Durgadi Fort History in Marathi
Durgadi Killa Entry |
दुर्गाडी हा किल्ला महाराष्ट्रातील एक किल्ला आहे जो कल्याण शहरात आहे
Durgadi Fort Kalyan: उल्हास नदी किनारी असणारं कल्याण शहर मध्य पूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे केंद्र होते, कल्याण बंदरावर येणार माल नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच राजधानी कडे घेऊन जात असे. दुर्गाडी किल्ला व किल्ल्यावर असणारे छत्रपती शिवरायाने बांधलेले आई भवानीचं मंदिर Durgadi Mandir Kalyan त्याच मुळे कल्याण ला ऐतिहासिक कल्याण शहर म्हणून ओळखले जाते.
भातसाई नदी तशीच काळ नदी या दोन्ही उल्हास नदीला मिळतात त्या मुळे खाडीला पाणी भरपूर असते, तशीच ही छोटी खाडी समुद्र भेटते व इथे संध्याकाळी छान अस वातावरण बघायला भेटेल कोरोना काळामध्ये शक्य तो दुर्गाडी किल्ला आणि त्या मागील ही नदी व नयनरम्य दृश्य बघायला नाही भेटणार.
Read More: Place To Visit Near Kalyan | Lonad Caves
Kalyan Station to Durgadi Fort
कल्याण रेल्वे स्थानकावरून बस आणि रिक्षा या द्वारे १५ मिनिटे अंतरावर हा किल्ला आहे आणि जर तुम्ही चालत जाण्याचा विचार करत असाल ते ही करू शकता अगदी सरळ सरळ रस्ता आहे कल्याण रेल्वे स्टेशन हुन छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण पश्चिम कडे जावा आणि तिथून अगदी सरळ रस्ता लाल चौकी कडे तिथून तुम्हाला दुर्गाडी किल्ला कोणी ही सांगेल.
Durgadi Temple Timings – Durgadi Fort information
गडावर जाताना कलाकृतीने उभारलेला प्रवेशद्वार आहे आत जाताना समोरच गणपती बाप्पाचा एक छोटीशी मंदिर आणि मूर्ती आहे नंतर किल्ल्यावर दुर्गा मातेचं मंदिर आहे दरवर्षी नवरात्रीला इथे ९ हि दिवस जत्रा असते आणि या मंदिरात भक्ताची भली मोठी रांग दर्शनासाठी लगते Durgadi temple timings सकाळी ७ ते रात्री अगदी १२ -१ वाजेपर्यंत लोक दर्शन घेण्यास रांगेमध्ये उभे असतात, मंदिराजवळ इदग्याची भिंत आहे आणि गडाच्या खालील बाजूस बुरुज आहेत गडावरील अवशेष थोडे फार नाहीसे झाले आहेत मात्र हा गड लहान असल्यामुळे बघण्यास छान आहे.
दुर्गाडी गडाच्या आजू बाजूस पाण्याची सोय आहे आणि गडावर सुद्धा आहे गडावर नेहमी प्रमाणे पोलीस बंदोबस्तहि असतो सध्या कोरोना मुळे बंदी होती मात्र २ वर्षय नंतर ते मंदिर आणि कल्याण मधील दुर्गाडी किल्ला व नवरात्री उत्सव साजरा केला जातोय तसेच सर्वत्र आनंदच वातावरण व छान दुर्गाडी जत्रा पाहायला मिळते.
Durgadi Mandir Kalyan दुर्गाडी देवाचे दर्शन सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना मिळते, १९६८ साली कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर पूजा-अर्चना करण्यासाठी बंदी होते. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक बंदीहुकुम मोडून देवीची पूजा केली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. कल्याणमधील दु्र्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव करोना काळात २ वर्ष साजरा झाला नव्हता २ वर्षा नंतर २०२२ मध्ये चांगल्या थाटात साजरा केला जातोय.
Durgadi Fort Address
मित्रांनो ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामधील कल्याण शहरातील दुर्गाडी किल्ला या बद्धल माहिती कशी वाटली जरूर खाली कंमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अजून काही माहिती असल्यास ते ही खाली सांगू शकता.
छान आणि उपयुक्त माहिती ….