ट्विटरचे (Twitter) नवीन सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agrawal) यांची लाईफ ? आणि कुटुंबाबद्दल जाणून घ्या
भारतीय वंश असलेले पराग याआधी ट्विटरमध्ये चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरच्या भूमिकेत काम करत होता. पराग यांनी आयआयटी, बॉम्बे येथून शिक्षण घेतले आहे. ते याहू आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 2011 मध्ये त्यांनी ट्विटर जॉईन केले.
मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी सोमवारी सीईओ पदाचा राजीनामा दिला. आता ट्विटरचे नवे सीईओ भारतीय-अमेरिकन पराग अग्रवाल असतील. याआधी पराग कंपनीत मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत होते. पराग यांनी आयआयटी, बॉम्बे येथून शिक्षण घेतले आहे.
ट्विटरचे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना, त्यांनी त्यांची दीर्घकाळाची जोडीदार विनिता अग्रवालसोबत लग्न केले आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये लग्न झाल्यानंतर पराग आणि विनिता यांनी जानेवारी 2016 पासून दोघेही सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे राहतात. त्यांना अंश नावाचा मुलगाही आहे.
विनिता अग्रवाल (Twitter CEO Parag Agrawal Wife) यांच्या ट्विटर प्रोफाइलनुसार, त्या स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये फिजिशियन आणि असिस्टंट क्लिनिकल प्रोफेसर आहेत. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. याशिवाय विनिताने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पीएचडी केली आहे. विनिता बिघाट बायोसायन्समध्येही काम करतात. विनिताने आतापर्यंत वैद्यकीय आणि तांत्रिक क्षेत्रात खूप काम केले आहे.
याआधी विनिता फ्लॅटिरॉन हेल्थमध्ये प्रोडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर म्हणून कार्यरत होत्या. विनिताने इन्स्टिट्यूट ऑफ हार्वर्ड आणि एमआयटीमधून जेनेटिक बेसिस ऑफ कॉमन डिसीजचा अभ्यास केला आहे. त्यांनी कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळा आणि लॉरेन्स लिव्हमोर नॅशनल लॅबोरेटरीमधून संगणकीय संशोधनही केले आहे.
पराग सतत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पत्नी विनितासोबतचे फोटो अपलोड करत असत. परागचे इंस्टाग्राम प्रोफाईल पाहून असे दिसते की त्यांना प्रवासाची खूप आवड आहे. त्यांनी विनितासोबतच्या सुंदर डेस्टिनेशनचे काही फोटो अपलोड केले आहेत. परागने त्यांच्या आई-वडिलांचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
ट्विटर च्या मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा पदभार पराग अग्रवाल यांनी स्वीकारल्यावर मित्रांनो इलॉन मस्क यांनी पराग यांचे जोरदार कौतुक केले, हे वाचून तुम्हालाही अभिमान वाटलाच असणार, त्याच बरोबर श्रेया घोषाल प्रसिद्ध गायिका यांनी देखील पराग याना ट्विटर वर मला गर्व आहे हे बोलून ट्विट केले, श्रेया आणि पराग हे लहानपणची मैत्री आहे असं बोल जाते.
पराग अग्रवाल यांचा जन्म आणि संगोपन भारतात झाले. आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण घेतल्यानंतर पराग करिअर करण्यासाठी अमेरिकेला गेलेले. त्यांनी बी.टेक इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. अमेरिकेत गेल्यानंतर पराग यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडीही केली. विनिता यांनीही याच विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
गुगल वर नवीन सीईओ पराग अग्रवाल यांच्या विषयी विचारले जाणारे काही प्रश्न –
प्रश्न 1. parag agrawal salary
उत्तर – १ मिलियन
प्रश्न 2. parag agrawal wife
उत्तर- विनिता अग्रवाल
प्रश्न 3. parag agrawal age
उत्तर- ३७ वर्ष
मित्रांनो मी आशा करतो की ट्विटर चे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांची माहिती तुम्हाला माहीत झाली असेल, मित्रांनो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कृपया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवू शकता ज्याने करून आपल्या वाचकांना आणि आम्हाला ही थोडी अजून माहिती मिळू शकेल, मित्रांनो आपले अजून काही नाव नवीन माहिती सूचित करायची असेल तर काही कंमेंट मध्ये सांगा मी ती माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.
आपले भारतीय वंशज असलेले twitter चे नवीन CEO Parag Agrawal बद्धल ही माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला आणि परिवारासोबत share करू शकता आपल्या Social Networks वर share करू शकत जस की Facebook, Twitter आणि whatsapp वर सर्वाना share करा
धन्यवाद।।