Navi mumbai taloja metro: नमस्कार मंडळी शुक्रवार १७ नोव्हेंबर २०२३ दुपारी ३ वा Navi Mumbai Metro Line चे उद्घाटन झाले आहे, पहिली Taloja Metro Train नवी मुंबई मध्ये बेलापूर ते पेणधर (तळोजा) या दरम्यान धावली आहे या बाबत माहिती आज आपण या लेख मध्ये वाचणार आहोत तसेच अश्या प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती तुम्ही या anilblogs ब्लॉग वर वाचू शकता.
CIDCO द्वारे ठरवलेले Navi Mumbai Taloja Metro Fare तिकीट बद्धल माहिती, तसेच आम्ही तळोजा मेट्रो चा पहिला प्रवास कसा केला? काय अनुभव होता? या सर्व प्रशांची उत्तरे तसेच अनुभव आम्ही शेयर करीत आहे. बेलापूर ते पेणधर व Pendhar To Belapur Metro Station, तिकीट दर व लागणारा वेळ किती आहे हे सर्व आपण पुढे पहाणार आहोत तसेच तुम्ही खाली विडिओ द्वारे देखील माहिती घेऊ शकता.
बेलापूर टर्मिनल पासून पेंधर पर्यंत Navi Mumbai Metro Station तसेच Navi Mumbai Metro Route खालील प्रमाणे आहे.
- बेलापूर टर्मिनल
- आर बी आय कॉलनी
- बेलपाडा
- उत्सव चौक
- केंद्रीय विहार
- खारघर गाव
- सेंट्रल पार्क
- पेठपाडा
- अमणदूत
- पेठाली तळोजा
- पेनधर
Taloja Metro Fair: CIDCO-Maharashtra govt यांनी ठरवल्या प्रमाणे Navi Mumbai Metro चे भाडे खालील प्रमाणे आहे, जसा आपण प्रवास करू त्यावर भाडे आकारले जाईल, तुम्ही जर फक्त जाण्यासाठी तिकीट काढत असाल तर ते देखील मिळते व रिटर्न तिकीट सुद्धा मिळते, नवी मुंबई मेट्रो भाडे (दर) तिकिटाचे पैसे-
- ० ते २ किलोमीटरसाठी १० रुपये
- २ ते ४ किलोमीटरसाठी १५ रुपये
- ४ ते ६ किलोमीटरसाठी २० रुपये
- ६ ते ८ किलोमीटरसाठी २५ रुपये
- ८ ते १० किलोमीटरसाठी ३० रुपये
- १० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर करिता ४० रुपये
बेलापूर ते पेणधर तळोजा मेट्रो ट्रेन करिता लागणारा वेळ
Taloja Metro Time: मित्रांनो नवी मुंबई तळोजा किंवा खारघर मधील लोक या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत, नक्की पेंधर ते बेलापूर व बेलापूर ते पेंधर नक्की किती वेळ लागतो? belapur to pendhar station and time त्यासाठी मी ही माहिती व माझा अनुभव तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे, आम्ही पहिल्याच म्हणजेच एकदम पहिल्या १७ तारखेला दुपारी सुरू झालेल्या बेलापूर ते पेणधर या मेट्रो ट्रेन ने प्रवास केला, एकूण १० मेट्रो स्टेशन असून प्रत्येकी स्टेशन वर एक मिन. थांबा असून बेलापूर ते पेणधर आम्हाला अर्धा तास वेळ लागला.
नवी मुंबई मेट्रो चा प्रवास गार झाला असून याचा उन्हाळ्यात नक्की फायदा होईल तसेच खूप सारा वेळ वाचेल, जर तुम्ही पेणधर म्हणजेच Taloja Phase-2 RTO मधून बस क्रमांक ५२ चा प्रवास करत असाल तर बेलापूर पर्यंत एक तास जातो, म्हणूनच तळोजा मेट्रो चा प्रवास खूप छान व सुखरं आणि गारीगार होणार आहे, तसेच पुढे भविष्यात दर न वाढवता कमी करून दिले तर चांगले होईल अशी आशा नवी मुंबई मधील लोकांची आहे.
18 Nov 2023 पासून पेंढार मेट्रो स्टेशन ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर एकूण 11 मेट्रो स्टेशन असून या दरम्यान सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रो चालू असतील. वारंवारता दर 15 मिनिटांची असेल.
#mianilshinde या यूट्यूब चॅनेल वर पहिला live stream चालू केलेला तो देखील पाहू शकता तसेच दुसरा taloja metro train चा बेलापूर ते पेणधर व पेणधर ते बेलापूर रिटर्न प्रवास दाखवला आहे तो देखील पाहू शकता, कृपया विडिओ आवडल्यास लाईक करा, कंमेण्ट करा, व आपल्या मित्र परीवार सोबत शेयर करा.
तसेच मित्रांनो जर तुम्ही मोबाईल मधून विडिओ पाहत असाल तर खाली जेव्हा belapur to pendhar metro train धावली तेव्हा काढलेला live video तुम्ही पाहू शकता किती पब्लिक होती? कसा झाला प्रवास हे सर्व खालील विडिओ मध्ये पाहता येईल.
प्रश्न: तळोजा मेट्रो कधी सुरू होईल
उत्तर – तळोजा मेट्रो दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाली आहे, नवी मुंबई मेट्रो बेलापूर ते तळोजा पेणधर पर्यंत आहे.
प्रश्न: बेलापूर ते पेणधर मेट्रो ने किती वेळ लागतो?
उत्तर- बेलापूर ते पेणधर मेट्रो ने अर्धा तास लागतो, वळणावळणाचा मेट्रो रस्ता असल्या कारणाने ३० किमी वेगाने धावते.
प्रश्न: बेलापूर ते पेणधर मेट्रो तिकीट भाडे किती?
उत्तर- बेलापूर ते पेनधर एकूण ४० रुपये तिकीट असून तर दोन किलोमीटर ला १० रुपये मोजावे लागतील.
हे देखील वाचू शकता: Mumbai Travel Information in Marathi | मुंबई ट्रॅव्हल गाईड अँड अटॅरेक्शन
Conclusion
तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला नवी मुंबई तळोजा मेट्रो First Taloja Metro Train Journey अनुभव व माहिती आवडली असेल, जर तुम्हाला व्हिडिओ तसेच हा लेख व navi mumbai taloja metro update माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लवकरात लवकर ही माहिती आपल्या जवळील नवी मुंबईकर मित्र परिवारामध्ये शेयर करा तसेच ही माहिती आणि विडिओ कसा होता खाली कंमेंट करून जरूर सांगा. अश्याच माहिती साठी व्हाट्सएपच्या चॅनेल ला Follow करा.
धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
1 thought on “Navi Mumbai Taloja Metro || आज पासून सुरू झाली नवी मुंबई तळोजा मेट्रो ट्रेन बेलापूर ते पेणधर”
Comments are closed.