आज शनिवार आज पासून ३ दिवस सलग सुट्ट्या त्यातच एक झालेला प्लॅन
नमस्कार मित्रांनो मी आणि आपलं सर्वाचं स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये, आम्ही निघालोयत सातारा आपल्या महाराष्ट्रातील माझं आवडत्या जागेवर, सुट्टी आणि शनिवार आजपासून 3 दिवस सुट्ट्या मानून चाललोय सातारा ला सकाळी लवकर निघायचं होत पण नेहमी प्रमाणे उशीर झालाच आणि आम्ही निघालो सकाळी उशिरा, त्यात एक मित्र अजून वाट बघत उभा त्याला काय त्याची गाडी चालवता येत नसल्याने आमची वाट बघत बसलेला त्याला जायचं होतं, पुण्याला आणि आम्हाला सातारा, मी निघालो सकाळी आपलं एखाद दोन कपडे बॅगेत भरून बिना चहा पाण्याचा थेट विनोद कडे विनोद आपला एक मित्र नवी मुंबई मध्ये राहत असल्या मुळे तिथूनच नानासाहेब (म्हणझे नवीन ड्राइवर नवीन गाडी वाला) याला सुद्धा सोबत घायचा होता कसा बसा सोबत घेतला विनोद ला त्याच्या गाडीत बसवून पुढे पाठवल, त्यांतच आता आपल्या तिसऱ्या व्यक्ती ला घायचा होत तो म्हणझे सागर, सागर बराबर त्याची फॅमिली सुद्धा होती त्याला पनवेल मधून घेऊन पुण्याच्या दिशेने गेलो, विनोद नानासाहेब हे दोघे नानासाहेबची गाडी घेऊन पुण्याला पोहोचले पुणे-सातारा रोड तिथून नानासाहेबच घर 2 किलोमीटर वर होत तो आपला विनोद ला तिथे सोडून कशीबशी गाडी चालवत पोहोचला, आम्ही मागेच होतो विनोद पुणे-सातारा रोड वर थांबला तिथून आम्ही विनोद ला घेऊन साताराच्या दिशेने गेलो
मुंबई मधून निघता निघत नाकीनव आलं त्यात पुणे पासून त्या ट्रॅफिक मधून कसा बसा रस्ता काढत आपल्या सातारा मेगा रोड वर लागलो पुण्यामध्ये सातारा रोड वर खूप खड्डे असल्यामुळे गाडी सावकाश चालवत खेड शिवापूर टोल नाक्यापर्यंत पोहोचलो तिथून चहा पाणी करत पुन्हा सातारच्या दिशेने खांबडकी घाट लागला घाट मधील वातावरण अतिशय उत्तम होते आणि तिथे थांबून चहा घेत नजारा बघत बसू वाटत होत, घाट क्रॉस झाला सातारा वाई भुईंज गाव लागू लागली मला अजून पर्यंत माहीत नव्हतं नेमकं जायचं कुठं नंतर थेट सातारा शहरात घुसलो तिथून रेहमतपुर रोड ला लागलो तिथे वाडा चिरेबंदी नावाच्या हॉटेल मध्ये गेलो
छान प्रकारे जेवलो जेवणाची चव चांगली होती मालकाला शेवटचं बोलून तिथून निघालो गाडी रेहमतपुर च्या दिशेने जाऊ लागली नंतर माहीत पडलं वडुज ला जायचंय, सातारा always दिल के पास सातारा मध्ये कुठं का जाईना चालतंय अस म्हणत औंध इथे प्रवेश केला सर्वत्र पवनचक्क्या दिसत होत्या आणि जाता जाता मोरच दर्शन सुद्धा झाले.
वडुज पासून १५-२० मिनिटे अंतरावर असलेल्या गुरसाळे गावात पोहोचलो, पोहोचता पोहोचता संध्याकाळ होऊ लागली होती अन पावसाळ्याच्या दिवशी तिथं दमट वातावरण झालं होतं
संध्याकाळची वेळ होती चहा घेतला अन तिथून फिरायचं म्हणत सागरच्या वस्ती मागील शंकरच्या मंदिर कडे गेलो मित्रांनी हे गाव अस तास नव्हतं सताऱ्यामधील हर एक गाव माग काय ना काय ऐतिहासिक नाहीतर इतिहास असतो तसच सागरच्या गावात ५ शिवलिंग होत सर्वच खूप अतभूत होती मंदिर पण खूप छान होती त्यातील माझे ४ शिवलिंग बघून झाली पण १ मात्र गावच्या खूप लांब असल्यामुळे अन सागरला माहीत नसल्यामुळे त्याचे दर्शन नाही झाले भावलिंग हा सागरच्या वस्ती मागील शिवमंदिर तिथे २०-३०फूट उंच अशी शिव शंकराची मूर्ती होती
आणि काय भारी दिसत होती काय सांगू खूप अप्रतिम विहंगम नजरा दिसत होता फोटो पाहू शकता खूप सारे फोटो इथे काढले कधी इथे जायचं असेल तर जरूर सांगा,
सातारा-वडुज-गुरसाळे अस ठिकाण, तर मित्रांनो सागरच्या वस्ती मागील भावलिंग शिव मंदिर आणि तिथलं सुंदर रूप बघून झाल्यावर उत्सुकता लागली होती ती म्हणझे बाकीचे मंदिर बघण्याची सागरच्या वस्ती पासून ३ किलोमीटर अंतरावर त्याच गुरसाळे हे गाव होत गावात ३ शिवलिंग होती रामलिंग, सोमलिंग, गुपितलींग हे आणि गावापासून नाहीतर गावात शिवलिंग अस मंदिर होत पुढे कधी जायचा चान्स भेटला तर नक्की शिवलिंग मंदिर बघून येईल तर मित्रानो सोमलिंग मंदिर आणि गुपितलींग हे दोन्ही एकाच ठिकाणी होती आश्चर्य म्हणझे गुपितलींग हे सोमलिंग मंदिरच्या खाली होती त्यासाठी छोट्या पायऱ्या होत्या
सोमलिंग मंदिरात पाय ठेवता तिथे छोटस होल होत
त्यातून गुपितलींग दिसतं गुपितलींग बागण्यासाठी मी प्रयत्न केला खाली जायचा पण जागा खूप भयानक वाटत होती साप विंचु यांची भीती वाटत असल्यामुळे
थोड्या पर्यंत पोहोचता पोहोचतं वरती आलो आणि सोमलिंग मंदिरात प्रवेश केला सोमलिंग दिवाचं दर्शन केलं
आणि निघालो रामलिंग मंदिराकडे,रामलिंग मंदिरे सर्व मंदिरपेक्षा खूप वेगळं आणि अति प्राचीन मंदिर होत हडप्पा संस्कृती सारखं वाटत होतं मंदिरात प्रवेश करताना तिथर मुलं होती जी साफ सफाई करत होती कचरा गोळा करत होती
मंदिरच दार पुढे केलं समोर एक भलं मोठं वडाचे झाड वडवृक्ष दिसलं खाली एक कोरीव काम असणार त्यावर नक्षी काम असणार एक दगड दिसला पुढे गेलो मंदिराकडे टक लावून बघत बसलो सर्वत्र मंदिरावर कोरीवकाम नक्षीकाम आणि छोट्या छोट्या अश्या वास्तुकलेच दर्शन झालं
शिवकालीन पुष्करणी आणि बारव बघायला भेटलं मंदिरात गेलो जाताना दगडावर छान सुरेख कलात्मक, स्थापत्यकाम दगडी कोरीवकाम पाहून अचंबित झालो,
हेमाडपंथी शैलीच्या या मंदिर समोरील असलेलं पुष्करणी हे इथलं खास वैशिष्ट्य पावसाळ्यात ही पुष्करणी भरलेली होती आणि खूप छान अस मंदिर दिसत होतं फोटो मध्ये पाहतच असाल मंदिरात शंकराचं दर्शन
झाल्यावर ३-४ खांब बघायला भेटशील अगदी सुष्मकलेच दर्शन घडून देतील आणि बघत राहाल अस कला कुसरीच काम या दगडावर झालेलं बघायला भेटेल
तिथून खाली पुष्करणी साठी खाली जाता येत आणि त्याच पायऱ्यानी वरती येता येत
खूप छान अशी पुष्करणी मी अजून पर्यंत पहिली नव्हती सर्व मंदिर
आणि आजूबाजूच परिसर बघितल्या नंतर तिथून बाहेर निघालो आणि गावात जाण्यास निघालो पुन्हा घरी येऊन आराम करत नंतर सागरच्या घरच्या छतावर संध्याकाळ चा नजरा बघत मस्त संध्याकाळ गेली शेतात गेलो ऊस खाला
काही भाज्या तोडल्या शेत बघितलं मला तिथे मोर पाहायचं होता सागरच्या म्हणण्या प्रमाणे सागरच्या घरा समोर खूप मोर येत असतात आणि आम्हीं या गावात येताना मोर सुद्धा पहिला होत रोज सकाळी मोराचे आवाज कानावर येत होते, संध्याकाळ मस्त गेल्यावर रात्री जेवणावर ताव मारत झोप घेतली गावाला तस लवकर झोपतात आणि लवकर उठतात तसच उठून हरी भाऊ समेट नाश्ता वैगरे करत थोडं जेवत सकाळी सकाळी निघायचा बेत केला
आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने येण्यासाठी तयारीला लागलो.
अशी छान ट्रिप गावाकडील झाली सतारामधील वडुज, गुरसाळे हे गाव बघायला भेटल
तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा हे तर माझ्या डायरी मध्ये लिहायचं होत पण ब्लॉग हीच आपली डायरी 😇