शिवराजाभिषेक सोहळा ६ जून दुर्गदुर्गेश्वर – रायगड.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा

पाचही शाह्यांना पायदळी तुडवून स्वराज्य स्थापित करणाऱ्या, रायगडी विराजमान असलेल्या छत्रपतींच्या राजेशाही देशा !!…

दुर्गदुर्गेश्वर – रायगड शिवराजाभिषेक सोहळा स्वतः पहिल्यांदा पाहिलेला तो अनुभव अक्षरशः अंगावर काटा येणासारखा होता खर्च मित्रांनो एकदा तरी रायगड ला जाऊन पाहावे तिथे राज्याभिषेक सोहळा असतो तो एकदा स्वतःचा नजरेने पाहावा, हा सोहळा पाहण्यासाठी आम्ही मित्र ५ तारखेला संध्याकाळी निघायची माझ्या कामातले  मित्र जरी एखाद वर्षी सुट्टी नाही भेटली तरी कामातून एखाद दोन जण दरवर्षी जातात आनंद ती ओढ अंगावर शहरे ते गडावर पोहोचल्यावर येतात संध्याकाळी आम्ही निघतो आणि बरोबर मध्यरात्री गडाच्या पायथ्यवर पोहोचतो बेलापूर ते रायगड असा प्रवास नित्य नियमाने करतो मध्यरात्री गड सर करायला घेतो आणि पहाटेच गडावर पोहोचतो १ तास ते २ तास जयघोष करत सर्व सोबत घोषणा देत गडावर कधी पोहोचतो समजत नाही मग सकाळी गडावर पाण्याची व्यवस्था असल्यामुळे अंघोळ करून सादर घालून छान कपडे घालून सोहळा पाहायला निघतो तिथे वेगवेगळे शिवभक्त आणि मंडळ असतात ढोल तसे  गजरात आक्का रायगड आनंदमय होत रायगड वर पाऊल पढल्यावर आणि किल्ले च्या दरवाजा ला हात लागताच अंगावर काटा येतो महाराजच दर्शन झाल्यासारखं जाणवत आणि मन तिथेच धन्य होत मैदानी खेळ पाहायला खूप गर्दी जमते आणि एकदम खास नगारखाना दरवाजा  ढोल गुलाल आणि  नग्या तलवारी असा अंगावर काटा येतो येतो ना पुण्य केले आणि आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो असं वाटते , मित्रांनो अखिल भारतीय राज्याभिषेक (Shivrajyabhishek) समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर हे सोहळा संपन्न होतो.हा सोहळा पाहण्या साठी लोक काना कपोर्याहून शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात, यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक घरीच राहुन साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, माहिती – आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.महाराष्ट्रातील काही प्रागतिक विचारांची मंडळी त्याकाळी शिवाजी महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारी महान व्यक्ती म्हणून पाहत होती आणि हिंदू धर्मातील एक व्यक्ती छत्रधारी बनून तिने स्वतंत्र बाण्याने राज्य करीत रहावे अशी त्यांची इच्छा होती. हिंदू स्वराज्य उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती आणि साहजिकच त्यासाठी हिंदू छत्रपतीची गरज होती.राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

Leave a Comment