kala ghoda art festival | ज्या शहरात काळा घोडा कला महोत्सव साजरा केला जातो

 

Kala Ghoda Art Festival | in which city kala ghoda art festival is celebrated

kala ghoda art festival

Kala Ghoda Art Festival छोटीशी माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

kala-ghoda-art-festival

 

kala ghoda art festival is in which city

स्वप्नांचं शहर जिथे kala ghoda art festival, धांगडधींगा मज्जा मस्ती दिवस रात्र चालू असते, फिरण्यासाठी वेगवेगळ्या देशातील पर्यटक भेट देतात, आपली संस्कृती जपतात आठवणी जपून ठेवतात, अश्या ठिकाणी अनेक फेस्टिवल होत असतात, विशेष हिवाळ्यात या फेस्टिवलचे आयोजन होत राहतात, अनेक ठिकाण आहेत जिथं मनोसक्त रात्र भर फिरू शकता आपल्या स्वप्नांना दिशा देऊ शकता ते ठिकाण म्हणजे मुंबई.

 

 
 

kala-ghoda-art-festival

 

Kala ghoda art festival म्हणा किंवा kala ghoda festival सर्व एकच फेब्रुवारी महिन्यात आठ नऊ दिवसासाठी असतो, त्यातच कला महोत्सव म्हंटल कि कलाकार येणार त्याच बरोबर मुंबई किंवा जवळपासच्या शहरांतील पर्यटक इथं खूप मोठी गर्दी करतात, कोरोना काळात kalaghoda हा महोत्सव झाला नव्हता नंतर kala ghoda festival खूप जोरोषोरो मध्ये झाला. सर्वत्र आनंदाचा वातावरण मनोसक्त फिरण्याचा तसेच कलात्मक गोष्टी पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. 

anilblogs-kala-ghoda

 

कलात्मक गोष्टी पाहणायसाठी लोक kala ghoda festival या कला मोहोत्सवला हजेरी लावत असे, भारतातील अनेक राज्यातील पर्यटक इथे फिरण्यासाठी मुंबई पाहण्यासाठी येत असतात, या kala ghoda festival मध्ये खूप वेगवेगळ्या, आगळ्यावेगळ्या गोष्टी प्रदर्शन करिता ठेवतात त्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, इथे येण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तिकीट लागत नाही. अजून एक सल्ला जर तुम्हाला कला महोत्सव गर्दी मध्ये पाहायचा नसेल तर तुम्ही दुपारी भेट देऊ शकता. 

 
 
kala ghoda art festival
 
 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशन पासून १० ते २० मिनिटाच्या अंतरावर kala ghoda festival या ठिकाणी हे कला महोत्सव साजरा केला जातो, हा महोत्सव अनेक वर्षांपासून साजरा केला जातो, अनेक फोटोग्राफर मंडळी इथे भेट देऊन छान छान फोटो काढतात, भारता बाहेरील पर्यटक kala ghoda art festival city या बद्धल जास्तच विचार करतात त्या करिता थोडी माहिती या ब्लॉग मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आशा बाळगतो हि माहिती व फोटोस तुम्हाला आवडत असतील.

 
kala ghoda art festival
 
 

Street Festival Mumbai

मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी या ठिकाणी असे अनेक फेस्टिवल हिवाळ्यात होतात, मुंबई  पर्यटक मुंबई पाहण्यासाठी येतात त्याच बरोबर जुन्या बिल्डिंग नावाजलेली ठिकाण हॉटेल पर्यटन स्थळे या ठिकाणी भेट देत असतात, Cultural Festivals ची विचारपूस करत असाल तर मुंबई मध्ये  Cultural Festivals वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि पुढील प्रमाणे या फेस्टिवल ची नावे आहेत जसे कि – 

  1. Kala ghoda art festival
  2. Mumbai Urban Art Festival 
  3. Elephanta Festival
  4. Mahindra Blues Festival 
  5. Mumbai Comic Con 

त्याच बरोबर महाराष्ट्रीयन सण असतात ते वेगळेच मुंबई मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फेस्टिवल दिवशी गर्दी होते तसेच फेस्टिवल मध्ये सहभाग घेऊन पर्यटक या फेस्टिवलच्या आनंद घेत असतात. 

 
kala ghoda art festival

 

kala ghoda art festival address

WRHJ+7PM, VB Gandhi Marg, Kala Ghoda, Fort, Mumbai, Maharashtra 400001

 
kala-ghoda-art-festival-location-mumbai

 

kala ghoda art festival  हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई या ठिकाणी फेब्रुवारी या महिन्यात आयोजित केलं जात, या ठिकाणी पोहोचण्याकरिता तुम्ही CSMT या रेल्वे स्टेशन हुन गुगल मॅप ने देखील चालत येऊ शकता, जर तुम्ही चालत येत असाल तर मुंबई मधील ठिकाण पहात पाहत या ठिकाणी पोहोचू शकता. काळा घोडा फेस्टिवल मध्ये  तुम्हाला लोकांची गर्दी आवडत असेल तर संध्याकाळी ६ पर्यंत इथे भेट देऊ शकता, स्टेशन ते काळा घोडा कला महोत्सव या ठिकाणी चालत पोहोचायला १० ते २० मिनटं लागतात, चालत पोहोचण्याची व मुंबई मधील वेगवेगळी ठिकाणं पाहण्याची काही औरच मज्जा असते. 

 
 
kala-ghoda-festival-night

Kala Ghoda Festival 2023

कला घोडा कला महोत्सव २०२३ मधील काही कॅमेरा मध्ये टिपले आहेत जरूर पहा आणि कॉमेंट करा त्याच बरोबर माझा अनुभव व या मोहोत्सवाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर काही चुकले असेल तर क्षमा असावी, नऊ दिवसाच्या या वार्षिक महोत्सव ला जाण्याचा काही नेम लागत नव्हता पण एक दिवस विचार करून आम्ही पोहोचलो kala ghoda festival 2023 या ठिकाणी, दिवस जाताना असं वाटत होत जरा लवकरच जातोय याचा काही वेळ काळ आहे कि काय कारण संध्याकाळी जाण्याची मज्जा वेगळीच असते. 

 
kala-ghoda-festival-blog
 
 

हा महोत्सव “काळा घोडा असोसिएशन” नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन द्वारे आयोजित केला जातो. संगीत, नृत्य, फोटोग्राफी, पेन्टीन्ग, साहित्य आणि व्हिज्युअल आर्ट्स यांसारख्या कलेच्या विविध प्रकारांचे प्रदर्शन पाहण्यास मिळाले. मुंबईतील काळा घोडा परिसरात असलेल्या काळ्या घोड्याच्या पुतळ्याच्या नावावरून या उत्सवाचे नाव देण्यात आले आहे  असे समजते आणि सामान्यत: फेब्रुवारी महिन्यात एक आठवडा चालतो. हा उत्सव  पाहण्यासाठी आलेल्या  लोकांमुळे आणि कलाकारामुळे लोकांची गर्दी त्याच्या उत्साही वातावरणासाठी ओळखला जातो आणि स्थानिक लोक आणि बाहेरील पर्यटक या ठिकाणाला भेट देऊन सहभागी होतात. 

 
 
Anil Shinde

काळा घोडा महोत्सवाची सुरुवात

marathiblog-kala-ghoda-festival
 

काळा घोडा महोत्सव प्रथम 1999 मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हापासून हा मुंबईतील सर्वात अपेक्षित सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक बनला आहे. जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस यासह वसाहतकालीन वास्तुकला आणि सांस्कृतिक खुणांसाठी ओळखल्या जाणार्‍या दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरात या उत्सवाचे नाव पडले आहे असे समजते. स्थानिक कलाकारांना कलेचं व्यसपीठ म्हणून काळा घोडा कला महोत्सव कडे पाहिले जाते, महोत्सवामध्ये स्थानिक कलाकार, डिझायनर आणि कारागीर यांच्या कार्याचे प्रदर्शन आणि कार्यशाळांचा समावेश करतात. अभ्यागत चित्रे, शिल्पे आणि इतर कलाकृतींची प्रशंसा करू शकतात तसेच कलाकारांद्वारे वापरलेल्या सर्जनशील प्रक्रिया आणि तंत्रांबद्दल आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. 

 
 
mumbai-art-festival 
 
 

निष्कर्ष ;

 

तर मित्रांनो आशा करतो kala ghoda festival छोटीशी माहिती  तुम्हाला आवडली असेल त्याच बरोबर फोटो kala ghoda art festival photos सुद्धा आवडले असतील, काळा घोडा हा महोत्सव आपल्या महाराष्ट्रातील भारतातील पर्यटनाला चालना देत राहतो म्हणूनच या ब्लॉग द्वारे मी माझा अनुभव, फोटोस जगभरातील लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा ब्लॉग तयार केला आहे, जर तुम्हाला हा ब्लॉग – हि माहिती व फोटोस आवडले असतील तर कृपया हि माहिती तुमच्या सोसिअल नेटवर्क वर शेअर करू शकता तसेच मित्रमैत्रीनं सोबत हि माहिती पोहोचवू शकता, जर काही कॉमेंट असतील तर खाली नोंदवू शकता. 

 
धन्यवाद …. 
mumbai-kala-ghoda-art-festival-info

1 thought on “kala ghoda art festival | ज्या शहरात काळा घोडा कला महोत्सव साजरा केला जातो”

Comments are closed.