Mapro Garden Tour Mahabaleshwar | महाबळेश्वर मधील प्रसिद्ध मॅप्रो गार्डन

 
 

नमस्कार मित्रांनो आज आपण वाचणार आहोत Mapro Garden Mahableshwar बद्धल थोडं काही, मॅप्रो गार्डन हे महाबळेश्वर पाचगणी रोडवरील गुरेघर या गावात असणार प्रसिद्ध ठिकाण, मॅप्रो गार्डन ला कसं जाता येईल, काय पाहायचं तिथे, काय आहे मॅप्रो गार्डन मध्ये, त्याच बरोबर माझा अनुभव शेअर करणार आहे, तुम्हाला कधी जायचं मन झाल्यास ही छोटीशी माहिती जरूर वाचा.

 
पावसाळ्यात जून २०२२ मध्ये मी महाबळेश्वर थोडा एक दिवस फिरण्यासाठी गेलेलो त्यात एक दिवस असल्याने कुठे जायचे काय करायचं कसा प्लॅन करायचा महाबळेश्वर मध्ये फिरण्यासाठी हे सर्व प्रश्न पडलेले, त्यातच दोन तीन पॉईंट फिरता येतील असे काही महाबळेश्वर मधील ठिकाणं होती कुठे जायचं ते (Mahabaleshwar Points) पॉईंट्स ठरवले आणि निघालो सुरवातीला प्रतापगड किल्ला कडे नंतर प्रतापगड च्या पायथ्याशी असणाऱ्या शिवकालीन खेडेगाव या ठिकाणीं.
 
strawberry in mahabaleshwar
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

 
महाबळेश्वर म्हटलं की स्ट्रॉबेरी आलीच आणि मॅप्रो त्यासाठी प्रसिद्ध ठिकाण त्याच बरोबर इथे (strawberry festival in mahabaleshwar) सुद्धा होतात, साताऱ्यातुन निघालो ५०-६० किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर आहे म्हणत गेलो जाताना खूप छान वातावरण होत, पाऊसचं आगमन महाराष्ट्रात झालंच होत थोडा थोडा पाऊस होताच त्याच छान वातावरणात फिरायचं ठरवलं सुरवातीला भरपूर बघण्यासाठी भरपूर ठिकाणं पॉईंट्स आहेत त्यांत आम्ही प्रतापगड किल्ला, प्रतापगडच्या पायथ्यशी असणार शिवकालीन खेडेगाव हे ठिकाणं आम्ही सुरवातीला पहिली.
 
Entry Mapro Garden mahabaleshwar

 

 
नंतर मॅप्रो गार्डन रोड लाच असल्याने तिथं जायचं ठरलं , तसही महाबळेश्वर फिरताना भरपूर स्पॉट्स पॉईंट्स ठिकाण अगदी रोड लागतच आहेत, एक दिवस आल्या मुळे आणि वेळ नसल्याने खूप काही मिस झालं, मॅप्रो गार्डन मी ऐकून होतो पण कधी पाहिलं न्हवतं ना या बद्धल कधी वाचलं ना कधी विडिओ बघितला, नक्की काय आहे मॅप्रो हे सुद्धा माहीत न्हवतं अहो मी महाबळेश्वर कधी फिरलोच न्हवतो म्हणून माहीत कस असणार म्हणून एक दिवसाची ट्रिप म्हणून महाबळेश्वर फिरायचं ठरवलं.
 
mapro free juice

 

 
मॅप्रो गार्डन ला कस जायचं? मॅप्रो गार्डन ला जात असाल तर स्वतःची गाडी असेल तर महाबळेश्वर पाचगणी रोड ला आहे , म्हक्बाळेश्वर पासून ११ किलोमीटर तर पाचगणी पासून जेमतेम ७ किलोमीटर अंतरावर आहे, चार चाकी किंवा दुचाकी ने तिथे पोहोचू शकता, मॅप्रो गार्डन हे १९५९ मध्ये स्थापित झाली आहे त्याचे मालक किशोर वोरा, मॅप्रो गार्डन ची माहिती आपल्या वेबसाईटवर दिली आहे कशी वाटली नक्की कंमेंट करून सांगा बाकी मॅप्रो फिरण्यासाठी एकदा बागण्यासाठी चांगली जागा आहे.
 
mapro garden restaurant

 

 
मॅप्रो गार्डन मध्ये कुठली ही एन्ट्री फी घेतली जात नाही मॅप्रो गार्डन ची वेळ दररोज सकाळी आठ ते संध्याकाळी आठ अशी आहे हे ठिकाण महाबळेश्वर पाचगणी रोड ला आहे आत मध्ये store, restaurant, garden आहे त्याच बराबर फोटोसेशन करू शकता, strawberry पासून बनलेले chocolates, अन्य काही प्रॉडक्ट आहेत. वेगवेगळे जेली, सरबत थोडी महाग पण डिस्काउंट वाले. तसेच Mapro Garden Restaurant मध्ये भेट देऊ शकता icecream वैगरे मिळते, मोकटेल वैगेरे, सँडविच पिज्जा वैगरे सुद्धा. त्याच बरोबर इथे चमचमीत पदार्थ मिळतात, मित्रांनो इथे Strawberry festival सुद्धा होत.
 
Juice Mapro Garden bottel

 

 
मॅप्रो गार्डन महाबळेश्वर इथे आहे जर कधी महाबळेश्वर ट्रिप चा प्लॅन करत असाल तर सर्वात शेवटी मॅप्रो ला भेट देऊ शकता, इथे मोठी जागा असून त्यात चोकलेट फॅक्टरी आहे, छान अस सुंदर सुंदर फुलांचं गार्डन आहे छोटासा झरा आहे त्यात वेगवेगळ्या कलर चे मासे आहेत, जागोजागी फोटोग्राफी साठी काही न काही तरी क्रीटिव्ह बनून ठेवलं आहे (photography in mapro garden), लहान मुलांसाठी खूप मोठी जागा आहे त्यातच शॉप आहे तिथून तुम्ही वेगवेगळे जुस घेऊ शकता जस की अप्पल ब्लू बेरी कच्ची कैरी (६०० रुपये) त्याच बरोबर चॉकलेट्स फाफडा, सॅंडविच पास्ता, पिझ्झा, व चमचमीत पदार्थ इथे मिळतात.
 
Mapro Garden Mahabaleshwar pachgani

 

तर मित्रांनो कधी महाबळेश्वर चा प्लॅन करत असाल तर नक्की भेट देऊ शकता Mapro Garden ला तसेच तुमचे अनुभव तुमची प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवू शकता व ही माहिती आपल्या जवळील व्यक्ती सोबत शेअर करू शकता आणि इतर social media वर सुद्धा शेअर करू शकता.
 

अधिक माहिती साठी व पाहण्यासाठी तुम्ही वरील विडिओ वर क्लिक करू शकता तसेच विडिओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर आणि subscribe करा आपल्या youtube चॅनेल ला. तसेच कृपया ही माहिती आवडल्यास कंमेंट करायला विसरू नका.

 
धन्यवाद 🙏
 
 

Leave a Comment