असा काढा चारित्र्य दाखला तसेच How to Apply Police Clearance Certificate, चारित्र्य दाखला का व कशाकरिता काढला जातो. सर्व माहिती त्याच बरोबर कोणते कागद पत्रे लागतील तसेच या प्रक्रिये साठी पैसे किती लागतील या बद्धल माहिती या ब्लॉग मध्ये मिळणार आहे. माहिती संपूर्ण वाचा तेव्हाच समजेल अर्थवट माहिती घेऊ नका.
मित्रांनो चारित्र्य दाखला काढताना तुमची संपूर्ण माहिती त्याच बरोबर कागदपत्रे हि खरी दयावी. मला हा अनुभव माझ्या नवीन नौकरीकरिता आलेला म्हणूनच या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला हि माहिती देतोय, हि माहिती संपूर्ण वाचली तर तुम्ही सुद्धा कॅफे मध्ये न जाता घरी किंवा मोबाईल वर Police Clearance Certificate अप्लाय करू शकता.
police clearance certificate काढण्यासाठी काय करावे हे खाली पॉईंट नुसार सांगितलं आहे.
PCC (चारित्र्य दाखला) काढण्यासाठी त्याच्या वेबसाईट वर जावे https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx, Registration for applying for NOC मध्ये संपूर्ण खरी माहिती द्यावी. Aadhaar Number नाही टाकला तरी चालेल. सर्व माहिती दिल्यावर Verification कोड येईल मोबाईल वर तो Verification Code Enter करायचा. नंतर Your registration completed successfully. Kindly login to apply for online services मेसेज दिसेल. पुन्हा लॉगिन करायचा आहे तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर आणि तुम्ही ठेवलेल्या पासवर्ड ने.
हि झाली रेजिस्ट्रेशन ची प्रोसेस.
नंतर लॉगिन करून SERVICES मध्ये Character Certificate वर क्लीक करून पहिले instructions दिसेल.
instructions म्हणजे तुम्हाला काय काय कागदपत्रे लागतील त्या बद्धल माहिती असेल तीच माहिती खाली पाहू शकता.
1.Age Proof (any One)
a. School leaving certificate
b. SC board certificate
c. Birth certificate issued by municipal corporation or local self-government body
2. Identity Proof: (any One)
a. Pan Card
b. Election Card
c. Driving Licence
d. Student card
e. Any other specified by Police station
3.Address proof : (any One)
a. Passport
b. Ration card showing applicant’s name & address
c. Current Electric/Telephone bill showing applicants name and Address
d. Letter from Society
e. Registered Leave & license
f. Aadhar Card (UID)
4.Compulsory Document
a. Letter from Company/ Application to Commissioner/ Superintendent of Police for NOC
या चार Proof साठी त्यातील कोणतं हि एक जसे कि पहिल्या मधील SC board certificate दुसऱ्या मधील Pan Card तिसऱ्या मधील Passport किंवा कोणतंही एक आणि चौथा कंपनी लेटर हे कागदपत्रं पुढे attach करायची आहेत महत्वचं म्हणजे तुम्हाला error येईल त्या करिता खलील माहिती दिली आहे.
हे कागदपत्रे upload करताना – एकाच नावाने (certificate, pancard, passport, latter) कागदपत्र एका folder मध्ये सेव्ह करा व त्या कागदपत्रांची size १०० ते २०० KB च्या आत हवी. हे कागदपत्रे सर्व नंतर विचारले जातीलच त्यात अगोदर Address Information, General Information, Police Station Information असे तीन टॅब असतील.
Address Information, General Information, Police Station Information मध्ये योग्य माहिती देऊन शेवटी pay fees असतील तिथे १२३.६० रुपये तुम्ही ऑनलाईन भरू शकता व चारित्र्य दाखला म्हणजेच Police Clearance Certificate अगदी सोप्या पद्धतीने घरी बसल्या अप्लाय करू शकता.
Conclusion:
मित्रांनो हि माहिती कशी वाटली जरूर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कालवा काही शंका असतील त्या खाली नूडवू शकता तसेच हि माहिती चांगली वाटल्यास तुमच्या मित्रां परिवार सोबत शेअर करू शकता. चारित्र्य दाखला म्हणजेचPolice Clearance Certificate हे अनेक कामासाठी येऊ शकतो सरकारी नौकरी किंवा पासपोर्ट काढताना कमला येतो तर मित्रांनो भेटू पुन्हा नवीन विषय घेऊन तू पर्यंत रजा घेतो.
Note:- रेजिस्टरशन साठी फोन नंबर महत्वाचा आहे, एक वेळेस एकच फोन नंबर वापरू शकता, रेजिस्टरशन चुकीचं झाल्यास पिन कोड चुकीचा टाकल्यास किंवा आपल्या परिसरातील पोलीस स्टेशन चुकीचं दिसत असल्यास पुन्हा रजिस्ट्रेशन करण्यासाठी दुसरा फोन नंबर लागतो, म्हणूनच जी माहिती देत असाल ती व्यवस्थित द्या ज्याने तुमचं PCC application बरोबर येईल.जर तुम्हाला जमत नसेल तर cyber cafe मधून हे PCC Application भरून घेऊ शकता.