forts in maharashtra | महाराष्ट्रातील गड किल्ले

महाराष्ट्रातील गड किल्ले आणि त्या बद्धल थोडी माहिती  

मित्रांनो मी  शोधतोय महाराष्ट्रातील एकूण ३५०  हुन अधिक किल्ल्या बद्धल माहिती त्यातील खाली दिलेले पहिले १० किल्ल्या बद्धल माहिती अजून माहिती येतच राहणार अगोदर १० किल्ले या बद्धल माहिती जसे जसे माहिती मिळत जाईल तसे तसे या ब्लॉग्स वर माहिती पोस्ट करत राहील. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Fort in maharashtra

1.       Achala Fort

अचला किल्ला

 

अचला किल्ला हा गिरिदुर्ग या प्रकारचा आहे त्याची उंची ४०४० फूट एवढी आहे आणि चढाई श्रेणी मध्यम प्रकारची आहे अचला किल्ला हा नाशिक जिल्या मध्ये आहे आणि जवळच गाव पिंपरीपाडा आहे नाशिक मधून वणी वरून  ए . स .टी  ने १२ किलोमीटर अंतरावर  पिंपरी – अचला या गावात पोहोचता येईल आणि तिथून पिंपरीपाडा च्या दिशेने चालत यावे आणि हा किल्ला अजिंठा सातमाळ मध्ये आहे म्हणून नाशिक मार्गे आणि मनमाड मार्गे आणि जवळच्या राज्यामधून म्हणजेच गुजरात मधून सापुतारा या रस्त्याने येऊ शकतो.

2.       Agashi Fort

आगाशी किल्ला

आगाशी किल्ला हा आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्यामधील वसई या ठिकाणी आहे इथे कास जायचं  हे तुम्हाला इंटरनेट वर माहिती मिळेल एवढं काही वेगळं नाही आणि ह्या किल्ल्या बद्धल माहिती सध्या मिळत नाहीये जर मिळाली तर स्वतः माहिती टाकेल. 

3.       Ahmednagar Fort

अहमदनगर किल्ला

अहमदनगर किल्ला हा किल्ला महाराष्ट्र मधील अहमदनगर मधील भिंगार नाला जवळ आहे हा किल्ला १५६२-१६०० headquarters of the Ahmednagar Sultanate म्हणजेच सल्तनचे मुख्यालय होते आता हे भारतीय लष्कराच्या आर्मर्ड कोरच्या कारभारात आहे या अगोदर ब्रिटीश राजवटीत तुरुंग म्हणून वापरला जात असे.मुंबई ते अहमदनगर किल्ला ५ ते ६ तास अंतरावर आहे आणि पुणे हुन २ ते ३ तास.

4.       Ahivant Fort

अहिवंत किल्ला

अहिवंत किल्ला नाशिकपासून ५५ किलोमीटर वर आहे हा किल्ला एक महत्वाचा मानला जात असे, अचला ,अहिवंत आणि मोहंदर हे तीन किल्ले जवळचे आहेत आणि या मधील २ किल्ले अहिवंत किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधला गेला. अहिवंत किल्ला हा हिल फोर्ट म्हणून ओळखला जातो आणि याची उंची ४०२४ फूट आहे.

5.       Ajinkyatara

अजिंक्यतारा

अजिंक्यतारा हा किल्ला आपल्या महाराष्ट्रातील राजधानी सातारा या ठिकाणी आहे या किल्ल्याची उंची ३३०० फूट उंच आहे अजिंक्य तारा हा ७ पर्वतापैकी एक वर स्थित आहे आणि औरंगजेबच्या कारकिर्दीमध्ये अजिमतारा म्हणून ओळखला जात होता  हे औरंगजबच्या मुलाच्या नावावर आधारित होता. अजिंक्यतारा साठी रोड ने जात असाल तर पुणे पासून २ तास आणि मुंबई पासून ४ तास अंतरावर आहे आणि रेल्वे ने येत असाल तर जवळचे स्टेशन पुणे विमानतळ.

6.       Akola Fort

अकोला किल्ला

अकोला किल्ला हा आपल्या महाराष्ट्रातील अकोला जिल्यामध्ये आहे. मुंबई हुन अकोला किल्ला १२ ते १३ तास आणि ५६६ किलोमीटर अंतरावर आहे अकोला किल्ला याला असदगड म्हणून ओळखला जात होता.  अकोला किल्ला हा जिल्याचे  प्रमुख तटबंदी आहे. औरंगजेबाच्या कारकिर्दीत अकोला किल्ल्याची तटबंदी असद खानने केली या किल्ल्याचे नाव असदगड असे ठेवले.

7.       Akluj Fort

अकलूज किल्ला

अकलूज किल्ला हा आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्यामधील अकलूज ह्या शहरामध्ये आहे,  १५९८ फूट उंच असलेला हा किल्ला मुंबई पासून ५ तास ५७ मिनटं आणि ३१५ किलोमीटर अंतरावर आहे या किल्याला शिवश्रुठी म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा किल्ला योग्य स्थितीती असून पहाण्यायोग्य आहे.  हा किल्ला सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे.

8.       Alang Fort

अलंग किल्ला

अलंग किल्ला अलंगगड किंवा अलंग म्हणूनही ओळखला जातो,  पश्चिम घाट पर्वत, नाशिक, महाराष्ट्र, भारत मधील कळसूबाई परिसरामध्ये हा किल्ला आहे. अलंग किल्ला, मदनगड किल्ला, कुलंग किल्ला आणि त्यांना जोडणारा ट्रेक अलंग, मदन आणि कुलंग (AMK ) म्हणून ओळखला जातो. अलंग किल्ला हा सर्वात कठीण मानला जातो. तसेच अलंगला जाण्यासाठी आंबेवाडी गावातून आहे – तर कसारा किंवा इगतपुरी रेल्वेने किंवा बसने पोहोचतां येत . घोटी ते आंबेवाडी अशी ३२ कि.मी. अंतर आहे दार (२० मैल ) अंतरावर बस सेवा भेटते. किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण तीन तास लागतात.

9.       Ambolgad

आंबोलगड किल्ला

आंबोलगड किल्ला हा आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आहे इथेच यशवंत गड सुद्धा बघायला भेटेल १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे होता हा किल्ला समुद्रावर आणि बंदरावर नजर ठेबण्यासाठी बांधण्यात आला.  राजापूर नदीच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या खाडीवर, समुद्रसपाटीपासून अगदी थोड्या उंच आणि उत्तर व पश्चिम दिशेला एक खंदक असून ते एकरात एक चतुर्थांश क्षेत्र व्यापते. गडाच्या भिंती व बुरुज आता मोडकळीस आले आहेत. जवळ कोणतेही रेल्वे स्टेशन नाहीत रस्त्याने येत असाल मुंबई हुन ६१० किलोमीटर वर आहे, रत्नागिरी – आदिवरे -नाटे – आंबोळगड  या मार्गे येऊ शकता आणि दुसरं राजापूर – नटे – आंबोळगड या मार्गे येऊ शकता, गडावर राहण्याची व जेवणाची सोय नाहीये जवळील गगनगिरी महाराज आश्रमात राहण्याची सोय होऊ शकते.

10.   Anjaneri

अंजनेरी किल्ला

अंजनेरी किल्ला नाशिक – त्र्यंबकेश्वर पर्वतरांगातील एक किल्ला आहे अंजनेरी हा हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. अंजनेरी त्र्यंबक रोडने नाशिकपासून 20 किमी अंतरावर आहे. स्थानिक नाशिककरांसाठी, विशेषतः पावसाळ्यात हे एक लोकप्रिय ट्रेकिंग स्पॉट म्हंटले आहे भगवान हनुमान याच्या आईचे नाव अंजनी होते म्हणून या किल्ल्याला अंजनेरी किल्ला म्हणतात जगातील हे एकमेव ठिकाण आहे जेथे आपल्याला अंजनी मातेचे मंदिर सापडेल.अंजनेरी गाव अंजनेरी फाट्यापासून 10 ते 15मिनिटांच्या अंतरावर आहे. अंजनेरी गावातून नवाराआणि नवरीनावाचे दोन चिमटे पाहायला मिळतात.अंजनेरी फोर्ट ट्रेकसाठी पार्किंगसह ५० रुपये प्रवेश शुल्क आहे.अंजनेरी किल्ल्याचा ट्रेक अंजनेरी गावातून सुरू होतो. सार्वजनिक वाहतुकीचा वापर तसेच स्वतःचे वाहन वापरुन आपण गावात पोहोचू शकता.अंजनेरी किल्ल्याला भेट दिल्या नंतर हि ठिकाणे सुद्धा पाहू शकता – त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, ब्रह्मगिरी पर्वत, हरिहर किल्ला, अंजनेरी गावात भगवान हनुमान मंदिर.

मित्रांनो अशा करतो हि माहिती आवडली असेल जर अजून माहिती तुम्हाला माहित असेल तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये देऊ शकत. प्रयत्न आहे ३५० गड किल्ल्या बद्धल माहिती देण्याचं या पैकी १० अगोदर आणि पुढील पोस्ट मध्ये १० किल्ले अशी माहिती आपल्या या ब्लॉग्स वर येत राहणार.  तर मित्रांनो हि माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकता आणि या मराठी ब्लॉग्स ला Subscribe  करू शकता. 

।। धन्यवाद  ।।

अनिल शिंदे 

Leave a Comment