अशी असावी ती. . .
जणू चंद्राची चंदनी ..मकमल स्पर्श तिचा आणि सहवास आयुष्याचा
नाही भेटलो मी दिवसभर तर
तीने खुप बैचेन व्हावं
संध्याकाळी ऒफ़िसबाहेर भेटून
मला अगदि सरप्राईज द्याव
भेटण्यासाठी ठरलेल्या जागी
तीने माझ्या आधी यावं
आणि मी उशिरा आलो म्हणुन
मग लटके लटकॆ रागवावं
फ़िरताना जर मी नजरेआड झालो
तर तीने कावरबावरं व्हावं
आणि मी दिसल्यावर मात्र
अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं
माझं काही चुकलं तर
तीन कधीही न रागवावं
अबोला धरुन मला न रडवता
काय चुकलं ते समजवावं
जीची कल्पनाही केली इतकी
भरभरुन प्रेम देणारी ती व्यक्ती असावी
माझी आठवण आली तीला की
तिनंही माझ्यासाठी एक कविता लिहावी.
——————————————
मी मेल्यावर …
मी मेल्यावर एकदा मला पाहून जा
देहावर माझ्या थोडी फुले टाकून जा,
खोटे का असेना दोन अश्रुही ढाळून जा
मेल्यावर तरी एकदा प्रेमाचे सुख देवून जा.
एकतर्फी प्रेम केले तुझ्यावर हा गुन्हा झाला
त्यातच माझा अर्धा अधिक जीव रे गेला,
तुझी वाट पाहण्यातच आयुष्य सारे सरले
आणि मग हळूहळू म्हातारपणाने घेरले.
आता नाही रे काहीच अपेक्षा
फक्त एकदाच शेवटचं तुला पहायचंय,
जिवंतपणी जे सुख मिळालं नाही
ते सारं मेल्यावर अनुभवायचंय.
म्हणूनच सांगतेय रे ऐक ना जरा
मी मेल्यावर …
एकदा तरी मला पाहून जा …
आणि प्रेमाचे ते सारे सुख देवून जा.
——————————————
तो रस्ता मला पाहून आज हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला
हो ती हवा आजही तिथेच होती
नेहमी तुझे केस विसकटणारी
तो गाडयाचां गलकाही तिथे होता
रोज तुझ्या माझ्या वादावर हसणारा
त्या वळणाने मला आवाज दिला खरा
पण आज मी मागे वळून पाहीलच नाही
रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या
आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही
आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला
आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत
पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी
आज एक युदध हरल्या सारख वाटत होत
आज सगळ्यांच्या मनात प्रश्न होता एकच
रोज दोघं असतात पण आज हा एकच
उत्तर होत जरी एकटाच असलो तरी
तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला
पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज
असतेच ना सागराच्या भरती आहोटीला
—
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात…….
————————————————
हि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे
“आज तिचा फोन आला ,,
शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज
झाला ,,
स्वतःला सावरून तिन सांगितलं ,अरे माझ
लग्न ठरलं ,,
… ति सावरली पण तो क्षणात ढासळला ,, अन
मग दोघ्यांच्या आसवांपुडे
पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ,,
शब्द सगळे हवेत विरले.,,
ति म्हणाली माफ करशील ना रे मला ??
तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस ?
कर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन
राखातेस ,,
या जन्मी नाही झालीस माझी ,,
तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त
माझा हक्क असेल ,,
ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात
आठवनीच्या कोपऱ्यात फक्त
तुझी प्रतिमा असेल ,,
धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला,,
कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात
जाऊन उभा राहिला …
——————————————
मी एकटाच पडलो आहे
का माहित नाही जग वेगळे
आणि मी वेगळा झालो आहे
कोणाची तरी साथ हवी आहे मला…
पण कोणीच दिसत नाही
का माहित का मी एकटाच पडलो आहे..? ♥
——————————————
**** दगाबाज आयुष्य ****
तुझे ते हास्य जीवनी
गंध फुलाचा देऊन गेला.
फक्त तुझ्या हसण्यासाठी
लाख चुका माफ तुला.
तुझ्या एकदा येण्याने
आसमंत हा आज खुलला
फक्त तुझ्या येण्यासाठी
आसमंत हा धरणीवर झुकला.
तुझ्या नुसत्या बोलण्याने
मानाने आकांत केला
फक्त तुझे बोल ऐकण्यासाठी
चारीदिषा वादळ उठवीत गेला.
तुझ्या माझ्या भेटीसाठी
माझ्या हृदयाने हट्ट केला
फक्त तुझी एक हाक ऐकण्यासाठी
साऱ्या आयुष्याने धोका दिला………
——————————————
कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..
त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
“प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली.”
एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
“थांब गाडी लावुन येतो!” म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली
शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली “सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली
———————————————————————————————
आता संपलयं ते सारं….
आता संपलयं ते भास होणे,
तू नसल्याठिकाणी तुला पहाणे,
तू समोर असल्यावर,
स्वतःलाच विसरून जाणे…..
आता संपलयं ते सारं….
आता संपलयं ते तुझे शब्द आठवणे,
तू बोलत असताना माझे गप्प होणे,
आणि,
तुला एकटक बघत रहाणे……
आता संपलयं ते सारं….
आता संपलयं तुझ्यासाठी घरी थापा मारणे,
extra-classच्या नावाखाली तुला भेटणे,
तासनतास बोलत रहाणे,
आणि, फोनचे बिल वाढवणे…..
आता संपलयं ते सारं….
आता संपलीयेत ती भांडणे,
शुल्लक गोष्टीवरून रूसणे,
थोडा वेळ अबोला धरणे,
आणि, नंतर मीच ..
sorry sorry sorry म्हणणे…
आता संपलयं ते सारं….
आता संपलयं एकटे असता तुला आठवणे,
तुला आठवून माझे हळवे होणे,
रात्रभर एकच गाणे ऐकणे,
आणि, कधी,
हळूच अलगद डोळ्यांतुन पाणी ओघळणे,
आता संपलयं ते सारं…
आता संपलयं ते तुझ्यासाठी श्वास घेणे,
तुझ्यासाठी जगणे, आणि,
तुझ्यासाठी तुझ्यावर कवितांवरकविता करणे…
आता संपलयं ते सारं……..