शिवाजी महाराज स्वप्नात आले | Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj

शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती मराठी

परिचय : छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, हुशार आणि दयाळू राज्यकर्ते होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला. शिवाजींचे वडील शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. आई जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या असूनही गुण-स्वभाव आणि व्यवहारात वीर स्त्री होत्या.या कारणास्तव, त्यांनी रामायण, महाभारत आणि इतर भारतीय शूर आत्म्यांच्या तेजस्वी कथा ऐकून आणि शिकवून बाल शिवाचे संगोपन केले. लहानपणी शिवाजी आपल्या वयाच्या मुलांना गोळा करून त्यांचे नेता बनून किल्ले लढवण्याचा आणि जिंकण्याचा खेळ खेळत असे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

दादा कोंडदेव यांच्या अधिपत्याखाली ते सर्व प्रकारच्या युद्धशास्त्रात पारंगत झाले. धर्म, संस्कृती आणि राजकारण याबाबतही योग्य ते शिक्षण दिले गेले. त्या काळात परम संत रामदेव यांच्या संपर्कात येऊन शिवाजी पूर्णपणे देशभक्त, कर्तव्यदक्ष आणि कष्टाळू योद्धा बनले.कुटुंब आणि गुरु: छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 14 मे 1640 रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यांच्या मुलाचे नाव संभाजी होते. संभाजी हे शिवाजींचे ज्येष्ठ पुत्र आणि उत्तराधिकारी होते ज्यांनी 1680 ते 1689 इसवी पर्यंत राज्य केले. संभाजीच्या पत्नीचे नाव येसूबाई होते. त्यांचा मुलगा आणि वारस राजाराम होता. शिवरायांचे समर्थ गुरु रामदास यांचे नाव भारतातील ऋषीमुनी आणि विद्वानांमध्ये प्रसिद्ध आहे.

Read More:- Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Kalyan – छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म

शिवरायांचा जन्म फाल्गुन तृतीय शके पंधराशे एक्कावन म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी जिजाऊ यांच्या पोटी झाला.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाल्यावर शिवनेरी च्या नगारख्यानात सनई चौघडा वाजत होता.शिवाजी हे नाव त्यांना शिवाई देवीच्या नावावरून देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू संभाजी राजे हे होते. हे जास्त काळ त्यांच्या वडिलांसोबत म्हणजेच छत्रपती शहाजी राजे यांच्या बरोबर रहायचे. छत्रपती शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाही मोहिते या होत्या ज्यांच्या पासून शहाजी राजांना एक पुत्र रत्न प्राप्त झाले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ या विलक्षण प्रतिभावंत महिला होत्या.छत्रपती शिवाजी महाराज सामर्थ्यवान सामंत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीत्वावर त्यांच्या आई-वडिलांचा खूप प्रभाव होता. लहानग्या वयातच त्यांना त्या काळातील वातावरण आणि घटनांची खूप चांगली जाण होती सत्ताधारी वर्गावर ते फार चिडायचे आणि अस्वस्थ व्हायचे स्वातंत्र्याची ज्योत लहानपणापासूनच त्यांच्या मनात पेटली.त्यांनी लहानपणीच आपले काही विश्वासू मित्र एकत्र केले जसजसं वय वाढली परकीय सत्तेचे बंधन तोडण्याचा त्यांचा संकल्प अधिकच होत गेला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा विषय आपणास सर्वांना भावनिक करून टाकणारे विषय आहे 3 एप्रिल 1680 रोजी रयतेच्या राजाने देह ठेवला आणि त्यानंतर विलीन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू वर चर्चा करणे हा एक खरंच गंभीर विषय आहे.पण यावर चर्चा करणे गरजेचे आहे. काहींच्या मनात महाराजांच्या मृत्यू याबद्दल वेगवेगळी मत आहेत यावरच आपण चर्चा करणार आहोत.महाराजांच्या मृत्यू 1680 मध्ये झाला पण महाराजांच्या मृत्यू च्या चार वर्ष आधीपासून साधारण जानेवारी 1676 पासूनच महाराजांचे मृत्यू झालेल्या अफवा पसरत होत्या. इंग्रजांची पत्रे चाळली असता हे तुमच्या लक्षात येऊ शकते हा विषय खूप मोठा आहे.रायगडच्या राजवाड्यात 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शिवरायांनी आयुष्यभर स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष केला.सर्व पसरलेल्या मराठ्यांना एकत्र आणून आपण राज्यच नव्हे तर राष्ट्रही घडवू शकतो हे त्यांनी सिद्ध केले.ते शेवटचे हिंदू शासक होते ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मुघलांविरुद्ध लढा दिला आणि आपल्या मातृभूमीचा गौरव केला.

इंटरनेट सर्वात जास्त सर्च करणारे प्रश्न :

शिवाजी महाराजांना किती पुत्र होते?

– संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही.

शिवाजी महाराज का इतिहास मराठी?

– छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली.

शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?

– 19 February 1630, Shivneri Fort, Kusur

शिवाजी महाराजांना किती बायका होत्या व त्यांची नावे?

– पुतळाबाई भोसले ह्या शिवाजी महाराजांच्या चौथा पत्नी होत्या. (बाकीच्या पत्नीची नावे :- १)सईबाई-निंबाळकर घराणे २)सगुणाबाई-शिर्के घराणे ३)सोयराबाई-मोहिते घराणे ४) लक्ष्मीबाई-विचारे घराणे ५) सकवारबाई-गायकवाड घराणे ६)काशीबाई-जाधव घराणे ७) गुणवंताबाई-इंगळे घराणे). पुतळाबाईंचा १५ एप्रिल १६५३ रोजी शिवाजी राजांंशी विवाह झाला.

शिवाजी महाराजांचे वंशज कोण आहेत?

– शिवरायांचा वारसा शंभुजीराजे राजाराम महाराज, शाहुराजे यांनी पुढे चालवून अखंड हिंदुस्थानात मराठा साम्राज्य प्रस्थापित केले. उदयनराजे हे शिवाजी महाराजांच्या १२ व्या वंशजांचे म्हणजेच प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र होय. तर शिवेंद्रराजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू अभयसिंह यांचे पुत्र आहेत.

शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती आणि का?

– शहाजी राजे, जिजामाता यांच्या मुद्रेवर यावनी भाषेचा प्रभाव होता. मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे.

छत्रपतींचा अर्थ काय?

– छत्रपती ही संस्कृत भाषेतील राजेशाही पदवी आहे. ‘छत्रपती’ हा संस्कृत भाषेतील संयुग शब्द (संस्कृतमधील तत्पुरुष) छत्र (छत्र किंवा छत्री) आणि पति (मालक/स्वामी/शासक) यांचा आहे. ही पदवी भोंसलेंच्या घराण्याने वापरली होती. मराठा साम्राज्याचे छत्रपती

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?

– 6 जून 1674 सीई रोजी, वाराणसीच्या विश्वेश्वर, ज्याला गागा भट्ट देखील म्हणतात, शास्त्रांनुसार शिवाजीचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असे संबोधण्यात आले.

शिवजयंती दोनदा का साजरी केली जाते?

– “शिवाजी महाराजांची जयंती दोन वेगवेगळ्या तारखांना साजरी केली जाते. त्यापैकी एक इंग्रजी कॅलेंडरवर आधारित आहे आणि दुसरी मराठी कॅलेंडरवर आधारित आहे . पूर्वी शिवजयंती मराठी दिनदर्शिकेनुसार साजरी होत असे. पण आता ते 19 फेब्रुवारीलाही केले जाते.

 

 

शिवाजी महाराज स्वप्नात आले आणि….
 
एकदा महाराज मला भेटले,
झोपेत पाहून जोरात कडादले,
अरे मावल्या झोपतोस काय?,
कोम्ब्डा अरवला ऐकू येत नाही काय?”,
महाराज हयात दोष माझा नाय ,
थंड AC आणि गजराच्या युगात,
कोम्ब्डया च महत्व तरी काय?”
महाराज हसले अणि म्हणाले ,
चल भवानी मातेच दर्शन घेउया,
ह्या युगातला महाराष्ट्र पाहुया”
दर्शन घेउनी महाराजांनी सर्व किल्ले पाहिले,
शेवटी राजगडअ वर येउनी स्तब्ध राहिले,
म्हणाले,”काय रे दशा झाली या किल्ल्यांची आज?
ज्यांना पाहुनी डगमगले होते पातशाही ताज!!!
मी म्हणालो ,”महाराजअहो इथे इतिहास आठवतो तरी कुणाला आज?
रेव्ह पार्ट्या करतांना ह्या लोकांना वाटत नाही लाज…!
महाराज विचलित झाले,
म्हणाले,”चल येथून जाऊ यात ,
महाराष्ट्राची राजधानी पहुयात”,
महाराजान्सोबत मुंबईत आलो,
तिथल्या झगमगाटआत पूर्णपणे हरवलो,
मुंबई बघता बघता २६/११ च प्रसंग ऐकविला,
तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या महाराजांनी मलाच प्रश्न केला,
तुम्ही त्या नाराधामाला जित्ता कैसा सोडिला?”
उत्त्तर काय देणार माझाच चेहरा पडला ,
म्हणालो महाराज ,”तो पहा तो कसब त्यानेच हा प्रसंग घडविला,
पण आजच्या लोकशाहीत न्याय आहे प्रत्येकाला नाही तो फक्त माणुसकीला ….!
वरून आमचेच नेते म्हणती,तुमचेच लोक फितूर ,
बलिदान गेले वाया मरणयास होते आतुर…!!
महाराज काही बोलले नाहित,
सारख काही तरी विचार करीत राहित,
चालता चालता महाराजांना एक दृश्य दिसल ,
एक इसमास ४-५ जणांनी मरला,
महाराजानी हे हेरल,
ऐसे काय त्याने केल?
म्हणालो ,”महाराजतो भैय्या‘,परप्रांतीय ,
म्हणुनच त्यासी धरिल…!
यंदा मात्र प्रश्न पडला महाराजन्नाच,
कवी भूषण अणि कलश यांचा विसर पडला माझ्या रयतेलाच?
फिरता फिरता समुद्र किनारी आलो,
महाराजांच्या पुतल्याची कल्पना करुनच प्रफुल्लित झालो,
महाराजांना म्हणालो,
महाराज,तुमच्या पुतल्याच्या उभारनी साथी उभा आहे तुमचा एक पाईक,
परन्तु तयासी विरोध करिति आपलेच सरनाईक”,
महाराज चमकले,
म्हणालो “महाराज,कोणास म्हणावे आपुले अणि कोणास परके,
तुमच्या नावाने येथे जातीचे राजकारण जाहले…!!!!”
महाराजांना जे समजायचा ते ,ते समजले,
अणि परत हसले….
शेवटी मला फक्त एवढच म्हणाले ,
हे दिवस पाहण्यासाठी का केलि होती आम्ही रचना स्वराज्याची?
त्यासी जोड़ होती १८ पगड जातींची…,
आज हिन्दुस्तानत परत गरज आहे त्या मावल्यांची,
उठ मावल्या उठ हाक आहे ही मातीची……!!!!!!!!
उठ उठ म्हणताच मला जाग आली,
खरच का माझी आणि महाराजांची भेट झाली?
मन महाराजांच्या विचारत गुंतून होते गेले,
पण खरच एकदा महाराज होते मला भेटले….!!!!!
जय भवानी..!!!
जय  शिवाजी…!!!
 

 

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj

 

Leave a Comment