लक्षद्वीप बेटाची थोडक्यात माहिती | Lakshadweep Information In Marathi 2024

Lakshadweep Information In Marathi
Lakshadweep Info In Marathi

Lakshadweep Information In Marathi

Lakshadweep हा अरबी समुद्रातील ३६ बेटांचा समूह आहे, जो भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवर वसलेला आहे. लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान ३२ चौ. किमी क्षेत्रफळ केंद्रशासित प्रदेश आहे, कवारत्ती राजधानी असून इथे मल्याळम प्रमुख भाषा साक्षरता ९२% वर आहे. लक्षद्वीप भारतीय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्य व पर्यटन साठी प्रसिद्ध आहे, हा बेट भारताच्या ४०६ किमीवर आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

लक्षद्वीप बेटावर जाण्याकरिता कोचीहून जहाज व विमानांनी पोहोचता येते. पर्यटकांना कोची हे लक्षद्वीपचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते, कोचीहून विमानाने अगाट्टी आणि बंगाराम बेटांवर पोहोचता येते, या करिता एअरलाईन्स विमानाने हवाई सफर करू शकता. कवरत्ती हे लक्षद्वीपमधील एकमात्र मोठे शहर आहे, लक्षद्वीपचे काही प्रमुख पैलू येथे आहेत ते खाली दिले आहेत, याप्रमाणे लक्षद्वीपची मराठी माहिती घेऊ शकता.

जर तुम्ही solo जात असाल व तुमच्या पाटर्नर सोबत कोणताही थेट हॉटेल बुक न करता जात असाल तसेच लक्षद्वीप बेटांचा मनोसोक्त पर्यटनाचा आनंद लुटायचा असेल तर ही माहिती संपूर्ण वाचा तसेच आपल्या पाटर्नर ला जरूर शेयर करा, लक्षद्वीप २०२४ मध्ये खूप ट्रेंडिंग ला असून लाखोंच्या संख्येने पर्यटक इथे हॉटेलस बुक करत आहेत, व आयुष्यात एकदातरी लक्षद्वीप ला भेट देण्याचा स्वप्न पाहत आहेत या करिता हा ब्लॉग.

२०२४ मधील लक्षद्वीपमधील 10 सर्वोत्तम हॉटेलस

अधिक वाचा

Jaipur India Travel Marathi | जयपूर गुलाबी शहराबद्दल काही

लक्षद्वीप प्रसिद्ध हॉटेल्स: भारतातील व अन्य देशातील लाखो पर्यटक लक्षद्वीप ला हनिमून व ट्रॅव्हल भेट देत असतात यातच तिथे राहण्याचा प्रश्न निर्माण होतो, Lakshadweep मध्ये Hotels जर बघत असाल तर, खाली २०२४ मधील सर्वोत्तम लक्षद्वीपमधील हॉटेलस यादी दिली आहे, या प्रकारे तुम्ही हॉटेल्स बुक करून थांबू शकता. महत्वाचं लक्षद्वीप बेटावर बंगाराम वगळता सर्व बेटावर liquor प्रतिबंधित आहे.

बाकी सर्व माहिती हॉटेल्सच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा इतर ट्रॅव्हल वेबसाईट वर मिळेल, तसेच तुम्ही हॉटेल निवडताना त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला किती दिवस थांबायचं आहे तेवढ्या दिवसच एकदम (lakshadweep tour packages) पॅकेज घेऊन बुक करू शकता, यात वेगवेगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा मिळतील. बाकी सोलो मंडळी दिलेली माहिती संपूर्ण वाचा.

लक्षद्वीप मधील सर्वोत्तम हॉटेल्स: hostels in lakshadweep

१) बंगाराम बेट रिसॉर्ट (Bangaram Island Resort)
२) व्हाईट पर्ल बीच हॉटेल ( White Pearl Beach Hotel)
३) कदम बीच रिसॉर्ट (Kadmat Bech Resort)
४) बेट हॉलिडे होम (Island Holiday Home)
५) कोरल बीच रिसॉर्ट (Coral Beach Resort)
६) मिनिकॉय बेट बीच रिसॉर्ट ( Minicoy Island Beach Resort)
७) कलपेनी पर्यटक झोपडी ( Kalpeni Tourist Hut)
८) थिन्नक्कर तंबूगृहे (Thinnakkar Tent Houses)
९) फ्लाय झोन होमस्टे (Fly Zone Homestay)
१०) Kasims बीच व्हिला ( Kasims Beach Villa)

तर मंडळी हे होते लक्षद्वीपमधील सर्वोत्तम हॉटेल्सची यादी इथे तुम्ही ऑनलाईन किंवा थेट जाऊन रूम्स बुक करू शकता व निसर्गरम्य लक्षद्वीप बेटांचा आनंद घेऊ शकता.

लक्षद्वीप एअरपोर्ट

Lakshadweep Information In Marathi

या ३६ बेटाच्या समूहाकरिता लक्षद्वीपमध्ये फक्त एक विमानतळ आहे जो अगाट्टी बेटावर आहे. कोचीहुन दररोज सकाळी जवळपास ९ वाजता विमान आहे जे दिड तासात अगाट्टी विमानतळावर पोहोचवतात व बंगाराम बेटावर हेलिपॅड आहे या बद्धल अधिक माहिती इंटरनेटहुन घेऊ शकता.

Lakshadweep Tour

लक्षद्वीप ला हिवाळ्यात (oct to march) महिन्यात भेट देऊ शकता, पर्यटक गुगल वर लक्षद्वीप जाने का खर्चा, लक्षद्वीप टूर पैकेज या बद्धल जास्त माहिती घेत आहेत, म्हणून या बद्धल माहिती मराठी भाषिकांकरिता ह्या ब्लॉग च्या माध्यमातून देत आहोत. लक्षद्वीप टूर म्हंटल की यात लक्षद्वीप टूर पॅकेजेस येतात या पॅकेजेस ची किंमत २८ हजारांपासून लाखो रुपये पर्यंत ऑनलाईन ट्रॅव्हल वेबसाईटवर आहे. या बेटावर जाण्याकरिता कोची प्रवेशद्वार आहे कोचीहून जहाज किंवा विमान द्वारे लक्षद्वीप ला पोहोचू शकता.

How To Reach Lakshadweep

Lakshadweep Information In Marathi

जहाज द्वारे (केरळ) कोची ते लक्षद्वीप प्रवास करण्यासाठी १४-१८ तास वेळ लागतो यासाठी फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास असे तिकीट मिळते,याची किंमत २२०० पासून ५००० पर्यंत आहे. कोची ते लक्षद्वीप ४०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे, कोची ते लक्षद्वीप आठवड्यात दर दिवशी चालू आहे, तिकीट बुक करण्याकरीता तुम्ही ऑनलाईन ट्रॅव्हल वेबसाईट ची मदत घेऊ शकता. तसेच जाणून घेऊ विमान प्रवास कसा करू शकतो!

Flight to Lakshadweep: विमानाने लक्षद्वीप ला प्रवास करायचा झाल्यास दररोज सकाळी केरळ कोची वरून लक्षद्वीप अगाट्टी विमानतळ एअर इंडिया द्वारे उड्डाण करू शकतो, केरळ कोची हे लक्षद्वीपच प्रवेशद्वार मानलं जातं, एकूण विमानाचा खर्च शिप तिकीट पेक्षा दुप्पट आहे, एकूण दीड तासच्या प्रवासाला ५००० रुपये पासून तिकीट खर्च आहे, सांगितल्या प्रमाणे जर हिलिकॉप्टर ने प्रवास करत असाल तर बंगाराम बेटावर हेलिपॅड आहे. लक्षद्वीप बेटाला विमानद्वारे ऑनलाईन वेबसाईटवरून तिकिटं बुक करू शकता.

Lakshadweep Tour Packages

लक्षद्वीप टूर पॅकेज बद्धल माहिती घायची असेल तर आपल्या महाराष्ट्रातून वीणा वर्ल्ड व केसरी असे काही ट्रॅव्हल ग्रुप आहेत तिथे माहिती घेऊ शकता तसेच इंटरनेटवर या बद्दल माहिती उपलब्ध आहे व ट्रॅव्हलर वेबसाईट आहेत त्याहून ऑनलाईन लक्षद्वीप टूर पॅकेजेस बद्धल जाणून घेऊ शकता. थोडक्यात सांगायचं झाल्यास तीस हजारांपासून पन्नास हजारापर्यंत काही दिवसांचे tour पॅकेजेस उपलब्ध आहे.

लक्षद्वीप मधील भेट देण्यासारखे ठिकाणे

Lakshadweep Information In Marathi

Lakshadweep Tourism

lakshadweep tourism, त्याच्या विहंगमय नैसर्गिक सौंदर्यासह, अनेक प्रसिद्ध ठिकाणांचे घर आहे जे मूळ समुद्रकिनारे, प्रवाळ खडक आणि एक अद्वितीय सांस्कृतिक अनुभव शोधणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात. लक्षद्वीपमधील काही उल्लेखनीय ठिकाणे येथे आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता:

१) अगाट्टी बेट (Agatti Island)

अगाट्टी बेटाला हिंदीत अगाती द्वीप म्हंटले लक्षद्वीप बेटावरील भेट देण्यासारखं पाहिलं ठिकाण म्हणजे अगाट्टी बेट, या ठिकाणी लक्षद्वीप बेट एअरपोर्ट म्हणून ओळखला जाते, हे ठिकाण scenic असून इथे Snorkeling होते.

२) कवरत्ती बेट (Kavaratti Island)

Kavaratti Island लक्षद्वीप ची राजधानी असून हे ठिकाण सुंदर आणि मनमोहक आहे Kavaratti Island वर तुम्ही Marine Museum Explore करू शकता. हे बेट मशिदी, प्राचीन समुद्रकिनारे आणि उजरा मशीद एक प्रमुख धार्मिक स्थळ यासाठी ओळखले जाते.

३) बंगाराम बेट (Bangaram Island)

Bangaram Island हे लक्षद्वीप बेटांमधील प्रसिद्ध ठिकाण आहे, अनेकदा लक्षद्वीपचे रत्न म्हणून ओळखले जाणारे बंगाराम बेट हे सोनेरी किनारे आणि नीलमणी पाण्यासाठी ओळखले जाते. हे स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग आणि विश्रांतीसाठी उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे.

४) थिंन्नकरा बेट (Thinnakara Island)

लक्षद्वीप मधील Thinnakara Island हे प्रवाळ खडकाने वेढलेले नयनरम्य बेट आहे. स्नॉर्कलिंग आणि कयाकिंग सारख्या पाण्याच्या ऍक्टिव्हिटी साठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

५) कदम बेट (kadmat Island)

Kadmat Island हे fishing साठी खूप फेमस असून इथे सुद्धा इतर बेटा सारखे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होतात त्याच निळसर पाणी, विहंगम दृश्य, हे kadmat बेटाच वैशिष्ट. इथे राहण्याची उत्तम सोय देखील आहे या करिता ऑनलाईन बुकिंग करू शकता.

६) कल्पेनी बेट (Kalpeni Island)

लक्षद्वीप मधील कालपेनी बेट हे प्रवाळ खडक आणि स्वच्छ सरोवरांसाठी प्रसिद्ध आहे. हे बेट आजूबाजूच्या प्रवाळांची विलोभनीय दृश्ये देते आणि जलक्रीडा उत्साही लोकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

७) मिनिकॉय बेट (Minicoy Island)

लक्षद्वीपमधील सर्वात दक्षिणेकडील बेट, मिनिकॉय हे त्याच्या सांस्कृतिक विशिष्टतेसाठी ओळखले जाते. अभ्यागत पारंपारिक मिनिकॉय डान्स, लावा एक्सप्लोर करू शकतात आणि लेगूनमध्ये water activities चा आनंद घेऊ शकतात.

८) एंड्रोट द्वीप (Androth Island)

एंड्रोट द्वीप हे लक्षद्वीपमधील सर्वात मोठे बेट आहे आणि ते समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते. या बेटाला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि अभ्यागत या प्रदेशातील सर्वात जुनी मशीद, जुमा मशीद पाहू शकतात.

९) पिट्टी पक्षी अभयारण्य (Pitti Bird Sanctuary)

लक्षद्वीप बेटांवर पिट्टी बेट या वर वसलेले हे पक्षी अभयारण्य विविध प्रजातींच्या समुद्री पक्ष्यांचे घर आहे. पक्षीनिरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी हे आश्रयस्थान आहे. इथे आवर्जून भेट द्या.

१०) बित्रा बेट (Bitra Island)

लक्षद्वीप बेटावर एकदम शांतता हवी असल्यास या बेटावर भेटबदेऊ शकता, हे बेट शांततेसाठी ओळखले जाणारे, बित्रा हे एक लहान लोकसंख्या असलेले एक शांत बेट आहे. हे एकटेपणा शोधणाऱ्यांसाठी एक शांत सुटका देते.

११) चेरियम बेट (Cheriyam Island)

चेरियम बेट: लक्षद्वीप मधील चेरियाम हे एक छोटेसे बेट आहे जे त्याच्या पांढर्‍या वालुकामय किनार्‍यासाठी आणि स्वच्छ निळ्या पाण्यासाठी ओळखले जाते. हे एक निर्जन आणि शांत वातावरण प्रदान करते.

Conclusion

गेल्या काही दिवसापासून भारत आणि मालदीव हे दोन देश सोशल मीडियावर ट्रेंडिंग वर आहेत, यातच गुगल वर सर्वात जास्त search होणार “लक्षद्वीप”ट्रेंडिंग कीवर्ड आहे, लक्षद्वीप आणि मालदीव या चर्चेला उधाण आले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप बेट ला भेट दिल्यानंतर सतत लक्षद्वीप मालदीव पेक्षा जास्त गूगल वर ट्रेंड झालं आहे. म्हणून आपल्या मराठी वाचकाला एकाच ठिकाणी लक्षद्वीप बद्धल मराठीत माहिती देण्याचा हा प्रयत्न.

मालदीव विसरा आता लक्षद्वीप पकडा, तर मंडळी, आपण या लक्षद्वीप बेट (Lakshadweep Island) बद्धल माहिती मराठीत वाचली असेल , आशा करतो ही माहिती व हा लेख तुम्हाला आवडली असेल, जर ही लक्षद्वीपची माहिती मराठी मधून आवडली असेल तर आपल्या ट्रॅव्हलर मित्रांना जरूर शेयर करा, व अश्याच ट्रॅव्हल्स बद्धल माहिती करीत आपल्या वेबसाईटला भेट देत जावा.

धन्यवाद🙂