी महाराजांनी स्थापन केलेला गगनगिरी आश्रम हिरव्यागार पर्वतांच्या कुशीत आहे. हा आश्रम व Gagangiri Maharaj Math Khopoli मध्ये आहे, रस्ता आणि रेल्वेने (मुंबई लोकल – सेंट्रल लाईन) दोन्ही मार्गाने पोहोचता येते.

gagangiri-maharaj-math
खोपोली येथील गगनगिरी महाराज योगाश्रम पाताळगंगा तीर्थक्षेत्र

 

गगनगिरी महाराज कोण या बद्धल माहिती आवडली असेल अशी आशा आहे मला, जर ही माहिती आवडल्यास ही माहिती फेसबुकवर किंवा ट्विटर वर शेअर करायला विसरू नका.


।। धन्यवाद ।।

Leave a Comment