YouTube व्हिडिओ वरील डिसलाइक 👎 संख्या दिसणार नाही
या अगोदर इंस्टाग्राम चे हि लाईक संख्या दिसत नाही बहुतेक इंस्टाग्राम वर सुद्धा असं काही तरी चाललंय पण त्यांनी officially माहिती दिली नाही, जस कि आता गेल्या काही दिवसापूर्वी YouTube च्या एका ब्लॉग पोस्टद्वारे हि माहिती मिळाली कि YouTube व्हिडिओ वरील डिसलाइक 👎 संख्या दिसणार नाही.
हे का केलं कारण ?
YouTube व्हिडिओ क्रिएटर्स ला थोडासा दिलासा मिळावा अजून चांगले काम YouTube वर करावे त्यांचे मनोबल कमी होऊ नये म्हणून आणि क्रिएटर्स ला त्रास देण्यासाठी व डिसलाइक ची मोहीम हे सर्व असले प्रकार घडू नये आणि डिसलाइक चा वापर करणं वाढल्यामुळे YouTube ने हे पाऊल उचल सांगण्यात आलं आहे त्यामुळेच YouTube व्हिडिओ वरील डिसलाइक 👎 संख्या दिसणार नाही.
गेल्या काही महिन्यापासून हि चाचणी सुरु होती. आणि तरीही YouTube Video Creator ला या अगोदर हि एक असा पर्याय होताच कि ते आपल्या अपलोड केलेल्या व्हिडिओ वरील लाईक आणि डिसलाइक बंद करू शकतात. आणि कंमेंट्स सुद्धा बंद करू शकतात. ज्याने करून क्रिएटर ला त्रास कमी होऊ आणि अजून चांगल्या प्रकारे YouTube वर काम करून चांगले व्हिडिओस अपलोड करेल.
मित्रांनो डिसलाइक ची संख्या जरी विडिओ च्या खाली दिसत नसली तरी बटन मात्र दिसणारच आहे. डिसलाइक किती काय हे फक्त त्या क्रिएटर लाच समजणार आहे ना कि दुसर्यांना. या वरून हे हि चांगलाच आहे कि त्या video creator ला नक्कीच समजेल कि आपण अपलोड केलेला हा व्हिडिओ चांगला आहे कि नाही. आपण या पुढे अजून कस चांगलं काम करू शकतो आणि व्हिडिओ प्रेक्षकांना कसा आवडेल हे पाहू शकतो.
डिसलाइक ची संख्या बघूनच प्रेक्षक व्हिडिओ पाहत असतो आणि इतर सोबत पसरवत असतो. आणि दिसलाइक ची संख्या दिसत नसली तरी आपण त्या व्हिडिओ वरील कंमेंट्स द्वारे माहिती घेऊ शकतो कसा आहे तो व्हिडिओ चांगला आहे कि नाही हे कंमेंट्स मध्ये समजेलच पण क्रिएटर ने त्या व्हिडिओ वरील तो कंमेंट्स पर्याय चालू ठेवायला हवा.
YouTube चे असं म्हणणे आहे !
कि अनेकदा छोट्या व कुठल्याही क्रिएटर ला कमी लेखण्यासाठी व त्रास देण्यासाठी YouTube डिसलाइक ची मोहीम आखण्यात येत असे आणि हे मोठ्या प्रमाणात केलं जात असत. त्या मुले या क्रिएटर ला मासिक त्रास देखील होऊ शकतो. आणि तो depression मध्ये हि जाऊ शकतो म्हणूनच YouTube, YouTube व्हिडिओ वरील डिसलाइक 👎 संख्या दिसणार नाही असा प्रयोग केला.
या मागील उद्धेश चांगला असला तरी काही क्रिएटर्स कोणताही व्हिडिओ कचऱ्यासारखा अपलोड करून वेगळाच thumbnail’s लावतात आणि प्रक्षकांचे मन दुखावतात या मुलंच आज वर आपण डिसलाइक करणार हे बदलत आहे तरी हि एक प्रेक्षक म्हणून कंमेंट देऊन जरूर सांगू शकतो कि व्हिडीओ कसा आहे.
YouTube Rewind 2018 हा व्हिडिओ आज पर्यंतचा सर्वात डिसलाइक असलेला व्हिडिओ आहे आणि हा YouTube तर्फे अपलोड करण्यात आलेला.
Source: YouTube Creators
youtube removes dislike count | व्हिडिओ वरील डिसलाइक 👎 संख्या दिसणार नाही
तर मित्रांनो कशी वाटली ही पोस्ट नक्की कंमेंट करून सांगा आणि काही प्रतिक्रिया असतील तर खाली नोंदवा।।
धन्यवाद ।।