काबुल (अफगाणीस्तान) येथील श्री महाविनायक

काबुल (अफगाणीस्तान) येथील श्री महाविनायक…
 
अफगाणिस्थान मधील गणेशाच्या प्राचीन मूर्तींपैकी सर्वात महत्त्वाची मानली गेलेली मूर्ती म्हणजे काबुल येथील महाविनायकाची मूर्ती..काबुल येथील ही गणेशमूर्ती  वैशिष्ट्यपूर्ण आहे…
 
ही संगमरवरी मूर्ती काबुलपासून १० किमी. लांब असलेल्या ‘सकर दरा’ येथे मिळाली होती या मूर्ती बरोबरच येथे सूर्य आणि शिवची मूर्ती आढळून आली होती ही गणेशाची मूर्ती काबुल मधील शोर बाजार येथे आणण्यात आली व तेथे ती पुजली जात असे या मूर्तीचा सध्या ठावठिकाणा माहीत नाही…
 
या गणेशाला सर्पजानवे घातले असून छाती पिळदार दाखवण्यात आलेली होती या मूर्तीस चार हात होते मूर्तीचा वरचा डावा हात तुटलेला होता तर खालील दोन्ही हात शेजारी उभ्या असलेल्या गणांच्या डोक्यावर ठेवलेले होते..या गणांचे कुरळे केस कानातील पत्रकुंडले भारतातील गुप्तशैलीचा प्रभाव दाखवतात या मूर्तीवर ग्रीक शैलीचा कमी तर गुप्त शैलीचा जास्त प्रभाव आहे यावरून ही मुर्ती कदाचित इसवी सनाच्या चौथ्या शतकातील (कुशाण व गुप्त राजवटींच्या मधल्या काळातील) असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे…
 
वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे १९८० पर्यंत ही मूर्ती काबुलमधील हिंदूंकडून मंदिरात पुजली जात होती मात्र अफगाणिस्तानातील सोव्हिएत आक्रमणानंतर १९८० मध्ये ही मूर्ती काबुल मधील राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात आली त्यानंतर आलेल्या तालिबानी राजवटीत काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयाची नासधूस करण्यात आली या दरम्यान अनेक मूर्ती चोरीला गेल्या संग्रहालयातील रजिस्टर मध्ये या मूर्तीची नोंद आहे परंतु दुर्दैवाने तालिबान राजवटीनंतर या मूर्तीचा ठावठिकाणा अद्याप लागू शकलेला नाही त्यामुळे या मूर्तीच्या छायाचित्रावरच आता समाधान मानावे लागते…
 
माहिती : डॉ.आनंद कानिटकर..
――――――――――――

#आतुरता_गणरायाच्या_आगमनाची…

Leave a Comment