Indian Railway: भारतीय रेल्वे, जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे जाळं, पुन्हा एकदा नोकरीच्या नवीन संधी घेऊन आले आहे. तब्बल 5 वर्षांनंतर रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती होत आहे, ज्यामध्ये हजारो उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या भरतीमुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळण्याची आशा देखील वर्तवण्यात आली आहे, जे भारतीय रेल्वेच्या रोजगार निर्मिती क्षेत्रात आणखी एक यशस्वी पाऊल ठरणार आहे.
11,000+ पदांवर भरतीची संधी | Indian Railway Available Posts
रेल्वेमध्ये “नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी” (NTPC) अंतर्गत साधारण 11,000 हून अधिक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मेगाभरतीत अंडरग्रॅज्युएट श्रेणीसाठी 3,445 पदे आणि ग्रॅज्युएट श्रेणीसाठी 8,113 पदांवर उमेदवारांची निवड होणार आहे. NTPC ही श्रेणी त्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे, ज्यांना नॉन-टेक्निकल पदांवर नोकरी करण्याची इच्छा आहे. इच्छुक उमेदवारांना indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.
अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख | Indian Railway Application Process and last date to apply
भारतीय रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज करण्याची नोंदणी प्रक्रिया 14 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिकलेले इच्छुक उमेदवार या पदांसाठी पात्र ठरतील. त्यामुळे ज्यांना रेल्वे मध्ये नोकरीची इच्छा आहे, त्यांनी ह्या सुवर्णसंधीचं सोनं करावं.
2019 मध्ये झालेल्या 35,000 पदांसाठी जवळपास 1 कोटी उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यामुळे या भरती प्रक्रियेमध्ये देखील चांगलीच स्पर्धा रंगणार असल्याचं दिसून येत आहे. पण मेहनत आणि तयारीने या संधीचा पुरेपूर फायदा उठवता येईल. रेल्वेतील नोकरी ही नेहमीच एक सुरक्षित नोकरी म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे कित्येक जण या गोष्टीची वाट पाहत असतात.
हे देखील वाचू शकता: State Bank Of India Bharti 2024: बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी…1511 पदांवर भरती सुरू…आताच अर्ज करा!
रिक्त पदांचा तपशील (NTPC 2024) | Indian Railway Available Posts
ग्रॅज्युएट स्तरावरील पदे | Posts for Graduates
- चीफ कमर्शिअल कम तिकीट सुपरवायजर: एकूण 1,736 पदे
- स्टेशन मास्तर: एकूण 994 पदे
- गुड्स ट्रेन मॅनेजर: एकूण 3,144 पदे
- ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट: एकूण 1,507 पदे
- सिनियर क्लर्क कम टायपिस्ट: एकूण 732 पदे
अंडरग्रॅज्युएट स्तरावरील पदे | Posts for Under Graduates
- कमर्शिअल कम तिकीट क्लर्क: एकूण 2,022 पदे
- अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट: एकूण 361 पदे
- ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट: एकूण 990 पदे
- ट्रेन्स क्लर्क: एकूण 72 पदे
या Indian Railway भरतीमध्ये यशस्वी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी योग्य तयारीनिशी आणि योग्य कागदपत्रांसह सर्व तयारी केली पाहिजे. रेल्वेमधील भरतीसाठीची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यामुळे कोणतीही गफलत न करता अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.
या पोस्ट मध्ये Indian Railway अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा धन्यवाद…
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
2 thoughts on “Indian Railway: 5 वर्षांनंतर Indian Railway मध्ये मेगाभरती, 11,000+ पदांवर नोकरीची संधी”