Google AdSense ad crawler issue problem Fixed
नमस्कार मित्रांनो,
मी एक ब्लॉगर आहे माझी वेबसाईट ब्लॉगर वर आहे आणि तुम्ही जी पोस्ट वाचत आहात तो माझा ब्लॉग आहे, मित्रांनो आपल्या मराठी मध्ये कमी marathi blogger आहेत कारण त्यांना माहित आहे हिंदी ब्लॉग प्रमाणे मराठी ब्लॉग मध्ये एवढी कमाई होत नाही जेवढी हिंदी ब्लॉग मध्ये होते. कारण आपला मराठी ब्लॉग हा आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रीयन माणूस वाचत आणि मराठी माणूस वेबसाईटवर भेट देतो, पण हिंदी ब्लॉग वर या देशातील माणसं व आपल्या देशाच्या बाजूला असणारे देश व हिंदी भाषिक लोक हिंदी ब्लॉग वर भेट देतात आणि त्यांची संख्या देखील जास्त असते.
आणि म्हणूनच साहजिकच त्याची ब्लॉगर इनकम जास्त होते, ती इनकम google adsense account द्वारे त्याच्या Bank Account मध्ये येते. कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे google adsense अकाउंट वर Errors येत असतात व इनकम कमी होते, त्यातच आता माझ्या मराठी ब्लॉगच्या google AdSense अकाउंट वर You have ad crawler errors, which can result in lost revenue असा काही Error आला आहे. हा Error अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो how to fix ad crawler errors. आणि पुन्हा पूर्व स्थितीत google AdSense आणू शकता व जेवढी मराठी ब्लॉग वर कमाई होते तेवढी कमाई होईल. या अगोदर पण मी आपल्या या ब्लॉग वर मराठी ब्लॉगरची कमाई किती होते या बद्धल ब्लॉग लिहलेला तो जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो पाहू शकता.
मित्रांनो हा ad crawler errors नेमका का येतो तो जाणून घ्या. आणि त्यामुळे काय होते हे सर्व माहिती या ब्लॉग मध्ये देण्यात आली आहे, तर चला जाणून घेऊ हा error. जर तुम्ही कोणता ब्लॉग लिहत असाल आणि सर्व पोस्ट व्यवस्थित लिहून चांगल्या प्रकारे Blogger Post SEO केलं असेल, Labels in Blogger दिले असतील, तसेच Published on सेट केलं असेल, Location दिले असेल, Search description मध्ये १५० शब्दच स्पष्टीकर नमूद केलं असेल, त्याच बरोबर Options आणि Custom robot tags हे जसे आहे तसे ठेवतात, पण तुम्ही Links मध्ये Permalink मध्ये काही गोंधळ केला असेल तर हा ad crawler errors येऊ शकतो जो मला आला आहे.
मी एक दिवाळी मेसेज मराठी पोस्ट लिहलेली त्या पोस्ट वर मला हा ad crawler errors आला, मला कसे समजले हा Error आला? ते समजलं माझ्या google adsense account मध्ये, असच बघता बघता वरती एक पॉपअप मेसेज दिसला You have ad crawler errors, which can result in lost revenue असा काही, त्यात मला action and dismiss असे काही ऑपशन दिसत होते, साहजिक मित्रांनो तो ad crawler error काय आहे कोणत्या साईट वर आला आहे ते बघण्या अगोदर dismiss न करता action वर क्लिक केलं. त्या error वर क्लिक केलं तर तुम्हला एक साईट या तुम्ही लिहलेल्या पोस्टच्या लिंक दिसतील आणि त्या लिंक वर क्लिक केलात तर ४०२ चा error मिळेल.
हा ad crawler error तुम्हाला तुमच्या google adsense account मध्ये Policy center मध्ये बघता येतो व तिथूनच फ़ीक्स सुद्धा करता येतो, पण या अगोदर ad crawler error fix कसा करायचा ते सुद्धा जाणून घ्या, हा error solve करून तो फिक्स दोन पद्धतीने करू शकता, खूप सोपे आहे जे मी सांगतो त्या पद्धतीने न चुका तुम्ही ते केलात तर हि समस्या लवकर सोडवू शकता, मित्रांनो जसे या दोन पद्धतीने सांगेल त्यातल्या एक कोणत्या तरी पद्धतीने सोडवा एकत्र दोन्ही पद्धतीनं करू नका. तसे जर केलं तर माहित तर नाही पण कुठे पुढे समस्या नको म्हणून एकाच पद्धतीने हा Error फिक्स करा.
How To Fix Ad Crawler Errors :-
१. हा Error खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे एका वेबसाईटची लिंक दिलेली असेल त्या लिंक वर क्लिक केलात तर तुम्हाला ४०२ चा Error देईल. याला आपण सांगितल्या प्रमाणे दोन पद्धतीने सोडवू शकतो पहिली पद्धत म्हणजे आपल्या ब्लॉगर च्या मुख पेज वर जाऊन खाली सेटिंग मध्ये जावा तिथे Errors and redirects असा ऑपशन मिळेल, यात तुम्ही add करा वर FROM आणि TO व खाली Permanent असा टॅब दिसेल. FROM मध्ये तुम्ही ज्या पोस्ट वर ad crawler error आला आहे त्या पोस्टची लिंक तिथून कॉपी करा व FROM मध्ये पेस्ट करा. (उदारणार्थ : https://www.abc.com/ हे सोडून बाकीचं कॉपी करून FROM मध्ये पेस्ट करा)
नंतर TO मध्ये / जशास तसे ठेवा व Permanent मध्ये चालू करू ठेवू शकता व बंद करू शकता तुमच्या मनावर. ह्याने होणार काय जर कोणी त्या पोस्ट वर क्लिक करेल तो तुमच्या वेबसाईट च्या मुख्यपुष्ट वर redirect करेल. तसेच तुम्ही तुमच्या वेबसाईटच्या google adsense account वर जाऊन Policy center मध्ये जाऊन तिथून जो Error आहे त्याला सिलेक्ट करून फिक्स करू शकता.
२. दोन पैकी कोणत्याही एका पदतीने हा ad crawler error solve करा. मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही सर्व केलात तर याला फिक्स होण्यासाठी २४ तास कालावधी लागतो. कोणत्याही पद्धतीने प्रयत्न करा त्याला वेळ लागणारच. मित्रांनो दुसरी पद्धत म्हणजे google search console तुमच्या वेबसाईट हि google search console शी कनेक्ट असेलच त्यात तुम्हाला ज्या पोस्टच्या लिंक वर समस्या आहे ती लिंक google search console मधील Removals ऑपशन मध्ये New Request वर क्लीक करा. तिथे Enter URL म्हणून असेल तिथे ती URL (error post link ) पेस्ट करा Remove this URL only सिलेक्ट असेल तसेच ठेवा व NEXT करा submit करा तुमचा हा error २४ तासात जाऊ शकतो.
निष्कर्ष :-
तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग You have ad crawler errors, which can result in lost revenue. जर तुमच्या सोबत पण असा काही किस्सा झाला तर खाली कंमेंट करून सांगा आणि तुमचा अनुभव शेयर करा, तसेच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की खाली कॉमेंट करून सांगा. तुमच्या मित्र परीवाला शेअर करायला विसरू नका. तसेच जर तुम्हला अजून काही माहिती असेल ती सुद्धा कंमेंट द्वारे आपल्या मराठी ब्लॉगर पर्यंत पोहोचवा. माझी वेबसाईट ब्लॉगर वर असून माझ्या google adsense account वर हि समस्या आलेली.
जेवढी माहिती मला होती ती मी तुमच्या सोबत शेयर केली आहे काही चुकलं असेल तर क्षमा असावी. तसेच मित्रांनो मी सुद्धा पहिल्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला आहे बघुयात काय होत पुढे मी या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सांगेलच. तसेच मित्रांनो काही मदत असेल व काही सूचना असतील कंमेंट करून सांगा व तुमचा error solve झाला कि नाही ते सुद्धा कंमेंट करून सांगा.
धन्यवाद.