makar sankranti essay | मकरसंक्रांत निबंध मराठी

मकरसंक्रांत निबंध मराठी

मकरसंक्रांत हा एक आपल्या भारतात हिंदू सणांपैक्की मुख्य सण मानला जातो. मकर संक्रांति (makar sankranti) हा जानेवारी महिन्यात साजरा होतो. जानेवारी महिन्यात मुखत्व १४ तारीख किंवा १५ तारखेला साजरा होतो. सूर्य जेव्हा दक्षिणायान उत्तरायण मकर राशीत येतो तेव्हा मकरसंक्रातीच्या सण साजरा होतो. आणि आपल्याला माहित आहे या वर्ष्याच्या पहिल्या सणा पासून सर्व सणांची सुरवात होते. आपल्या देशात या सणाला म्हणजेच (makar sankranti) मकरसंक्रांतला वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो जस कि आपल्या महाराष्ट्रात मकरसंक्रांत, दक्षिण भारतात पोंगल, उत्तर भारतात लोहरी, पश्चिम बंगाल मध्ये उत्तर संक्राती, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश मध्ये उत्तरायण किंवा खिचडी, आसाम मध्ये बिहू म्हणून हा हिंदू सण (makar sankranti) साजरा केला जातो.

Makar Sanskriti essay
makar sankranti essay in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now


आपल्या भारताला सर्वत्र विविधतेत नटलेल्या सर्व सणाची भारत भूमी म्हटले आहे, विविध सण विविध धर्माच्या लोकांद्वारे देशाच्या विविध भागात साजरे केले जातात. भारतात विविध धर्मच्या लोकांची आपापल्या सणांप्रती धार्मिक,पौराणीक श्रद्धा किंवा कारणे आहेत. यातच मकर संक्राती (makar sankranti) हा वेगळा सण आहे.
मकरसंक्रांत हा आपल्या भारतात शेतकऱ्याशी संबंधित आहे, हा सण साजरा केला जातो कारण हा सण पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी देवाचे आभार मानण्यासाठी आणि आपल्या शेतकऱ्यावर सदैव कृपा ठेवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. (makar sankranti) मकर संक्राती दिवशी शेतकरी आपल्या मेहनतीत लागणाऱ्या सर्व वस्तू, सजीव-निर्जीव जीव याची पूजा करतो, तसेच नांगर, कुदळ, बैल याची पूजा करतो. तसेच आपल्या शेतकऱयांवर देवाची कृपा राहू म्हणून सूर्य देवाची पूजा केली जाते.

  • मकरसंक्रांत, पोंगल म्हणजे काय ?

मकरसंक्रती (makar sankranti) हा सण हिंदू सणात एक मुख्य सण मानला जातो, हा सण जानेवारी मध्ये १४ किंवा १५ जानेवारीला वर्ष्याच्या सुरवातीला साजरा होतो , या सणापासून वर्ष्याचे सर्व सणाची सुरवात होती, हा सण मोठ्या उत्सहात पतंग उडवून, तिळगुळ वाटून साजरा होतो, हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात जेव्हा सूर्य दक्षिणायन ते उत्तरायण म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतो तेच मकरसंक्रांत (makar sankranti) सण साजरा होतो. सांगितल्याप्रमाणे भारतात विविध भागात विविध पद्धतीने साजरा होतो, त्याच बरोबर सूर्य देवाची पूजा केली जाते. आणि आपल्या देशातील विविध राज्यामध्ये वेवेगळ्या नावाने ओळखला जातो. या उत्सवात पिकांची चांगल्या उत्पादनं साठी भगवान सूर्याची पूजा करून नमन केले जाते. मकर संक्रती या सणामध्ये तीळ, गूळ, ज्वारी, बाजरी, हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, अशा गोष्टी सुगडात भरून त्या सूर्य देवाला अर्पण करतात तसेच लोकांमध्ये ते खाल्ले केले जाते. विविध ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी सूर्य देवाची पूजा आणि दान करण्याची प्रथा आहे.

  • कश्या प्रकारे मकरसंक्रांत साजरी केली जाते?

मकर संक्रात या दिवशी सूर्य दक्षिणायानातून उत्तरायणात प्रवेश करतो याला मकर राशीत प्रवेश असेही म्हण्टले जाते. (makar sankranti) मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते, आणि उत्तरेकडे जाते यालाच उत्तरायण म्हटले जाते, आणि हे शुभ मानले जाते, या दिवशी लोक पवित्र नद्यांमधून स्नान करून सूर्याची पूजा करून आशीर्वाद घेतात. या दिवशी लोक दान करतात असे मनातले जाते सूर्य देवा ला दान केल्यास सूर्य देव प्रसन्न होतात आणि मोक्ष प्राप्त होते. (makar sankranti) मकरसंक्राती सूर्याचा दक्षिण पासून उत्तर कडे प्रवेश शुभ असतो. आणि त्याच बरोबर आरोग्य च्या दृष्टिकोनातून हे खूप चांगले असते. या मुले दिवसही वेळ बदलते ,मकर संक्रती हा सण आनंद घेऊन येतो, तसेच सांगितल्या प्रमाणे पतंग उडवण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे गुजरात मध्ये सुद्धा पाहायला मिळते, आपल्या महाराष्ट्रात पतंग बाजींचे आयोजन केले जाते, यात सर्व वयातील लोक आनंदाने आणि उत्साहाने हा (makar sankranti) साजरा करत.

  • मकरसंक्रात आणि पतंग



मकर संकारातीच्या (makar sankranti) दिवशी आकाशात विविध रंगाचे पतंग बघायला मिळतील. लहान मुळापासून मोठ्या माणसापर्यंत पतंग उडवायची इच्छा असते त्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतात. सर्व जण या कशाची अगोदर पासूनच तयारी करतात विविध मार्केट मध्ये जाऊन पतंग त्याच बरोबरो मांजा खरेदी करतात. अनेक ठिकाणी तर पतंग उडवायची स्पर्धा देखील आयोजित केली जाते, जिथे गर्दी तिथे धमाल असते पतंग उडवण्याची दुसऱ्याची पतंग कापण्याची मजा काही औरच असते.

  • मकर संक्रती दिवशी पवित्र नंद्यात स्नान करावे.

मकरसंक्रात (makar sankranti) दिवशी महाकुंभमेळाचे आयोजन केले जाते, या पवित्र दिवशी स्नान करून त्या साठी लोक गंगेच्या घाटावर स्नान कार्याला देखील जातात. हे एका मेळाच्या स्वरूपात देखील आयोजित केले जाते. ज्याला कुंभ मेळा आणि महा कुंभ मेळा असे म्हंटले जाते. वाराणसी मध्ये दरवर्षी अर्ध कुंभ मेळा भरतो आणि प्रयागच्या संगमावर महाकुंभ आयोजित केला जातो. अश्याच प्रकारचं महाकुंभ प्रयाग, हरिद्वार, उज्जेन आणि आपल्या नाशिक येतील घाटावर साजरा केला जातो. असे म्हणे कि महाकुंभात स्नान केल्याने वर्षभराचे पाप धुऊन मोक्ष प्राप्त होईल. हि जत्रा मकर संक्रातीच्या (makar sankranti) दिवशी सुरु होते आणि महिनाभर चालते.

  • मकर संक्रातीला खान पिणं, तिळगुळाची देवाण घेवाण.

मकर संक्रातीच्या (makar sankranti) या सणाला नवीन पिकाची भातापासून खिचडी तयार केली जाते, ज्या मध्ये विविध भाज्या मिक्स करून खिचडी आणि गुळाची पोळी, तिळगुळ या सणाचे महत्वाचे पदार्थ आहे. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.

  • मकरसंक्रातीला दान केल्यास काय होते?

आपल्या भारत देशात विविध भागात विविध प्रकारे मकरसंक्राती (makar sankranti) साजरा करतात, त्याच प्रकारे अनेक ठिकाणी दान देण्याची प्रथा आहे, इतर राज्य मध्ये या दिवशी गरिबांना दान दिल जाते, जेवण बनवून त्यांना जेवायला दिल जाते, उत्तर भारतात मसूर, तांदूळ आणि पैसे गरिबांना दान केले जातात, तिळगुळ वाटून हा (makar sankranti) सण साजरा केला जातो, अन्नदान करून हे महान दान मानलं जात ते केले जाते. गोरगरिबांना आणि संतांना दान करून सर्वत्र आनंदचे वाटप हा या उत्सवाचा उद्देश आहे.

  • मकर संक्रांतीला या गोष्टीची काळजी घ्यावी ?

मकर संक्रातीचे (makar sankranti) स्वतःचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. देशातील लोक हा सण मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने साजरा करतात. हा सण हिंदूंचा एक प्रमुख सण आहे, याचा उद्देश परस्पर बंधुभाव, ऐक्य आणि आनंद सामायिक करणे हा आहे. या दिवशी लोक पतंग उडवून मजा घेतात त्याच प्रकारे पतंग उडवताना मुख्य प्राणाची हानी होणार नाही याची काळजी घ्या. पतंग उडवताना मांजा धार धार असल्यामुळे कोणतीही हानी होऊशकते याची काळजी करतच हा (makar sankranti) सण साजरा करावा.

  • किंक्रांत

संक्रांतीचा (makar sankranti) दुसरा दिवस म्हणजे किंक्रात म्हणून साजरा करतात.

संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभा साजरा करतात.
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस ‘मट्टू पोंगल’ म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो. शिवाय लहान मुलांना बोर स्नान म्हणून कार्यक्रम केला जातो.

Makar Sankranti Message

तर मित्रांनो मकरसंक्रांत (makar sankranti) निबंध व मकरसंक्रांत मराठी संदेश कसा वाटलं नक्की खाली कंमेंट बॉक्स मध्ये कालवा आणि जवळच्या व्यक्ती बरोबर आणि परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका.

।। धन्यवाद ।।
अनिल शिंदे

अनिल शिंदे

Leave a Comment