BRO Recruitment 2024: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नोकरीची मोठी संधी… एकूण 466 जागांवर भरती.. 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र…

BRO Recruitment 2024
BRO Recruitment 2024

BRO Recruitment 2024: संरक्षण मंत्रालयाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने विविध पदांसाठी नोकरी पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. तसेच या रिक्त पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात ही शॉर्ट आहे. त्यानुसार, पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख अद्याप ठरलेली नाही. BRO Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

एकूण रिक्त पदे: 466

नोकरीचे ठिकाण: या भरती अंतर्गत नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात असणार आहे. तसेच मुख्यत्वे बॉर्डर भागात नोकरी असण्याची शक्यता जास्त आहे.

रिक्त पदाचे नाव आणि पदांची संख्या | Post name and Post Number BRO Recruitment 2024

  • ड्राफ्ट्समन या पदासाठी 16 पदे
  • पर्यवेक्षक या पदासाठी 2 पदे
  • टर्नर या पदासाठी 10 पदे
  • मेकॅनिक या पदासाठी 1 पद
  • ट्रान्सपोर्ट मेकॅनिक ड्रायव्हर या पदासाठी 417 पदे
  • ड्राइव्ह रोलर या पदासाठी 2 पदे
  • उत्खनन यंत्र ऑपरेटर या पदासाठी 18 पदे

शैक्षणिक पात्रता | BRO Recruitment 2024 Eligibility Criteria

पदानुसार या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता निश्चित केली गेली आहे. सर्व साधारणपणे, मान्यताप्राप्त मंडळातून 10वी किंवा 12वी परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज यासाठी करू शकतात. उदाहरणार्थ, ड्राफ्ट्समनच्या पदासाठी, 10वी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रात डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी पदवी असलेले उमेदवार पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करू शकतात.

हे देखील वाचू शकता: Post Office Agent Vacancy: पोस्ट ऑफीसमधे नोकरीची उत्तम संधी… फक्त 10वी पास वर मिळणार नोकरी…

त्याचप्रमाणे, शैक्षणिक पात्रता ही उर्वरित पदांसाठी वेगळी असून उमेदवार संबंधित क्षेत्रातील आयटीआय किंवा डिप्लोमा प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. ड्रायवर, ट्रान्सपोर्ट, मेकॅनिक ड्रायव्हर आणि रोड रोलर ड्रायव्हर या पदांसाठी, फक्त जड वाहन चालविण्याचा परवाना असलेले आणि सोबतच इयत्ता 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार फॉर्म भरू शकणार आहेत.

वयोमर्यादा | BRO Recruitment 2024 Age Criteria

18 ते 27 वर्षे या वयादरम्यान या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी उमेदवारांची निवड कशी केली जाते? | BRO Recruitment 2024 What is selection Procedure?

या भरती अंतर्गत रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या अनेक फेऱ्या पार केल्यानंतर मगच करण्यात येते. यासाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि नंतर पीएसटी/पीईटी परीक्षा असते. पोस्टवर अवलंबून, तुमची ट्रेड टेस्ट किंवा स्किल टेस्ट देखील घेण्यात येईल. शेवटी, तुमच्या कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. एक टप्पा उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढील टप्प्यात जातील आणि सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच निवड अंतिम होते.

या वेबसाइटवर अर्जाचा फॉर्म भरा | BRO Recruitment 2024 Apply on this website

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधील या पदांसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करता येणार आहेत. उमेदवारांना यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या ऑफिशियल वेबसाइटवर जावे लागेल. आणि या भरतीची ऑफिशियल वेबसाइटवर bro.gov.in ही आहे. या वेबसाईट द्वारे तुम्ही अर्ज करू शकणार आहात, तसेच या वेबसाईट वरूनच तुम्हाला या भरती संदर्भात अधिक तपशीलवार माहिती जाणून घेता येणार आहे. BRO Recruitment 2024

BRO Recruitment 2024 PDF –  Download

Join Whatsapp Group For More Job Info

1 thought on “BRO Recruitment 2024: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नोकरीची मोठी संधी… एकूण 466 जागांवर भरती.. 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र…”

Leave a Comment