Grape Embassy Nashik Zatka Misal || No.1 Famous Misal In Nashik || द्राक्षाच्या मळ्यातली झटका मिसळ

Grape Embassy Nashik

grape embassy nashik

If you are searching for a Famous Misal in Nashik तर Grape Embassy Nashik Zatka Misal is here. मंडळी झटका मिसळ ही टॉप ५ मध्ये येते, इथे हजरो लोक भेट देतात व या द्राक्षाच्या मळ्यातली झणझणीत झटका मिसळची चव घेतात व आपला अनुभव शेयर करतात तुमचा आहे का काही अनुभव या नाशिक मधल्या प्रसिद्ध मिसळचा! तुम्ही जर इथं भेट देणार असाल तर अगोदर या नाशिकच्या द्राक्षाच्या मळ्यातल्या झटका मिसळ बद्धल थोडं जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

प्रवास होता नवी मुंबई ते Grape Embassy Nashik करिता, सकाळी १० वाजता निघालो दुपारी ३.३० च्या आत त्या ठिकाणी पोहोचायचं होत, नवी मुंबई ते नाशिक द्राक्षाच्या मळ्यातली झटका मिसळ हे ठिकाण पर्यंत अंतर होत १३० किलोमीटरच या ठिकाणी आम्ही गूगल मॅप द्वारे पोहोचलो. ही झटका मिसळ नाशिक मधेच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच अनेक मिसळ प्रेमी व महाराष्ट्रातील खवये या ठिकाणी भेट देत असतात. म्हणून आम्ही देखील ठिकाणाला भेट द्याचं ठरवलं.

Grape Embassy Nashik Zatka Misal

नाशिक मधील द्राक्षाच्या मळ्यातली झटका मिसळ ही संकल्पना विलक्षण व वेगळी आहे व येथील वातावरण, अनुभव छान आहे. म्हणून आम्ही हे पाहण्याकरिता व झटका मिसळीची चव घेण्याकरिता पोहोचलो. महाराष्ट्रातील अनेक मिसळ प्रेमी या ठिकाणी भेट देत असतात. हे ठिकाण कुठे आहे? येथील मिसळ कशी आहे? किती रुपये ला आहे? याबद्धल संक्षिप्त माहिती खाली दिलेली आहेत त्याच बरोबर आमचा अनुभव या ब्लॉग च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आम्ही अस ऐकलं होतं सुट्टीच्या दिवशी गेलात तर गर्दी मुळे ऑर्डर ला थोडा वेळ लागू शकतो, म्हणून आम्ही week day ला या ठिकाणी भेट दिली. या अगोदर आम्ही नाशिकच्या पेरूची वाडी चुलीवरची मिसळ या ठिकाणी देखील भेट दिलेली पण आम्हला वेळेअभावी तिथली मिसळ खायला मिळाली नाही. पण आज नाशिकच्या प्रसिद्ध झटका मिसळ या ठिकाणी वेळेत येऊन द्राक्षाच्या वेलीच्या आवारात बसून या मिसळचा आस्वाद घेतला.

Famous Nashik Zatka Misal

या Zatka Misal सोबत छान व चविष्ट गोड जिलेबी व लस्सी तसेच छास, ढोकळा, आळूच्या वड्या, मिळतात, मेनू लिमिटेड आहेत व किंमत देखील चांगली आहे. या बद्धल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे पण काही महत्वाच्या गोष्टी या ब्लॉग द्वारे तुम्हाला सांगत आहे, म्हणून ब्लॉग संपूर्ण वाचा व तुमचा देखील अनुभव जरूर खाली कंमेंट द्वारे द्या. इथे तुम्ही सह कुटुंब व मित्रासह येऊ शकता, इथलं वातावरण छान आहे हिरव्यागार द्राक्षाच्या मळ्यात बसून झणझणीत नाशिक मिसळ खाऊ शकता.

Zatka Misal Nashik Video

Grape Embassy Nashik Address

सुयोजित पुलाजवळ, गंगापूर, रोड, मखमलाबाद, नाशिक, महाराष्ट्र ४२२००३. तसेच जर तुम्ही मुंबई किंवा अन्य ठिकाणावरून येत असाल तर गूगल मॅप द्वारे येऊ शकता. मुंबई वरून हे ठिकाण 170 किलोमीटर असून नाशिक-मुंबई हायवे ने ३-४ तासात पोहोचू शकता, व जर तुम्ही Pune To Grape Embassy Nashik प्रवास करणार असाल तर यासाठी 219 किलोमीटर अंतर असून प्रवासकरीता ४-५ तास लागू शकतात.

Grape Embassy Nashik Menu Card

आम्ही या ग्रेप एम्बेसी नाशिक झटका मिसळला मे २०२४ या महिन्यात भेट दिली असून या वेळी या Grape Embassy Nashik Menu Card व किमती खालील फोटो मध्ये दिला आहे तो तुम्ही पाहू शकता. या द्राक्षाच्या मळ्यातली मिसळ चा मेनू कार्ड मोठा नसून अगदी लिमिटेड प्रमाणात आहे.

Grape Embassy Nashik Misal Price

नाशिकची झटका मिसळ पाव ही ११०/- रुपये पर्यंत मिळते त्याच बरोबर जर याव्यतिरिक्त काही अधिक ऑर्डर करत असाल तर त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. ही झणझणीत तिखट झटका मिसळ द्राक्षाच्या मळ्यात बसून खाण्याची काही औरच मज्जा आहे. किंमत जास्त व कमी नाही पण या मिसळची चव छान आहे व अनेक मिसळ प्रेमी कडून चांगले रेटिंग देखील मिळाल्या आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी भेट दिली.

Grape embassy nashik price list
Grape Embassy Nashik Menu Card with Price

Parking & Things To Do Grape Embassy Nashik

पार्किंगसाठी भरपूर जागा देतात, मुलांना या ठिकाणी भेट दिल्यास आनंद होईल कारण या ठिकाणी खेळण्याची जागा, घोडा आणि उंटाची सवारी, टॉय ट्रेनची राइड (ट्रॅक्टरने चालवलेली), मिनी बस राइड आणि ट्रॅम्पोलिन/जंपिंग मॅट आहे. फिश मसाज आणि VR हेडसेट गेम्स येथे उपलब्ध आहेत. वीकेंडला एवढी गर्दी असते, तुम्हाला टेबल मिळण्यासाठी १ तास वाट पहावी लागेल . टेबल मिळविण्यासाठी टोकन प्रणाली आहे. दुपारी ३.३० ला हे ठिकाण बंद होते.

Grape Embassy Nashik Photos

Grape Embassy Nashik
Grape Embassy Nashik Photos
Grape Embassy Nashik
Grape Embassy Nashik Photos
Grape Embassy Nashik
Grape Embassy Nashik Photos
Grape Embassy Nashik Photos
Grape Embassy Nashik Photos

Grape Embassy Nashik Timing

आठवड्यात आठही दिवस सकाळी ८:३० ते दुपारी  ३:३० पर्यंत चालू असते. नाशिकची द्राक्षाच्या मळ्यातली झटका मिसळ ही दर दिवशी चालू असते व वेळेत बंद देखील होते, सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते तर एव्हाना कमी असते म्हणून जर तुम्ही मिसळ प्रेमी असाल व तुम्हाला झणझणीत मस्त वातावरणात मिसळ खायची असेल तर आठवड्यात एक दिवशी सुट्टी काढून इथे भेट देऊन तुम्ही या ठिकाणचा चांगला अनुभव तसेच चविष्ठ मिसळ व चांगल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

Grape Embassy Nashik Contact Number

जर तुम्हाला या ठिकाणचा फोन नंबर हवा असल्यास तुम्ही गूगल वरून मिळवू शकता. अधिक माहिती साठी त्याच्या official वेबसाईट ला भेट देऊ शकता.

अधिक वाचा; 2024 Famous Misal In Nashik || नाशिक मधील काही सुप्रसिद्ध मिसळचे ठिकाणं!!!

Conclusion

तर मंडळी कशी वाटली ही Grape Embassy Nashik Zatka Misal बद्धल माहिती व आमचा अनुभव जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली कंमेंट करा व तुमचा देखील काही आगळा वेगळा अनुभव असेल तर खाली सांगू शकता, तसेच जर तुम्ही या ठिकाणी सह कुटुंब सह परिवारासोबत येत असाल तर ही माहिती त्याच्या सोबत शेयर करा धन्यवाद अश्याच मराठीत माहिती करीता आपल्या या ब्लॉग ला भेट द्या.

धन्यवाद …!!!

Leave a Comment