Bhigwan Bird Sanctuary
गावच्या गोष्टी आणि आमचं गावातील घर आज वाचा माझ्या गावा बद्धल थोडं काय खास गावाकडे
आजच्या या लेख मध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे या गावाबद्धल थोडक्यात सांगायचं–
गावात पोहोचताना लागत तिथून एक रस्ता जिंती या गावात जातो आणि एक माझ्या गावी गावच्या वेशीवर म्हणझे आम्ही त्याला गेट म्हणतो गेटवर माझ्या एका मित्राचं दुकान आहे तिथे गावचे लोक फिरायला येतात चांगला सुंदर गाव असल्यामुळे गावात पोहोचताच जुन्या आठवणी ताज्या होतात शाळेचे दिवस
कसे शाळा बुडवून फिरायला जायचो इकडे तिकडे शेतात मित्रांच्या मळ्यात रानमेवा खात उंदडत होतो ।
गेटपासून आत आल्यावर गाव सुरू होत आणि जुन्या आठवणी सुद्धा 2 मिनिटाच्या अंतरावर आमचं घर आहे घरचा वाडा पडलेला फक्त १ रूम आहे त्यात मोठे काका आणि काकी राहतात त्याच वाड्यात आम्ही एकेकाळी राहायचो गलक घर वडील आर्मी मध्ये 3 भावंड आई आम्ही एकी कडे आणि दुसरी कडे काका काकी जुन्या काळापासून राहत असल्यामुळे गावातील जुनी लोक आवर्जून अजून हाक मारत ।
डिसेंबर मध्ये दत्त जयंती असते आणि जत्रा सुद्धा या दिवशी गावात जे गाव सोडून दुसरी कडे राहायला गेलेले सुद्धा या दिवशी एकत्र येतात आणि दत्त मंदिर पालखीच दर्शन घेतात ।
दर सोमवारी गावचा बाजार भरतो गेल्या 2-3 वर्ष झाले अजून मला बाजार भेटला नाही बाजार अनुभवच आहे त्या साठी आवर्जून जाईल एकदा पण बाजार आणि आम्ही खूप आठवणी आहे आमच्या भावंडं च्या आठवणी दार सोमवारी सुखी भेळ आणि शेंगदाणे खायचो बाजार खूप आकर्षक होता छोट्या गाड्या घायचो आणि मित्रा बराबर खेळत बसायचो ।
आमची शाळा बालपण सर्व इकडेच गेलं मानून गावची ओढ कमी नाही आणि कधी कमी होणार ही नाही नदी काठीचे क्षण आज काही क्षण आमच्या गावच्या नदी काठी सांगायला भरपूर काही आहे मनात सुद्धा आहे कार्यक्रम चालू असताना मनात विचारच गोंधळ घातलेला या जगात काही राहणार आहे की नाही का देव सर्व मिटवणार गाव गावात वैर चालू आहेत.
भाव भावाला विचारत नाही माणसं माणसांना विचारात नाहीत कोण कोणालाच बोलत नाही काई गुर्मी आली काय घेऊन आलेला काय घेऊन जाणार आहे कश्याला कोणाशी वैर ठेवायचे आणि आता तर हा वेगळच नाही संपूर्ण जगावर संकट आणून ठेवलं आहे त्याला निपटायच का हे असले भांडण मनात ठेवायचे काल सांगितल्या प्रमाणे या वर्षात माणसाचं काहीच सांगता येत नाही आज आपण बोलल्या माणसाची उद्या बोलू की नाही याची सुद्धा हमी नाही.
हे वर्ष आणि ही जगावर आलेले संकट हे सुद्धा राहू देत नाही माणसाला भीती पोटीच माणूस मारून जातोय मनात या संकटविषय एवढी भीती निर्माण झाली आहे पुढचा १०० वर्ष्यात हे वर्षां बद्धल सांगतील लोक. हे फोटो टाकळी या गावच्या नदी काठ चे आहेत हे गाव पुणे पासून 140 किलोमीटर भिगवण गाव आहे तिथून लासुरने येतून एक वळण आहे ते नदी काठुन टाकळी गावासाठी रस्ता मिळतो मध्ये एक इंग्रजांनी बांधलेला पूल आहे त्याला भरपूर वर्षे झाली तो पाहायला भेटेल आणि भीमा नदीचं पाणी सर्वत्र दिसेल.
रस्त्याच्याआजूबाजूला पाहण्या सारखे सुंदर दिखावा सर्वत्र हिरवे गावात लांब मैदाने ते ही हिरवीगार आहे पूल पर्यंत रास्ता खड्डे वगरे आहेत मुरूम माती टाकली आली पूल नंतर रास्ता निमुळता आणि चांगला आहे गावा पर्यंत आहे तिथून जिंती , कात्रज, हे गाव अजून गावे आहेत ।। पण देखावा मात्र सुंदर आहे त्याचा गावच्या मध्ये टाकळी आणि पालसदेव गावाच्या मध्ये एक मंदिर आहे त्याचे वैशिष्ठ आहे ते पाण्या मध्ये आहे त्याची माहिती नेट वर भेटेल खूप आश्चर्यचक्कीत गोष्ट आहेत त्या बद्दल सर्व माहिती इंटरनेट वर भेटेल.
न हवा असणारा दिवस आज आम्हला पहावा लागला मोठे काका आमच्यात नाही राहिले दीर्घ आजाराने झाले माणसाला एक ना एक दिवस सर्वाना जायचे असते देवाला आवडनारे लोक देव लवकर बोलावतो एवढं मात्र खरं आहे ।
हे फोटो आज सकाळचे आहेत नदी काठ चे टाकळी गावातून ।
Woww very nice 👌🏻👌🏻 vachun khup chan vatala.. jasa enjoy kela lahanpani te dolyasamor yevun gela 👌🏻👌🏻