कोंडेश्वर मंदिर
Kondeshwar Temple Badlapur हे अति प्राचीन शिव मंदिर आहे, महाशिवरात्रीला जत्रा , मन तृप्त करणारी निसर्गाची देणं, सुंदर स्थळे, हिरवीगार डोंगर रांगा, kondeshwar temple शिव मंदिर असून मंदिराजवळील प्रदेश अतिशय सुंदर असून मनमोहक आहे.
Kondeshwar Temple Lake Badlapur: कोंडेश्वर मंदिर आणि जवळील ठिकाणी कस पोहोचायचं आणि भेट देण्याची योग्य वेळ काय कस आहे हे सर्व माहिती तुम्हा या पोस्ट मधून भेटेल जर लेख किंवा माहिती आवडल्यास जरूर मित्र मंडळी आणि परिवारासोबत शेअर करा.
टीप :- निर्सगाचा आनंद घ्या निसर्गाशी मस्ती नको, kondeshwar temple badlapur मंदिर च्या अवतीभवती पाण्यात मस्ती करू नये, निसर्ग पाहायला या आनंद घ्या, पण पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नका, खास करून मुंबई किंवा इतर शहरातून येते पोहोवण्यासाठी येतात ज्यांना येथील माहिती नाही त्यांनी बिलकुल असा पर्यटन करू नये जेवढ ठिकाण सुंदर आहे तेवढ घातक सुद्धा आहे लक्ष्यात ठेवा, गावकरी तसेच प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा.
The Way Kondeshwar Badlapur |
Kondeshwar Temple Badlapur History
बदलापूर मधील कोंडेश्वर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे बदलापूर रेल्वे स्टेशन वरून ५-६ किलोमीटर अंतरावर असलेले भगवान शिव यांना समर्पित कोंडेश्वर मंदिर हे दाट जंगलाच्या मध्यभागी असलेले एक प्राचीन हत्ती मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी शैलीतील वास्तूंचे प्रतिनिधित्व करते आणि काळ्या दगडांनी बनवले गेले आहे. मुख्य गर्भगृहाभोवती अनेक देवळे आहेत. महाशिवरात्री हा या मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव आहे. हे मंदिर खडकाळ प्रदेशात असल्याने, पावसाळ्यात या मंदिराला भेट न देण्याचा सल्ला दिला जातो. या मंदिराच्या परिसरात श्री खतेश्वर महाराज समाधी, एक तलाव आणि धबधबा आहे. हे या शहरातील सर्वोत्तम मंदिर आहे.
खेड्यातील रस्त्यांमधून काही किमी चालणे अत्यंत सुंदर आहे, विशेषत: पावसाळ्यात. मंदिर परिसर स्वच्छ आणि प्रशस्त असून आसन करण्यासाठी भरपूर जागा आहे. मंदिराच्या अगदी पाठीमागे धबधब्याचा एक विश्वासघात करणारा विभाग बॅरिकेड आहे आणि प्रवेश करण्यास सुरक्षित नाही, विशेषत: मुसळधार पावसात. मुख्य मंदिराच्या सभोवताल अशी छोटी मंदिरे आहेत जी पाण्याखाली गेली तर तिथे प्रवेशयोग्य नाही तिथे कुंड आहेत आणि ते पावसाळ्यात खूप घातक आहे. ते किती घातक आहे ते तेथील गावकर्यांना विचारू शकता. पार्किंगच्या ठिकाणी कोणतीही बस सेवा वगैरे नाही. आणि जेवण किंवा नास्ता करायचा असल्यास परिसराबाहेर वडा पाव, बिस्किटे, चिप्स इत्यादी काही लहान चाय टपरी आहेत. आणि मित्रांनो मंदिर जवळ तेथे भरपूर डस्टबिन आहेत, दुर्दैवाने काही पर्यटक अजूनही रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकने नदीकाठ कचरा करतात ते टाळायला हवं.
Kondeshwar Temple Lake |
मी पावसाळ्यात किंवा मनाला वाटत असल्यास जरूर भेट देतो, या ठिकाणी खूप शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात आल्या सारखं मोकळा श्वास घेऊ शकतो, या ठिकाणी आणि मी कोंडेश्वर मंदिर व जवळील ठिकाणी भेट दिली होती. आम्हाला माहित नव्हते की आपल्याकडे असे सुंदर आणि आश्चर्यकारक ठिकाण आहे ज्याभोवती हिरवळ, डोंगर आणि Dhangar Waterfall आहे, कोंडेश्वर ठिकाण हे माथेरान मार्गावर आहे, मंदिराकडे जाणारा रस्ता चांगला आहे आणि आपण दृश्यांचा आनंद घेऊ शकता. तसेच वरील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे समोर लेक आहे, डोंगर झऱ्यातून हे पाणी मंदिरच्या मागून येते व समोर छोट्या लेक ला मिळते.
Kondeshwar Lake View Badlapur |
मंदिराकडे जाताना (single rout) एका मार्गाने जाऊ येऊ शकतो, मंदिरात जाताना अगोदर सांगितल्या प्रमाणे तेथे बस किंवा टेम्पो ट्रॅव्हलरने तेथे जाण्याची काहीच पर्याय नाही, कारण तिथे जाण्या-येण्यासाठी खूप वेळ लागतो व प्रवासी मिळतील नाही मिळतील मानून सहसा इथे रिक्शा व अन्य गाड्या जात येत नाहीत. मंदिराभोवती छोटी दुकान आहे जिथे आपल्याला चवदार वडा पाव, भज्जी, चहा, बिस्किटे, चिप्स इत्यादी मिळतं, अशी जागा आहेत जिथे एखादा माणूस बराच तास आरामात बसून मुक्त मनाने निसर्गाचा आनंद लुटू शकतो. इथं पर्यंत माहिती वाचत असल्यास धन्यवाद.
Kondeshwar Badlapur….. निसर्ग हा सर्वोत्तम आहे
येथे निसर्गाची खरी सुंदरता पाहिली जाते, ती जागा म्हणजेच कुंडेश्वर म्हणून ओळखले जाते. पर्यटकांना या सुंदर सहलीचे नियोजन करण्यास मदत होऊ शकेल: मॉन्सूनला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम वेळ आहे, हिरवा निसर्ग पाहण्यासाठी पावसात भरपूर पर्यटक इथे भेट देत असत. काही वर्ष्यांपासून काही लोक येथील निसर्गाशी अवहेलना करत मस्ती करतात, त्याच मुले प्रशासनाने पावसाळ्यात बंदी आणली आली. शक्य तो पावसाळ्यात जात असाल तर थोडीशी माहिती घेऊन जावा.
बदलापूर कोंडेश्वर मंदिर आवश्यक माहिती:
बदलापूरमार्गे – खारवाई-भोज-कोंडेश्वर, रेल्वेमार्गे: येथून
बदलापूर पूर्व स्टँडवरून ऑटो भाड्याने घेऊ शकतो.
कोंडेश्वर मंदिर बदलापूर राहण्याची सोय?
भोज रिसॉर्टमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.
कोंडेश्वर मंदिर परिसरात जेवणाची सोय?
kondeshwar madir जवळ चहा आणि नाश्ता उपलब्ध आहे, दुपारच्या वेळेत जेवण स्वतः कॅरी करू शकता किंवा कोंडेश्वर मंदिराजवळ भोज रिसॉर्टमध्ये जेवणाची सोय होऊ शकते.
Kondeshwar temple badlapur भेट देण्याची ठिकाणे:
शिव मंदिर, कोंडेश्वर धबधबा, भोज धरण व तलाव, डोंगर धबधबा, धनगर धबधबा, खुला निसर्ग रमणीय ठिकाणं चिखलोली, माथेरान डोंगर रांगा.
# टिपा: आपण कोंडेश्वरजवळ डोंगरावरून पडणाऱ्या पाण्याचा धोका पाहत असल्यास सावधगिरी बाळगा, पावसाळ्यात मंदिर जवळील धबधब्यात व बाजूच्या काही परिसरात जाण्यास टाळा पावसाळ्यात शक्य तो हे मंदिर आणि हा परिसर बंद असतो कारण खूप जण पावसाळ्यात मृत्यू ला आमंत्रण देतात मानून काळजी पूर्वक निसर्गाची मस्ती नको .
Kondeshwar View Near Temple |
आशा करतो हि kondeshwar temple badlapur माहिती तुम्हाला आवडली असेल, मित्रांनो हे मंदिर खूप छान आहे, तसेच सभोतालचा परिसर सुद्धा. फक्त एवढंच कि दिलेल्या नियमांच पालन करा, पावसाळ्यात मंदिरच्या मागच्या परिसरात जाऊ नका, खुल्या निसर्गाची मज्जा लुटा पण निसर्गाशी मस्ती नको. खूप आनंदी राहा खुश राहा माहिती आवडल्यास मित्रां बरोबर जरूर पोहोचवा.
कोंडेश्वर मंदिर बदलापूर संबधी प्रश्न उत्तरे :
How to reach kondeshwar temple from badlapur station :
26 min (7.5 km) via Bhoj Village Road
कोंडेश्वर मंदिर पासून रेल्वे स्टेशन जास्त पर्यायी रिक्षा वैगरे मिळत नाहीत शक्य तो स्वतःची गाडी ने कोंडेश्वर मंदिर प्रवास करावा, कोंडेश्वर पासून स्टेशन किंचित मिळाली तर मिळेल चांगलेच भाडे तुमच्याकडून आकारण्यात येईल, म्हणून शक्य तो स्वतःच्याच्या गाडीने इथे भेट देऊ शकता.
Kondeshwar Temple, Badlapur address: Kondeshwar Temple Rd Maharashtra
विशिष्ठ असा पत्ता काय विचारायचं बदलापूर मधील प्रसिद्ध ठिकाण आहे शंकराचं मंदिर आहे कोंडेश्वर मंदिर बदलापूर Kondeshwar temple badlapur map असा मॅप मध्ये टाकलं तर बरोबर समजेल नक्की हे ठिकाण आहे कुठे. मित्रांनो बदलापूर कोंडेश्वर बद्धल खूप प्रश्न उत्तरे आहेत, जर आपण निसर्ग पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी जात असाल तर हि माहिती तुमच्या साठी पण या व्यतिरिक्त पाण्यात मज्जा मस्ती धम्माल करायचा विचार असेल तर तुम्ही या बाबत बातम्या ऐकू शकता, म्हणूनच निसर्ग अनुभव महादेवाचं दर्शन घ्या आपल्या परिवारासोबत quality टाइम घालवा व आनंदी राहावा.
धन्यवाद #कोंडेश्वर #बदलापूर #kondeshwar #temple #badlapur
2 thoughts on “Kondeshwar Temple Badlapur – कोंडेश्वर मंदिर बदलापूर”