Lonad cave, Khandeshwari Mata Temple
Lonad Cave: न पाहिलेले ठिकाण Place To Visit Near Kalyan Maharashtra लोनाड लेणी कल्याण पासून ११ किलोमीटर अंतरावर असून यासाठी २५-३० मिनिटे लागतात आणि भिवंडी पासून १३.९ किलोमीटर अंतरावर असून ३०-३५ मिनिटे लागतात. लोनाड लेणी अगदी मनाला शांती देणार हे ठिकाण आहे. कल्याण मधील व त्या जवळील पर्यटकांना माहीत नसलेलं हे ठिकाण आहे.
हे ठिकाण एकदिवसीय पिकनिक स्पॉट पर्याय म्हणून ओळखले जाते. तुम्ही फॅमिली आणि मित्र मैत्रिणी सोबत इथे येऊ शकता आणि शांततेत बसू शकता. मंदिर असल्यामुळे इथे खूप प्रसन्न वाटते आणि सभोवतालचा परिसर देखील छान आहे (Lonad cave with Khandeshwari Mata Temple)
कल्याण जवळील ह्या लोनाड लेणीला कसे जाल?
ठाण्याहून मुंबई-नाशिक महामार्गावरून भिवंडीजवळ आलात, तर सोनाळे फाटा लागेल. या फाटय़ावरून एक रस्ता लोनाड गावात जातो.
कल्याणहून भिवंडीला जाण्यासाठी बस सुटतात. तसेच भिवंडी व कल्याणहून एसटीचीही सोय आहे.
आडबाजूला असल्याने या भागात जाण्यासाठी स्वत:चे खासगी वाहन असल्यास उत्तम.
History of Lonad Caves
अचानक मध्ये भयानक प्लॅन झाला, लोनाड लेणी Lonad Leni with khandeshwari mata temple । ह्या लेणी ५ ते 7 दशकातल्या असाव्यात तिथे पाहण्यासारखं खूप काही आहे अगदी जुनं शंकरच मंदिर आहे. सभोताल शांतता आहे, छान निसर्ग आहे, कोणाला ही न माहीत असलेलं हे ठिकाण खूपच सुंदर आहे आणि आता तिथे चांगल्या पैकी पर्यटकांची व्यवस्था सुद्धा केली आहे. चला आपल्या माध्यमातून या ठिकाणला प्रसिद्धी देऊया खाली फोटो दिले आहेत ते पाहू शकता.
हे देखील वाचू शकता: दुर्गाडी किल्ला | kalyan durgadi killa | दुर्गाडी जत्रा
सुर्यस्थ होताना कादेश्वरी माता मंदिर आणि लोनाड लेणी:संध्याकाळ ची वेळ सूर्यस्थ होत होता, सर्वत्र शांतता होती. इथे येण्यासाठी आम्ही कल्याण हुन निघालो कल्याण, डोंबिवली, भिवंडी व अन्य जवळील ठिकाणांहून इथे लोक cycling करत येताना आम्ही पाहत होतो येतात, रस्ता सोपा आहे अवघड अस काही नाही.
संध्याकाळ ची वेळ सूर्यस्थ होत होता, सर्वत्र शांतता होती. इथे येण्यासाठी आम्ही कल्याण हुन निघालो कल्याण, डोंबिवली, भिवंडी व अन्य जवळील ठिकाणांहून इथे लोक cycling करत येताना आम्ही पाहत होतो येतात, रस्ता सोपा आहे अवघड अस काही नाही. खाली इथे कसं यायचं या बद्धल माहिती दिली आहे.
इथे येण्याकरिता छोटासा रस्ता आहे, इथे कार आणि बाईक सुद्धा येऊ शकते एवढा रस्ता. लेेणी समोर आणि ह्या फोटो मध्ये बघू शकता सूर्यास्थ होत आहे आणि वेळ हि संध्याकाळची होती खूप प्रसन्न मन वाटत होते सोबत च मंदिर मध्ये पूजा आणि आरती होत होती म्हणून मन अजून प्रफुल्लित वाटत होत.
मंदिरच्या ह्या लेणीच्या उजव्या बाजूस बघायला भेटते ते पाण्याचे टाके हे टाक किती खोल आहे माहित नाही पण त्यात जीव पाहायला मिळाले. आणि पाणी हिरवं होत पाणी पिण्यायोग्य नाही, म्हणून जर ह्या ठिकाणी येत असाल तर स्वतःची पाण्याची बॉटल घेऊन येणे, तसेच आजूबाजूला हॉटेल नसल्या मुळे येताना काही स्नॅक्स घेऊन येऊ शकता, तसेच इथे कचरा करू नये.
ह्या लोनाड लेणी (Lonad caves ) मध्ये खंडेश्वर देवीचं मंदिर आणि ज्ञानेश्वर माऊली आणि गणपतीचं फोटो आणि मूर्ती आहे. ह्या लेणीमध्ये मध्यभागी देवीची मूर्ती आहे, व त्या बाहेर प्रशस्त अशी जागा आहे व त्या बाहेर भला मोठा वरंडा आहे तिथे रांगोळी काढली जाते, या ठिकाणाला बघून अस वाटत येथील गावकरी मंडळी या ठिकाणी दिवा बत्ती व रांगोळी काढतात.
वरील फोटो मध्ये देवीच्या मंदिरच्या बाहेर आल्यावर हा वरंडा पाह्यला मिळतो, समोरच गाडी पार्क शकतो एवढी मोठी जागा आहे, लेणी समोर छान अशी तुळस बघायला भेटते, संध्याकाळची वेळ असल्यामुळे पक्ष्याचा आवाज व सर्वत्र शांतता अनुभवायला मिळते या मुळे मन अगदी प्रसन्न होते.
पटांगण लेणी च्या पहिल्या टप्प्यात हे असे तीन खांब त्यात एक ढासळलेला आणि समोर हनुमानाची मूर्ती बागयला मिळते, हा भाग छोटासा आहे आणि ह्याची लोकप्रियता म्हणजे तिथे एक दगडाची खुर्ची आहे, कोणी बनवली असेल माहीत नाही पण ज्याने बनवली काय कला असेल त्यांच्याकडे. एवढी लेणी बनवली त्यात हि शिल्प आणि त्यात ती खुर्ची छान वाटलं.
लोनाड लेणी आणि त्यात खंडेश्वरी मातेचं मंदिर यात हि लाइटिंग आणि समोर यज्ञ आणि फुलांची माळ पाहू शकता, गावकरी या मंदिराची पुरेपूर निघा राखत असेल असे दिसून आले. या ठिकाणी खूप स्वछता दिसत होती मंदिरात, पटांगणात आणि गाभाऱ्यात कुठेही कचरा आणि असं धूळ लागल्या सारखं दिसत नव्हते.
Conclusion:
तर मित्रांनो आशा करतो Place To Visit Near Kalyan लोनाड लेणी (Lonad cave) फोटो आणि छोटुशी माहिती तुम्हाला आवडली असेल, जर तुम्हाला विडिओ बघायचा असल्यास जरून माझ्या #mianilshinde चॅनेलला भेट द्या आणि आपल्या चॅनेल ला subscribe करा. तसेच जर तुम्ही कल्याण जवळील एकदिवसीय पर्यटन स्थळ पाहत असला तर या ठिकाणी जरूर भेट द्या व ही माहिती आपल्या जवळच्या व्यक्तीला जरूर शेयर करा.
धन्यवाद…
3 thoughts on “Place To Visit Near Kalyan | Lonad Caves”